एका श्रीमंत गृहस्थाकडे मेजवानीसाठी चाळीस जणांना बोलावले होते, त्यापैकी वीसजणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एकेक चांदीचा चमचा जेवण संपता संपता चाटून व स्वच्छ करुन, आपापल्या खिशात घुसडला !नोकराने ही गोष्ट यजमानाच्या दृष्टीस आणताच यजमान हाती लागलेले २० चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसमोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, 'आपण सर्व माझ्या निमंत्रणाला मान देऊन जेवयला आलात, म्हणून मला अतिशय आनंद झाला. तुम्हीही आता घरी जायला निघाला आहात. माझ्याकडे येऊन मला जसे तुम्ही आनंदित केलेत, तसेच तुम्हाला आनंदित करुन सोडावे म्हणून मी माझ्या अंगात असलेल्या जादूच्या कलेची थोडीशी चुणुक तुम्हाला दाखवितो.'
याप्रमाणे बोलून त्याने आपल्या हातात असलेले वीस चमचे मोजून दाखवले. चतुर यजमान पुढं म्हणाला, 'आता माझ्या हातात असलेले चमचे बरोबर वीस आहेत, हे मी तुम्हाला मोजूनच दाखविले. तेव्हा हे वीस चमचे मी माझ्या खिशात घालतो, आणि ते सर्व चमचे मी तुमच्यापैकी वीस जणांच्या खिशातून काढून दाखवितो.'
असे म्हणून यजमानाने हातातील वीस चमचे आपल्या खिशात घातले. नंतर त्याने प्रत्येक पाहुण्याचा खिसा चाचपला आणि चोरांच्या खिशातून एकूण वीस चमचे बाहेर काढले व ते आपल्या गड्याच्या स्वाधीन केले.
आलेल्या पाहुण्यांचा अपमान होऊ न देता, चोरीस गेलेले सर्व चमचे मिळविण्याची त्या यजमानांची युक्ती खरोखरच किती अपूर्व होती !
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
मुंबईच्या मध्यवर्ती उपनगराच्या रेल्वेस्टेशनवर दररोज संध्याकाळी गर्दीचे लोंढे येत जात असतात. या अखंड प्रवाहाच्या काठाला बासरीचे सूर उमटत राहतात. गर्दीची पावलं रेंगाळतात. एक मैफलच सुरू होते. या जादूभऱ्या बासरीच्या सुरांचा मालक एक वेगळीच कहाणी सांगतोय.. एक प्रेमकहाणी..या कहाणीला भावभावना आहेत. सुरांची साथ आहे, नशिबाचा फेरा आहे. अनोळखी रसिकांच्या अबोल शुभेच्छा आहेत.. या कहाणीला फक्त डोळे नाहीत.
दुपारचे तीन वाजलेले. नेहमीसारखीच सुस्तावलेली दुपार. मात्र दादर स्टेशनवर ही सुस्ती सुतराम नसते. उलट दुपारचा कोलाहल शिगेला पोहचलेला.
या कोलाहलातही स्टेशनचा एक कोपरा अचानक सुरेल होतो.
वाहत्या गर्दीची पावलं थबकतात.
बासरीची धून सरकत्या माणसांच्या अंगांगावरून फिरत कानात साठू पाहते. हा थांबणारा समूह. पण या सुरांची नोंद घेत वाट चालत राहतो. त्याची बासरी ऐकली की दिवसभराचा थकवा क्षणात नाहीसा होतो, असं अनेकजण सांगतात. लोक त्याला थेट ओळखत नाहीत, पण त्याचे सूर मात्र साऱ्यांनाच जवळचे वाटतात.
गेल्या दोन-अडीच वर्षांपास्नं दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत हे आंधळ्या सलीम सिद्दिकीचं दादर स्टेशनवरच्या पुलावरचं बासरीवादन अव्याहतपणे सुरू आहे.
आता त्याचा स्वत:चा चाहतावर्ग आहे. पोलिसांपासून ते अगदी चहावाल्या पोरापर्यंत. गाण्यांच्या फर्माइशी होत असतात. बिदागी म्हणून त्याच्या खिशात पैसे पडत जातात.
सिमरनही (नाव बदललेलं आहे) त्यातलीच एक.
त्याची बासरी ऐकून एक दिवस तिचीही पावलं रेंगाळली.
ती थांबली क्षणभरासाठीच.. अन् थबकली आयुष्यभरासाठी!
त्याची ही गोष्ट आहे.
त्या दिवसानंतर मात्र ती दररोज त्याचं एखादं गाणं ऐकायला थांबायची. त्याला माहीतही नसायचं ती त्याचं गाणं ऐकायला तिथे थांबलीये. कधी सलीम चहा प्यायला गेला असेल तर तो येईपर्यंत त्याची वाट पाहायची. ती त्याच्या बासरीवर बेहद्द फिदा झाली होती.
हळूहळू तिने त्याच्याशी मैत्री केली. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तो प्रयत्न बराच काळ यशस्वी होऊ दिला नव्हता. तो नेहमीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचा. एकदा तिने खूप हट्ट केला आणि
''..मी मूळचा मध्यप्रदेशातील हौशंगाबाद जिह्यातल्या धरमकुंडीचा. घरची परिस्थिती बेतास बात. पण त्यात मुलगा जन्माला आला हे कुठंतरी सुखावणारं होतं. पण हे सुख केवळ क्षणभरच टिकलं. मी अंध असल्याचं लक्षात आलं आणि माझ्या घरच्यांवर कुऱ्हाड कोसळली. आईला हे कळलं तेव्हा कोलमडून गेली. पण ''माझा मुलगा कसाही असला तरी तो मला हवाय,'' असं ठामपणे वडिलांनी सांगितलं.
''सलीमनं आजपर्यंत केलेला संघर्ष, त्यातून त्याने काढलेले मार्ग, एक कलाकार आणि माणूस म्हणून त्याच्याकडे असलेला चांगुलपणा, त्याची तल्लख बुद्धी, त्याचा नम्रपणा, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. नाही ती फक्त दृष्टी. पण म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या इतर सगळ्या गोष्टी गौण ठरत नाहीत. उलट त्याच्याजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचं चांगुलपण वेड लावतं. त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतं. माझ्या बाबतीतही हेच झालं. मी जसजशी त्याच्या जवळ गेले तसतशी त्याच्यात गुंतत गेले.'' सिमरन सांगते.
तिची त्याच्यामधली भावनिक गुंतवणूक एवढी होती की, शेवटी एके दिवशी तिने त्याला सरळ प्रपोज केलं. तिचं धाडस बघून खरोखरच धक्का बसतो. सलीमचा हात मागण्याचा तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी खरंच एवढा सोपा होता का? नक्कीच नाही.. ही गोष्ट आई-वडिलांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? ते खरोखरच सलीमला स्वीकारतील का? समाजाच्या प्रश्नांना आई-वडील काय उत्तरं देतील? मित्र-मैत्रिणी या प्रेमाला स्वीकारतील का? भविष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी आहे का? असे कितीतरी प्रश्न तिने स्वत:लाच विचारले. तिने या प्रश्नांची उत्तरं शोधली.
''त्याच्याकडे फक्त दृष्टी नाही. पण यात त्याचा काय दोष? तो अंध आहे म्हणून त्याला कुणावर प्रेम करण्याचा अधिकार नाही का? त्याच्यावर कोणत्या चांगल्या मुलीने प्रेम करू नये का? प्रेम करण्यासाठी समोरचा माणूस मनाने चांगला असणं पुरेसं नाही का? तिच्या मनातले हेच सकारात्मक प्रश्न तिला खऱ्या अर्थाने बळ देत होते.
सिमरनच्या या निर्णयाने इतरांचं तर सोडाच, पण सलीमलाच आश्चर्याचा बसला होता. ''ही मुलगी आपल्याशी थट्टा करतेय असंच मला पहिल्यांदा वाटलं. शिवाय आजच्या मुली काय आहेत, कशा आहेत हे मी पाहिलं नसलं तरी ऐकलं जरुर होतं. त्यामुळे माझं धाडस होत नव्हतं. म्हणून मी तिला स्पष्ट नकार दिला. तिला खूप वाईट वाटलं. पण दोन दिवसांनी तिने काहीही न बोलता माझ्या हातात एक पत्रं ठेवलं. मी ते माझ्या मित्राकडून वाचून घेतलं. त्या पत्रात तिने बरंच काही लिहिलं होतं. त्या पत्राची शेवटची ओळ मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती होती, 'तुझ्या नशिबात माझं प्रेम लिहिलेलं असेल तर ते तू कितीही नाकारलंस तरी ते तुला नाकारता येणार नाही.''
''ते पत्र वाचल्यानंतर ही मुलगी नक्कीच वेगळी आहे असं मला वाटलं. माझ्यासारख्या अंध मुलावर कोणीतरी प्रेम करतंय, आपल्या आयुष्याचा भाग बनू पाहातंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आई गेल्यापासून मला कधी कुणाचं प्रेम मिळालंच नव्हतं. धडधाकट, भरपूर पैसे कमावणारा, भरपूर शिकलेला मुलगा तिला सहज मिळाला असता. पण तिने माझी निवड केली.. माझ्यासारख्या अभाग्यावर प्रेम करणं हीच कितीतरी मोठी गोष्ट होती. मी खूप विचार केला पण तिला नाकारू शकलोच नाही.''
सलीमच्या होकाराने दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दररोज ऑफिसमधून घरी जाताना ती त्याला भेटायला यायची. न चुकता काहीतरी खायला आणायची. या दोघांचं हे प्रेम पाहून स्टेशनवर ड्युटी करणारे पोलिसांना खूपच आश्चर्य वाटायचं. पण त्यांनी या दोघांना खूप मदत केली. सलीमचं या सर्वाशी असं एक वेगळंच भावनिक नातं तयार झालं होतं.
त्या दोघांच्या भेटी अशा वाढतच होत्या. सिमरन नोकरी करायची तेव्हा ते दादरलाच प्रीतम हॉटेलमध्ये गप्पा मारत बसायचे, नंतर ते दोघं मुंबईमध्ये फिरायला लागले. ते फिरायला गेले की लोक त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहायचे. कोण त्यांच्याकडे कसं पाहातंय हे ती त्याला हळूच सांगायची. दोघांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपटही पाहिले आहेत. ती पाहायची अन् तो ऐकायचा. ''चिमणी पाखरं'' हा त्या दोघांनी थिएटरला जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट. चित्रपट पाहून आल्यावर आज मी चित्रपट ऐकला असं सलीम त्याच्या मित्रांना सांगायचा. पण सिमरन त्याला ऐकला असं न म्हणता पाहिला असं म्हणायला सांगायची.
''एकदा सिमरनने मला वाद्रय़ाला भेटायला बोलवलं. मी अध्र्या तासात वांद्रय़ाला पोहोचलो. ती आणि तिची मैत्रीण माझ्या आधीच स्टेशनवर पोहचल्या होत्या. पण मला मात्र तिच्यासोबत तिची मैत्रीण होती हे ठाऊक नव्हतं. मी गेल्याबरोबर तीने नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर हात टाकला अन् काहीतरी बोलली. पण तिचा आवाज मला वेगळा वाटला. मी लगेचच तिला विचारलं. तेव्हा तिनं तब्येत बरी नाही असं सांगितलं. तरीही मला ती सिमरन नाही असंच वाटत होतं म्हणून मग मी माझ्या खांद्यावरचा तिचा हात हळूच हातात घेतला. तिच्या नकळत बोटातली अंगठी तपासली. ती सिमरनचीच होती. मग माझा संशय जरा दूर झाला. आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. तेवढय़ात सिमरनचा आवाज आला. ''सलीम ये क्या चल रहा है?'' अन् त्या दोघीही मोठ्याने हसायला लागल्या. काय झालं पहिल्यांदा कळलंच नाही. पण नंतर कळलं की जिच्याशी मी इतका वेळ बोलत होतो ती सिमरन नव्हे तर तिची मैत्रीण होती आणि सिमरन हे सगळं बाजूला बसून ऐकत होती. त्या दोघींनी मला त्या दिवशी फसवायचं असं ठरवलं होतं अन् मी पूर्णपणे फसलो होतो.''
अशाच भेटींमधून ते दोघंही एकमेकांसमोर हळूहळू उलगडत गेले.
''तो खूप हळवा आहे. त्याला भेटायला गेल्यावर मी नेहमी काहीतरी खायला घेऊन जायचे. त्याला भरवायला लागले की त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायचं. मी त्याला अनेकदा त्याचं कारण विचारलं पण तो काहीच बोलायचा नाही. पण एके दिवशी तो स्वत:च म्हणाला की, तू भरवायला लागलीस की मला माझ्या आईची आठवण येते. ती असती तर माझी एवढी फरफट कधी झाली नसती. मला घर सोडावं लागलं नसतं. त्याच्या आयुष्यातली आईची उणीव मला नेहमीच जाणवली आहे. आजही त्याला आईची आठवण आली की घरातली तिच्या फोटोची जुनी फ्रेम जवळ घेऊन तो बसतो आणि तिला शोधायचा प्रयत्न करतो.'' सिमरन सांगत होती.
त्यावेळी त्याची आई हीच त्याचा सर्वात मोठा आधार होती. स्वत:च्या आयुष्याला थारा नसताना मूल सांभाळणं कठीण असतं. त्याच्या आईला त्याच्या भविष्याची खूप काळजी वाटायची.
''मला उराशी कवटाळत ती ढसाढसा रडायची. दृष्टी मिळावी म्हणून तिने कितीतरी नवस-सायास केले. वडीलांकडं हट्ट करून अनेक मोठ्या डॉक्टरांकडे मला नेलं. औषधांनी माझ्या दृष्टीत फरक पडेल असं एका डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्या दिवशी तिला केवढा आनंद झाला होता. 'माझा मुलगा बरा होणार' असं त्या आनंदाच्या भरात शेजारपाजारच्या सगळ्यांना तिनं सांगून टाकलं. वडील दिवसरात्र काबाडकष्ट करायचे आणि माझ्यासाठी महागडं औषधं आणायचे. मला पुन्हा दिसू लागेल अशी आशा सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली होती.
पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं..
मी सहा-सात वर्षांचा असेन. आईचा अपघात झाला आणि त्यातच ती गेली. आई गेल्यानंतर सगळंच चित्र बदललं. माझा मोठा आधार गेला. माझी औषधं बंद झाली आणि माझं हे जग माझ्या डोळ्यांनी पाहण्याचं स्वप्नं तिथेच भंगलं.. ती माझी फक्त जन्मदात्री नव्हती, ती माझ्या अंधारआयुष्यातली मिणमिणती ज्योत होती, माझे डोळेही तीच होती अन् माझ्या आधाराची काठीही.. तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे आयुष्य नव्हतंच कधी. होता फक्त अंधार, कधीही न संपणारा.. सलीम सांगत होता.
आई-गेल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. घरात सावत्र आई आली. पण तिने त्याला कधीही स्वीकारलं नाही. वडिलांनी जवळ घेऊन कधी डोक्यावर मायेने हात फिरवला नाही. त्यामुळं त्याला प्रेम कधी मिळालंच नाही.
सिमरनने त्याच्या आयुष्याचा तो हळवा कोपरा व्यापला होता. पण घरातली परिस्थिती जैसे थेच होती. तो घरी पैसे देऊनही त्याला फारशी किंमत नव्हती. सिमरनची घरच्या लोकांशी भेट घालून द्यावी म्हणून सलीम एकदा तिला घरी घेऊन गेला. घरच्यांशी तिची ओळख करून दिली. पण त्याची सावत्र आई तिच्याशी काहीच बोलली नाही. त्याच दिवशीचाच आणखी एक असाच प्रसंग. सलीम जेवत होता. सिमरन बाजूलाच उभी होती. सलीमच्या ताटातली भाजी संपली. सिमरनने हे पाहिलं आणि ती त्याला भाजी वाढायला समोर गेली. पातेलं हातात घेताच सलीमच्या आईने तिला थांबवलं. तिला भाजी वाढू दिली नाही. सिमरनला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. कारण हे त्याच्यासाठी रोजचं असलं तरी तिच्यासाठी ते नवीन होतं. पण ती आईला उलट बोलली नाही. ती तिथून निघून गेली. घरून तिने त्याला फोन केला आणि ढसाढसा रडायला लागली. ती फक्त एवढंच करू शकत होती..
या प्रसंगानंतर तिला त्याचं घर व्यवस्थित कळलं. त्याच्या दु:खाचं कारणही तिला माहीत आहे. त्यामुळे तो त्यातून बाहेर यावा म्हणून ती नेहमी प्रयत्न करते. एकदा तिचा ग्रुप पिकनीकसाठी रिसॉर्टला जाणार होता. सिमरनने सलीमलाही बोलावलं. पण त्याला पाहिल्यानंतर तिच्या मित्रांनी टिंगलटवाळी सुरू केली. ''अरे, याला तर एकच बॅटरी आहे आणि तिचाही काही उपयोग नाही.'' अशा अपमानास्पद कमेंट्स पास केल्या. सिमरनला ते सहन झालं नाही. तिला खूप राग आला.
''दोन बॅटरी असणाऱ्यांनाच मन असतं आणि सिंगल बॅटरीवाल्याला ते नसतं का, डोळे असणाऱ्या तुम्हा आंधळ्यांपेक्षा डोळे नसलेला सलीम खूप चांगला आहे'', असं बरंच काही तिने त्या सगळ्यांना त्या वेळी सुनावलं.
''ते माझ्या प्रेमाचा अपमान करतील, त्यावर हसतील ते माझे चांगले मित्र असू शकत नाहीत'' असं सांगून तिने पिकनीक अध्र्यावर सोडली आणि सलीमला घेऊन ती तिथून निघून गेली. पुन्हा ती त्या ग्रुपमधल्या मुलांशी ती कधीही बोलली नाही.
सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच यांच्या प्रेमकहाणीत एक वादळ आलं.
सिमरनच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं की ''आपकी लडकी किसी नाभिने (अंध) लडके के साथ घूम रही थी।'' साहजिकच त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण घरातलं वातावरण अत्यंत कडक शिस्तीचं, खानदान की इज्जत जपण्यासाठी काहीही करू शकणारं.. तिथं प्रेम या शब्दाला कसलाच थारा नाही. आपल्या मुलीने एका अंध मुलावर प्रेम करावं, तेही स्टेशनवर उभं राहून बासरी वाजणाऱ्या. ही गोष्टच त्यांच्या कल्पनेपलीकडची होती. त्यांनी सिमरनला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ''प्रेमाने पोट भरत नाही, त्यासाठी भाकरी लागते'', असे डायलॉगही ऐकवण्यात आले. पण तिने तिचा निर्णय बदलला नाही. रोज नवे बहाणे करून ती त्याला भेटायला जायचीच. पण काही दिवसांनी ते तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिला घराबाहेर पडायला बंधनं घातली गेली. नोकरी सोडायला भाग पाडलं गेलं.
त्यामुळे त्याला भेटणं तर फारच अवघड झालंय.
मात्र या वादळातही ही दोघं आज घट्ट पाय रोवून एकमेकांना सावरत उभे आहेत. एक दिवस हे वादळ नक्की शमेल आणि आम्ही कायमचे एकत्र येऊ असा दोघांनाही विश्वास आहे.
''मला माहिती आहे, आज तिला माझ्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागताहेत. पण मला त्रास होईल म्हणून ती कधीच काही सांगत नाही. उलट मी खूप आनंदात आहे. तू फक्त तुझी काळजी घे एवढंच सांगते. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून सुख, आनंद नावाची गोष्ट खऱ्या अर्थाने मला अनुभवता आली. ती माझी फक्त प्रेयसीच नाही तर आई, वडील, मित्र हे सगळं आहे. तिनेच माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलाय. अंधारलेल्या जगातली ती माझी प्रकाशवाट आहे'', सलीम सांगत होता.
आज ती त्याच्यापासून भेटायला न मिळाल्याने थोडी दूर गेलीय त्यामुळे तो थोडा एकटा पडलाय आणि या एकटेपणात तिच्या आठवणींसह त्याच्यासोबत आहे ती फक्त त्याची बासरी.
ही बासरी त्याच्या आयुष्याचा कणा आहे.
त्याची आणि बासरीची पहिली भेट झाली शाळेत असताना. अगदी योगायोगाने. त्याने सांगितलेली बासरीची कथा खूपच रंजक होती. ''शाळेतील संगीताच्या शिक्षकांनी बासरीच्या वर्गासाठी विद्यार्थीची निवड करायचं ठरवलं. त्यासाठी प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची निवड केली. एकदा ते आमच्या वर्गात आले. ''एकूण सूर किती'' त्यांनी मुलांना प्रश्न विचारला. अनेकांनी अनेक उत्तरे दिली. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी सात असे अनेकांकडून अनेक सूर समोर आले. सरांनी मला विचारलं, पण त्याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं. परंतु शेजारच्या माझ्या मित्रानं मला त्याचं उत्तर हळूच कानात सांगितलं. मी उत्तर दिलं. संगीतात एकूण १२ सूर असतात. माझं उत्तर बरोबर आलं म्हणून सरांनी बासरीच्या वर्गासाठी माझी निवड केली. पण माझ्या ज्या मित्राने त्या प्रश्नाचं उत्तर मला सागितलं होतं त्याला मात्र बासरीच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, कारण त्याला दम्याचा त्रास होता. त्याचं मला आजही वाईट वाटतं. माझ्या मित्राने सांगितलेल्या एका उत्तराने आज मला आयुष्याची भाकरी मिळाली आहे.''
''मला नेहमी वाटायचं घर सोडून निघून जावं. पण मला नीट चालताही येत नव्हतं, मग पळून जाणार कसा? तरी एक दिवस मी घरातून पळून जायचा निर्णय घेतला. चालताना, पायऱ्या उतरताना, चढताना अंदाज कसा घ्यायचा, गर्दीतून कसं चालायचं, रस्ता कसा ओलांडायचा याचं सगळं तंत्र मी एका मित्राकडून शिकून घेतलं. काही महिन्यांनंतर ते मला जमायलाही लागलं. शेवटी एक दिवस मी अंगावरच्या कपडय़ांसह शर्टात बासरी अडकवून घर सोडलं. थेट मध्यप्रदेशात गेलो. स्टेशनवर, रेल्वेत बासरी वाजवून मिळालेल्या पशांवर पोट भरू लागलो. आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असा रोजचा प्रवास सुरू होता. थंडीचे दिवस होते. जवळ काहीच नव्हतं. पसे नव्हते असं नाही, पण रोजचा प्रवास असल्यानं घेतलेली वस्तू ठेवायची कुठे हा प्रश्न होता. मजल दरमजल करत एक दिवस मध्यप्रदेशातील खांडव्यात पोहचलो. तिथे अनेक चांगली माणसं भेटली. रेल्वे स्थानकावरच्या पोलिसांनी खूप मदत केली. आसराही दिला, मात्र अशी मदत करताना त्यांनी एक अट घातली.. मी त्यांना रोज संध्याकाळी काही गाणी ऐकवायची. मी त्यांना गाणी ऐकवू लागलो. काही दिवस तिथेच राहिलो. एक दिवस तेथील पोलीस इन्स्पेक्टरने मला घर सोडण्याचं कारण विचारलं. मी त्यांना सगळी हकिकत सांगितली. दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन घरी आले. आई-वडिलांना समज दिली आणि मी पुन्हा एकदा घरात आलो.''
घरी परतल्यानंतर तो मुंबईतल्या स्टेशनवर थांबून बासरी वाजवायला लागला. चांगले पैसे मिळवू लागला.
या बासरीनं केवळ त्याचं पोटच भरलं नाही तर त्याच्या एकटेपणात त्याला नेहमीच साथ दिली. आजपर्यंत आयुष्यात आलेलं प्रत्येक दु:ख या बासरीनंच त्याला विसरायला शिकवलं. दोन महिन्यांपूर्वी ती त्याला शेवटचं भेटली. त्या दिवशी निरोप देताना मी परत येईन असं वचन देऊन ती निघून गेलीय. आजही स्टेशनच्या पुलावरील गर्दीत त्याच्या बासरीचे सूर मिसळताहेत. काहीतरी शोधत आहेत.. दादर स्टेशनच्या पुलावर तुम्ही कधी गेलात तर सलीमचे ते सूर तुमच्याही कानावर पडतील.
लेखक - विलास बडे
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
१४ फेब्रुवारी जवळ आला की आमच्या शेजारी राहाणार्या दादाची 'तयारी' सुरू होते.
नवे कपडे. नव्या आयडिया. काय काय खरेदीही सुरू असते !
सगळे जण त्याला चिडवतात; पण त्याच्या तोंडावर नाही हं. आम्हीपण त्याची मुद्दाम फिरकी घेतो. वेड घेऊन पेडगावला जातो. त्याला वाटतं आम्हाला काही कळतच नाही. १४ फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेण्टाईन डे' हे काय आम्हाला माहीत नाही? यालाच 'प्रेम दिवस'ही म्हणतात ना? कॉलेजात या दिवशी खूप गर्दी असते. पोलिसांनाही बोलवावं लागतं म्हणे !
आमचे सर सांगतात, अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका, म्हणजे इतरांवरही आपण आपोआप प्रेम करायला लागतो.
आपल्या स्वतःच्या गोष्टी तरी आपण प्रेमानं करतो का? आपली स्वच्छता, कपडे, अभ्यास, शिस्त..
खरं तर प्रेम ही किती सोपी गोष्ट. साधं प्रेमानं बोललं तरी खूप काही साध्य होतं.
आपण बोलतो प्रत्येकाशी प्रेमानं? भाऊ-बहीण, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शेजारी..
रोज कितीतरी जणांशी आपला संबंध येतो. आपल्याकडे रोज येणारे दूधवाले काका, कामावाल्या मावशी, रिक्षावाले काका.. या सगळ्यांशी आहेत आपले प्रेमाचे संबंध?
दादाच्या 'प्रेम दिवसा'च्या तयारीचं जाऊ द्या..
आपण आपलं रोजच प्रत्येकाशी प्रेमानं बोलत जाऊ. आपला राग आवरायला शिकू. दुसर्याला मदत करू. आपण दुसर्याशी प्रेमानं वागलं की इतरही आपल्याशी प्रेमानं वागतील. आपल्यासाठी प्रत्येकच दिवस मग 'प्रेम दिवस' होईल !
त्यासाठी वेगळा दिवस साजरा करायची वेळच आपल्यावर येणार नाही ! :)
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .
एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.
काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.
जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"
तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."
एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,
"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."
नेहा सकाळी उठली बाहेर.. आली तेव्हा दारात पत्र पडलेल मिळाल ..हलकेच तिने ते उचलल आणि वाचू लागली, थोडी तबकली चुक माझीच म्हणत रडत खाली बसली..म्हणाली मीच केल फोर्स अरूणला म्हणून पुन्हा त्याने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल. आणि दोन महिन्यातच अशी कशी त्याची बेपत्ता होण्याची खबर आणि तीही पत्राने कळते.. म्हणजे आता अरुण पुन्हा कधीच दिसणार नाही का ... तिने स्वत ला सावराल आणि काश्मीरला फोन केला.. पत्रात तर फक्त बेपत्ता झाल्याची बातमी पण आता तर फोन वर त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून नेहा कोसळलीच श्वेता ला हाक मरलि.. म्हणाली तुझा अरुण दादा गेला ग. मला सोडून एकटीलच.. अन् धमासा धमसी रडायला लागली...
..काही दिवस गेले ....तीच एकटेपण तिला खायला उठल होत ....हे सगळ ती श्वेता बरोबर शेयर करत असे...श्वेता लाही ते कळू लागल होत की नेहाचहि आयुष्य आहेच ... पण त्या आयुष्यात आता अरुण ची जागा कोणीतरी घ्यायला हवी . मग कित्येक दिवस नेहाने असेच अरुण च्या स्टडी रूम मध्ये बसून काढले अरुण च्या आवडीची पुस्तक वाचण्यात तिचा वेळ जाऊ लगल.. असाच एक दिवस " रणांगण" पुस्तक वाचताना तिला त्यात अरुण ने लिहिलेला एक कागद मिळाला..
" मी जाईन ग कधीतरी तुला एकटीला सोडून पण एक कर कधी एकटी राहू नकोस माझ्याशिवाय कधीच............ शेवटची इच्छा --- तुझा अरुण.. "
नेहा धावत होति. कारण तिला 7.20 च्या बस ने श्वेताला गाठायच होत. बस मध्ये चढतच तिने सगळीकडे नजर फिरवली आणि श्वेता दिसल्यावर ती तिच्या बाजूला जाऊन बसलि. तिला म्हणाली आज तुझी खूप आठवण येत होति. आणि रडायालाच लागलि... म्हणाली हे बघ अरुण ने काय लिहून ठेवलय ते ...
श्वेता म्हणाली अग वहिनी तुला आता असा विचार करायलाच हव.. अरुण दा साठी नाहीतर माझ्या साठी आणि तुझ्यासाठी..
आज मात्र अगदी श्वेता च्या मनासारख नेहा ने केल होत आणि ...अर्थातच अरुण ची शेवटची इच्छा ही तिने पूर्ण केली होती..
"आज नेहाच लग्न झाल...एक चांगल्या माणसा बरोबर..सुखात जगेल आता ती हो ना अरुण दा?.... श्वेता रडत अरुण च्या फोटो समोर उभी राहून बोलत होती ..
ती वळली अरुण च्या स्टडी रूम मध्ये गेलि...तिनेहि " रणांगण" पुस्तक काढल त्यातून कागद बाहेर काढला आणि फाडून टाकला ... आणि म्हणाली मीच लिहिलेल्या काही ओळिनी नेहा च्या आयुष्यातला एकटेपणा निघून गेला .. चांगल केल ना अरुण दा मी..... ??
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही ............................
जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"
मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ........... पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे challenge स्वीकारत आहे !".
एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते .................. पण ...............
घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते
आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ...... कंठ दाटून आलेला ......
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........
तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते ,
" कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला challange करावे लागले ................आणि तू ते करून दाखविलेस, Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे .......!!!"
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ......नक्कीच वाचा: विचार करा.
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना
आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय.
हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर...
माझी प्रिय
पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते "प्रेम, जवळीक आणि विश्वास"
वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "
आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
" जे आहे-- जे प्रेमात आहे,
जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...!!"
जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...!!"
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
एक छोटीसी प्रेमकहाणी
देव म्हणाला
बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल ,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं ,
तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!!
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
हृदयस्पर्शी पण छोटी कथा - "क्षितीजा पलीकडील प्रेम" (Love beyond horizon)"
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला
सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे...........
सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे...........कारण आमचे प्रेम खरे आहे "
विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal........!!
(10 दिवसांनतर)
राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,
त्या पत्रात लिहिले होते की,
"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत
नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय
जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका
छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"
I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी
(हृदयवासी) विशाल
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..
तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो
इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली..
शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन भिडली...
तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो..
तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो...
ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं..
क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला....
तीच ते हसू बघून दिल garden garden झाला...
दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो
बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो ..
हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली..
मग ती कस तिकीट काढणार?
म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली..
अस होत होत चहा झाला कॉफी झाली..
दोन पिक्चर झाले तिच्या birthdaychi party झाली..
म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव
तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव ..
म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल आणलं..
नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल..
तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात पत्रिका ठेवली
म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement झाली "
म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो?
सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल
आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं..
२३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो
तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून आलो.
…………………
जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो
पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही
आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...
एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते.
पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.
एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या
(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले
"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?"
जलदेवता म्हणाली, "रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."
इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."
जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."
जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
"हाच माझा लॅपटॉप !!"
जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले.
दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, "मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ?" प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला .
दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले,
"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे - नाही नाही - बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार ?"
जलदेवता म्हणाली,
"रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."
इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले,
"यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?"
लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला,
"माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता."
जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.
प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला.
लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला :)
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
( लय्भारी,,,म्हंजी अक्शी फुल्टूफट्याक ...वाचायला थोडा त्रास झाला ....पण खूप गमतीशीर संवाद आहेत ..मूळ लेखक कोण हे माहित नाही )
अलीकडेच सातार्ला (साताऱ्याला) जाण्याचा योग आला. इथेही मोबाईल (इकडे शेल्फोन म्हणतात)धारकांची वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी होती. ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल हाताला आणि हात कानाला. इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात 'र्बमगठिव्का' आणि 'र्बमगठिव्तो' हे दोन शब्द पुन:पुन्हा उच्चारले जात होते. ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं, मात्र 'र्बमगठिव्का' ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा होत नव्हता. कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी जीवाचे कान करून ऐकू लागलो. यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला. खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना 'र्बमगठिव्का'चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल. तर ऐकूया
संभाषण नं. १.
क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय. कंचा हाय तुजा?
ख : माजा यार्टेल (एअरटेल). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल (बी.एस.एन.एल.)
(कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत. कौरेच, कौरेज, कव्रेज, करवेज आणि कर्वेजसुद्धा.)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती. आन् रिंज (रेंज) बी बरी घाव्ते.
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये.
ख : हौ ऽऽ वडा वडाच. आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का, मगं हुच (HUTCH) झालं. आनात्ता वडाफोन.
आणखी बरंच काही संभाषण होत असतं. त्यात अधूनमधून 'र्बमगठिव्का' व 'र्बमगठिव्तो' ही चालूच असतं.
* * * * *
संभाषण क्र. २..
ग : आर्तुहाय्स कुठं, पंध्रा दिस झालं सार्खा ट्राय कर्तुय सरख आप्लं वेट्वची टॅप वाज्तीय. बर्तुजा म्हात्रा आजा कसाय ? ('कसाय'चा अर्थ 'कसा आहे' असा घेणे)..
घ : आर्आजाला गाच्कुन पंध्रा दिस झालं की.
ग : हात्तिच्यामाय्ला! र्आमग येकाद् यश्मेस करायचा का न्हाय.
आणखी बरंच काही आणि अधूनमधून 'र्बमगठिव्का'.
* * * * *
संभाषण क्र. ३
ट : आर्तुजी क्वालर्टुन (कॉलरटय़ुन) बादाल्ली वाट्टं.
ठ : व्हय. जाला की म्हैना, आन् रिंग्टुनबी बदली केलीया. कराची का तुला डांलोड (डाऊनलोड)?
ट : करू की मंग कवातरी. तुज्यात कोंचं शिम्कार्ड हाय म्हंलास.
ठ : माज्यात बीप्येल (बी.पी.एल.)
ट : टॉक्टाय्माचंय का बिलाचंय?
ठ : त्ये काय ठावं न्हाय गडय़ा. तातु म्हन्ला व्हता पिर्पेट (प्रीपेड) क् काय हाय. पन रिंज न्हाय गडय़ा.
ट : आमच्याकड् रिलांसनटाटाची बरी घाव्ते (रेंज). घरात वाईच नेटवरचा (नेटवर्कचा) प्राब्लेम अस्तो. बाकी बाज्रारात झ्ॉक.
आणखी बरंच काही बोलणं होत असताना मध्ये मध्ये 'र्बमगठिव्का' 'र्बमगठिव्तो' होतच असतं.
* * * * *
संभाषण क्र. ४
ड : तुजा हँशेट कोंचा हाय रं ?
ढ : माजा नोक्या. लाँग्लाय्फची (लाँग लाईफ) बॅट्री नोक्याचीच गडय़ा.
बाकी मोट्रोला, सामसुम, येरिक्शन, येल्ची बिल्चीचं काय बी खरं न्हाय बग.
तुजा कोंचा हाय ?
ड : माजाबी नोक्याच हाय. यफ यम, रेडोन्क्यॅम्रा (रेडिओ अन् कॅमेरा)बी हाय.
ढ : माज्यात बी हाय रं. माज्यात विडो
(व्हिडीओ)बी हाय आन् चार जीभीची (जी.बी.) मेम्री पन् हाय.
आणखी बरंच काही बोलणं होत असतं आणि मध्ये मध्ये र्बमगठिव्का. या सगळ्यांबरोबरच मध्ये मध्ये 'आर्पन' (अरे पण),
'हात्तिच्यामाय्ला', 'च्या माय्ला' आणि 'चॅआय्ला' अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत असतो. बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू शकत होतो परंतु हे 'र्बमगठिव्का' माझी पाठ सोडत नव्हतं. शेवटी न राहवून एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं.
मी : हे 'र्बमगठिव्का' म्हंजे काय राव?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला, 'भायर्न आलाय दिस्तासा.'
मी : हो, मुंबईहून.
मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये (विथ अॅक्शन) त्याने मला समजावलं. 'र्बमगठिव्का' म्हंजी, र्बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का. म्हंजी फून (फोन) ठिवू ऽऽ क्काऽ'
(हात्तिच्या मा.. माझ्या तोंडात आलंच होतं. मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही.) 'र्बमगठिव्काच्या' गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो. डोकं हलकं हलकं झालं. इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही. विचार करतच होतो इतक्यात माझा शेल्फोन वाजला. मी हॅलो बोलायच्या आतच पलीकडून जोरात आवाज आला.
'आर्हाय्स्कुठं तू? कवा धर्न ट्राय कर्तुया तुझा सार्खा आप्ला सीचहॉप (स्वीच ऑफ), वेट्व नाय्त आप्लं बीजी.'
मी : कोण बोलताय ?
पलिकडून : आर्मीसर्जा (अरे मी सर्जा).
या सातार्करांची सर्व शब्द जोडून एक वाक्य एका शब्दात बोलण्याची कला मात्र फक्कड हाय बगा. मी कोणा सर्जाला ओळखत नव्हतो. त्याच्याकडून चुकून माझा नंबर लागला गेला असावा. तरीसुद्धा थोडी मजा करावी म्हणून जोरात ओरडून-
मी : आर्पन हिथ्लं नेटवर पार ढय़ापाळंय बग. माजा आव्टाफकौरेचज झालाय. बाज्रात पोचल्याव मंग मीच लावतो तुला, र्बमगठिव्का ?
सर्जा : आर्पन.. मला... आर्र..
त्याचं बोलणं तोडत मी 'र्बमगठिव्तो' बोलून (जवळ जवळ ओरडूनच) माझा शेल्फोन सिचहॉप केला.











































