शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठशिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.


राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊदे अथवा न होऊदे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला 'सर मला मारताय तुमचा बाप मरेल .' संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.

१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.'असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा' अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.

यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊप्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊखूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला 'दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.

पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.

तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.

' अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

एक चिमणी एका पांढरया गुलाबावर प्रेम करत असते. 
एके दिवशी ती आपले प्रेम व्यक्त करते. 
पण गुलाब म्हणतो, की जेव्हा तो स्वतः लाल रंगाचा बनेल, 
तेव्हा तो चिमणीवर प्रेम करेल, चिमणी आपले पंख कापून रक्त गुलाबावर 
सांडते, गुलाब लाल रंगाचा बनतो. पण आता चिमणी जिवंत नसते . 
हेच खरे प्रेम असते , हेच खरे प्रेम असते.................................
 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

     मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा, 
पण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते....
अश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनःस्थिती  मी येथे मांडन्याचा  प्रयत्न करत आहे...
खरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे...

आई…     

आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?                 
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,                 
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?                 

ठाउक आहे मला,                 
आई तू बोलायचिस,                 
बाळा तू फसत आहेस,                   
आतल्या आत का धसत आहेस?                 

ठाउक आहे मला,                 
मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,
तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,
परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...

आई,तरी आज तू मला समजुन घे,
माझ्या केसात हात तुझा फिरवत,
माझा चेहरा वाचून घे,
डोळ्या कड़े मात्र बघू नकोस,
आसवान आड़ तिला डोळ्यातच  राहून दे...

आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,
मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,
आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,
मी सर्व सांगत  असताना मात्र तू धीर सोडू नकोस...

मी तिच्या बद्दल जे काही सांगेन
ते तू खुल्या मनाने ऐक,
तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,
पण तू माझी बाजू  बघून अश्रु ढाळू नकोस,

आई मी कदाचित माझा धीर सोडेन,
रडून-रडून तुझे पदर ओले करेन,
तरी तू तिच्यावर रागावू नकोस,
आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,

तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,
तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,
पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,
विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...

माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,
तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,
आई...तरी ज़रा सबुरिने घे,
मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...

तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,
थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,
तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?



   मुला…

   मुला ,कसे सांगू मी तुला, 
   तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला... 

   असे वाटते तुला जवळ घ्यावे, 
   कुशीत तुझे डोके घेउन , 
   केसांना हळूवार कुरवाळावे, 
   मग हात मागे घेते,कारण समोर असून देखिल,
   तू भासतो कोणात तरी हरवलेला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,
 
   तुला ठाउक नसेल,असेल ही कदाचित,
   मला तुझे दुःख कळते ते...
   अरे आजवर तूच म्हणायचासना,
   आई तुला माझे डोळे कसे कळतात? 
   मग आज असे डोळ्यात आसव लपवत आई पासून का दुरावला ?
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   खर्‍या प्रेमाची व्याख्या मीच तुला सांगितलेली,
   आता प्रश्न पडतो तुला ती का नीट समजलेली?
   राहून गेलेले जे सांगायचे ते आता सांगते ,
   ऐक,मुला खर्‍या  प्रेमामध्ये हार-जित नसते रे,
   पण मीही तर पाहू शकत नाही तुला हरलेला...
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   काल रात्री तू परत तू उशिरा घरी आलास,
   माझे मिटलेले डोळे पाहून पुन्हा उपाशी पोटी झोपी गेला,
   मला वाटले विचारावे काय झाले?
   मी उठलिही बिछान्यातुन,पण,
   तुला रडताना पाहून,माझाही तोल गेला,
   वाटले तुझी समजूत काढावी,हाताचा  बनवून झूला...
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
   रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
   प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
   त्याला जवळ का करते"?
   सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
   पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   मुला,आता तुझे ओलावालेले डोळे पाहून,
    माझे पदरही भिजलेरे..
   तुला नेहमी जिंकताना पाहणारे,माझे डोळे ,
   तुला हरलेला पाहून पुरते खचले रे,
   माहीत आहे शक्य नाही,
   म्हणुनच सांगत नाही,विसर आता तिला....
   मुला ,कसे सांगू मी तुला,
   तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...


प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई....हि कविता लिहिल्या नंतर काहीतरी चूक-चुकल्या सारखे वाटत होते,खरतर मी वरचे-वर ह्या एका नाजूक विषयाला स्पर्षले, पण राहून-राहून वाटत होते कि ह्या सर्वात त्या मुलाच्या वडिलाना मी जाणीवपूर्वक विसरत आहे.
खरतर आपल्या मुलाकडून आई आणखीन त्याचे बाबा दोघांच्याही काही अपेक्षा असतात.मुलगाही मोठा होत असताना ह्या अपेक्षा पूर्ण करतो,पण त्याच्या वाढणाऱ्या  वयासोबत तो प्रेमाची एक व्याख्या बरोबर घेऊनच मोठा होतो.बऱ्याचदा  हि निर्मळ प्रेमाची व्याख्या तो आपल्या आई वडिलांच्या असलेल्या प्रेमाच्या नात्यातूनच शिकत असतो.
    त्यामुळे मला सतत वाटत होते कि जर ह्या मुलाला होणारे अनुभव त्याने शिकलेल्या प्रेमाच्या व्याख्ये पेक्षा जर  वेगळी असेल तर,नकळत हा मुलगा आपल्या आई-वडिलांपासून दुरावत जातो.त्याच्यात होणाऱ्या बदलावाना त्याची आई फार जवळून अनुभवत असते.
पण ह्याच आपल्या तरुण मुलाची मनःस्थिती त्याच्या वडिलां पासून काही काळ  लपून रहाते.कारण वडिलाना आपल्या घरासाठीची जबाबदारी घराबाहेर राहून पार करायची असते.
ह्या सर्वात वडिलाना आपल्या मुलाचे मोठेहोने थोडे उशिराच  जाणवते.आणि जेव्हा त्याना आपल्या मुलाच्या तुटलेल्या प्रेमाच्या स्वप्नाबद्दल कळते तेव्हा ते धड त्याच्याशी मोकळेपणे संवादही साधू शकत नाही.
हि सर्व मुलाच्या  मनाची घालमेल वडील थोडे आशायाच्याबाहेर राहूनच हाताळत असतात.
हि वडिलांची धडपड फक्त त्यांनाच माहित असते.
आणि त्यामुळेच मी अनेक प्रयत्न करुणाही ह्या कवितेत वडिलांची बाजू मांडू शकलो नव्हतो.
आणि कालच (११/०१/२०१०)  t .v . वर सौमित्रांच्या तोंडून ऐकलेली ओळ हे सर्व एकदम सहजपणे स्पष्ट करते.
               वडील म्हणजे express न करता आलेली एक आईच...
                                                                                                       सौमित्र.. ..
आणि हे एकाताच बऱयाच दिवस अडकेलेले काहीतरी मनातून मोकळे झाले

काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...


पहाटे  मी जाताना गाढ झोपेत असतोस,
आणि संध्याकाळी नेमकी माझी परतीची वेळ साधून घर सोडतोस...
कोठे जातोस तिन्हीसांजेला रोज,
मलाही सांग  ,म्हणजे तिथे कधीतरी आपण दोघेमिळून जाऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

आठवते तुला लहान होतास तेव्हा,
मी परतल्यावर,माझ्या हातून खाउची पिशवी हिसकावून घ्यायचास,
तेव्हा भले तुझ्यावर रागे भरायचो मी,
पण मला मात्र  तू नेहमीच तसाच हवा-हवासा वाटायाचास
सांग आता काय आणू मणजे ,बाळा तू परत धावत माझ्या मिठीत येशील,
तुला हवे ते शक्या असेल तर देऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

काल तुला आईच्या कुशीत डोके ठेऊन रडताना पहिले,
कसे सांगू त्या क्षणी मी का-काय हरले,
अरे तुझ्या वयातून मी हि गेलोयाच कि कधीतरी,
कधीतरी,बघ माझ्याकडेही मन मोकळे करून,
मग मी हि साथ देईन तुला,
बघेन मीही घटका-दोन घटकाभर रडून...
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

एखादा रविवार साधून तुला गाठेन म्हणतो,
तर तू शनिवारीच रात्री मित्रांसोबत बाहेर निघून जातो,
मग वाटते,चला बरेच झाले,
तुझे मन तिथेतरी कदाचित जाईल रमून,
पण कधीतरी मला भीतीही वाटते बरका !
कधी उचलू नकोस चुकुनही वाईट पाउल,
 काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

अभ्यासासाठीही कधीच पहाटे जागा न होणारा तू,
हल्ली कधीतरी भल्या पहाटे जागा दिसतोस,
हळूच डोकावून पाहिले,तर डायरीत काहीतरी लिहिताना दिसतोस,
काल मी चोरून तुझी डायरी वाचलीच,
त्यात लिहिलेल्या कविता वाचून न रहावून डोळे ओलावालेही,
वाटले बोलावे,"छान लिहितोस,इंगीनीरिंगच्या  अभ्यासासोबत,ह्याकडेही लक्ष दे,
कवी हो आणि झालाच तर ह्यालाच पुढे करिअर म्हणून निवड",
पण नको,कवी हो सांगेन पण कसे सांगू,कि कवितेसाठी "विरह" विषय निवड,

पण एव्हढे  मात्र आता नक्की सांगतो,
बोलू आपण ह्याही विषयावरही पुढे जाऊन,
 काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

आणि अश्या प्रकारे वडील हा विषय टाळून जातात,पण मुलाच्या मनातील तळमळ त्यांच्या मनालाही एक कळ-कळ देऊन जाते

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका
कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची
आणि आपल काम करत राहायची. 

त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे
वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे.
मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर
होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. 

झुरळ मुंगीपेक्षा
वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला 'सर्' म्हणू लागली. झुरळ कंपनीत
आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त
वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही
म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल.
सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस
सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं.
ते पाहून मुंगी आपली बिचारी खूप दुखी व्हायची. मुंगीला काम करून देखील मग
सिंहाचे बोलणे खावे लागायचे. झुरळाच्या ह्या वागण्याने कंपनीतील इतरही
'झुरळ सर्' म्हणायला लागले. मुंगीच्या डोक्यात मग कंपनी सोडायचा विचार
बळावू लागला. आणि जवळपास दीड वर्षानंतर त्याला आहे त्या कंपनीपेक्षा खूप
मोठ्या कंपनीत जाण्याची संधी मिळाली. 

नवीन कंपनीत आल्यावर मुंगी खूप खुश
झाली. कारण आता झुरळाचा त्रास तिला पुन्हा होणार नव्हता. नवीन कंपनी
डायनासोरप्रमाणे अवाढव्य होती. आणि हजारो मुंग्या, उंदीर, खेकडे, माश्या,
हत्ती, जिराफ, घोडे, हरणे, ढेकणे कामाला असलेल पाहून मुंगी अजूनच खुश
झाली.
नवीन कंपनीत मुंगीवर लक्ष ठेवायची जबाबदारी एका खेकड्याची होती.
दोन
मोठ्या ढेकणांच्या हाताखाली काम करायचं अस मुंगीला सांगण्यात आल. पण दोन
आठवडे मुंगीला त्या कंपनीत नुसतंच बसून ठेवलं. नंतर मुंगीला कामाची
हत्यारे न देता काम कर अस सांगण्यात आल.
काम एका हरिणीचे होते. आणि त्या
कामातील प्रत्येक गोष्टीची परवानगी देण्याची जबाबदारी उंदीरमामाकडे होती.
रोज झालेल्या कामाचा इमेल उंदीरमामाला पाठव अशी ताकीद दिली होती. हत्यारे
नसतांना देखील मुंगीने आपले काम सुरु केले. पण हत्यारानिशी लवकर होणारे
काम हत्यारविना मुंगीला जड जावू लागले. कामाला होणारा विलंब हत्यारामुळे
नसून मुंगीमुळे होतो असा निष्कर्ष उंदीरमामा आणि हरिणीने काढला. हत्यारे
पुरवण्याची जबाबदारी खेकड्याची होती. हत्यारे नाहीत ही माहिती त्याने
हरिणीला दिलेली नव्हती. चूक लपवण्यासाठी मग खेकडा कोणतेही कारण काढून
मुंगीला त्रास द्यायला लागला.
सुरवातीला मुंगीचा 'इमेल' नंतर तिची 'इंग्लिश' असे कोणतेही कारण काढून
त्रास दिला जायचा. मुंगी आपली न झालेली चूक देखील मान्य करायची. आणि
सारखी दुखी देखील राहायची. त्यामुळे तिच्यात 'न्यूनगंड' निर्माण झाला.
झालेल्या कामाचे इमेल पाठवण. आलेल्या इमेलचा रिप्लाय देण्. छोट्याशा
कामासाठी उंदराची परवानगी आणि त्यासाठी सतत इमेल, फोन करून मुंगी आणखीनच
वैतागली. उंदीरमामा परवानगी देतो म्हणायचा. 
पण देत नसायचा. कामापेक्षा
इमेल आणि फोन जास्त होत असल्याने कामावर त्याचा परिणाम जाणवू लागला. आणि
सतत मीटिंग मधून कामाबद्दल मुंगीला ढेकणे रागवायचे. शेवटी मग मुंगीने
देखील ठरवलं की जशास तसे प्रत्युतर द्यायचे.
मग कामात होणाऱ्या उशिराबद्दल मीटिंग बोलावली गेली. ज्या हरिणीचे ते काम
होते. त्या कामाचा लक्ष देणारा उंदीरमामा, एक मांजर, खेकडा, ढेकणे आणि
मुंगी असे जवळपास पाच सहा लोकांची मीटिंग बोलावली. मिटींगच्या
सुरवातीपासून सगळेच कामात उशीर होण्याबद्दल मुंगीलाच दोषी ठरवू लागले. पण
मुंगीने चूक नसतांना माफी मागायला नकार दिला. 
आणि मुंगी पेटली. बोलायला
सुरवात केल्यावर तिने परवानगीसाठी केलेल्या विलंबाला, हत्यारे न
पुरवल्याबद्दल उंदीरमामा आणि खेकड्याची सोलायला सुरवात केली.
ढेकणाचा
देखील समाचार घेतला. आणि आश्चर्य लहान मुंगी समोर उंदीर आणि खेकड्याने
मान टाकली. मुंगीला 'हल्याच्या उत्तरासाठी प्रतिहल्ला' हे सूत्र ध्यानी
आले. तेव्हापासून मुंगीची जहाल मुंगी झाली. आणि त्यानंतर असा त्रास तिला
पुन्हा झाला नाही.


नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा....प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता तो ज्या दिवसापासून राहायला आला त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......Love @ First Sight म्हणतात अस काही.आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......नवीन व्यक्तिन्शी  बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत.
त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची त्यामुळे ती निघून गेली.मी आमच्या विंग च्या खाली आले लिफ्ट च button प्रेस केल.हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.हृदयाचे ठोके वाढले होते हत्तातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते लिफ्ट आली दार उघडल. घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल.त्याने ४ थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू केला.दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.लिफ्ट ने पहिला मजला क्रॉस केला तेव्हा अचानक त्याने स्टॉप च बटन दाबल.मला काही कळलच नाही पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणता आवाज माझ्या कानी पडत नव्हता माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला. माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...?? मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना? परत त्याचा तोच प्रश्न Will u marry me ...??? मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी घेतली तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.मी घरात आले आईने जेवायलातात वाढल पण माझी भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत.जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली.त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली.इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती.पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही.सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधल गान आठवलं

Chocolate lime juice
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी साहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???

खूप उत्साहात सर्व काम आटपत होते. आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस ? मी म्हटलं काम कराव तरी बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली माझ मलाच हसू आल. खरच बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच नाही.कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती. त्या दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साहहोता.तोही आला होता पण आज त्याच्याशी खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे अनेक  विचार मनात येत होते.एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अवघडल्या सारख  वाटत .पण त्याच खेळण इतक छान होत कि मी स्वताला थांबवू नाही शकले.परत रात्री लिफ्ट मध्ये दोघेजण.मला म्हणाला खूप छान खेळतेस .गरबा मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ खेळण मला खूप आवडल.एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले ती कवयित्री होती मग काय मैडमच सुरु झाल माझ्यावर कविता करायला.खूप छान कविता केल्या तिने. त्यानेहि मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला

तुझ्या मनातल्या रंगांना
बघून इंद्रधनुष्यही लाजेल
त्या लाजण्याची एक
अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त गरबा खेळले खेळले कसले त्याच्या प्रेमाच्या रंगात रंगलेच जणू .परत त्या दिवशी लिफ्ट मध्ये गेलो तेवढ्यात आवाज आला wait wait म्हणत जोशी काका धावतच आले. .त्याने लिफ्ट च्या दारात हात टाकला हुशश्श करत जोशी काका आत आले.मग कसल बोलायला मिळत कारण ते सातव्या मजल्यावर राहतात. आम्ही दोघेही मागे उभे होतो.२ रा मजला क्रॉस झाल्यावर त्याने मागून हळूच माझ्या हातात एक letter दिल मी चटकन ते घेतलं आणि पर्समध्ये ठेवलं.घरी आले आणि जेवल्यावर रात्री ते letter वाचायला घेतलं

Dear सोनू

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत. मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.पण मी मात्र खूप hurt झालो.त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षातयायला वेळ लागला नाही. सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................


पत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.पण त्याचा स्पष्टवक्तेपणा माझ्या मनात त्याच्याविषयी असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला .दिवस खूप चान चालले होते .क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे.मग हॉटेलात जाऊन गप्पा व्हायच्या मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी होटेलिंगच व्हायचं . एकदा त्याच्याबरोबर बाइक वरून खारघरला small wondermadhe movie बघायला गेले होते .वाटत होत बाइक वर त्याच्या मागे घटट  मिठी मारून बसाव पण माझ्या पोलिसीमध्ये ते बसत नव्हत.म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला .या दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही त्यामुळे मी स्वताला खूप नशीबवान समजायचे .त्याच्याविषयी मनात आदर वाढत होता .तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते

25 अप्रील् माझा बर्थ डे  होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची विनंती केली मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही सर्विस रोडने चालत येत होतो . बाइक सेर्वीसिंग ला असल्याने त्याने आणली नव्हती .सर्विस रोडला असलेल्या कठड्यावर बरेच कपल बसतात तिथे आम्हीही बसलो त्याने पेस्ट्रिस आणली होती चमचाने ती कापली आणि छोटासा बर्थ डे सेलेब्रेट केला जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदी बदाय होता .बाजूला काही कपल्स बसले होते त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही ऑक्वर्ड फिल होत होत.त्याने मला विचारलं तुझ वय काय ?मी काहीच बोलले नाही. मग तोच अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच मी फक्त मान हलवली .मग त्याने एक वेगळीच इच्छा प्रकट केली मला म्हणाला ,मला तुला १८ वेळा किस करायचं आहे as ur bday gift म्हणून .पहिले मी शॉक झाले पण मग त्याच हसन पाहून वाटल मजाक करत असेल .मी नाही म्हटलं .त्याने माझा हात हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत म्हणाला हे तुझ गिफ्ट माझ्या प्रेमाची आठवण ,कधी माझी आठवण आली कि याच्याकडे बघत जा .मला ते गिफ्ट खूप आवडल नेमक त्याच दिवशी पपाना प्रमोशन  मिळाली त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक पपांची बाइक समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले पपांनी नजरेनेच मला मागे बसण्याची खून केली त्याचा चेहरा तर पांढराफटक  पडला होता .मी गुपचूप जाऊन पपांच्या मागे बसली .त्या दिवशी पपांनी एवढ मारलं कि मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडे च सर्वात मोठ गिफ्ट मला मिळाल होत


रात्री रडत असताना पप्पा बेडरूममध्ये आले सोबत मम्मी पण होती.डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोनू मला माफ कर पण मी जे काही केल तुझ्या भल्यासाठी केल बाळा . आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत असत तर फक्त आकर्षण तुम्ही मुल लहान आहात त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही पण आम्ही यातून गेलो आहोत त्यामुळेच आम्हाला तुमची काळजी वाटते . मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक पप्पा रडायला लागले म्हणाले सोनू आमच दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेड वाकड पाउल टाकू नये आजपर्यंत आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच पप्पांना पहिल्यन्दा रडताना बघून मी उठले आणि सरळ पपांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो .पप्पानी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले चल फ्रेश हो केक कापायचा ना ..? त्या दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही प्रेमच असत .पप्पानी ड्रेस पीस आणल होत मग रात्री केक कापला आणि झोपायला गेले . बाहेर गार वारा सुटला होता चंद्राचा प्रकाश खोलीभर विखुरला होता . एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील काही सुचत नव्हत काय कराव ते.मग ठरवलं त्याला भेटायचं नाही ते पण २ दिवसातच त्याची खूप आठवण यायला लागली इतकी कि.. मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं .घरात कोणी नसताना त्याला कॉल केला .त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हटलं कि मला विसरून जा मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते.आणि त्याच काहीही ऐकून न घेता मी फोन ठेवला . 

त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणी कडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं.एक दिवस अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला मला खूप वाईट वाटल आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागल.मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच तो माझ्या जवळ येत होता.एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून काढलं .


नुकतीच बारावीची एक्साम झाली होती मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला काही दिवसांनी त्याला कॉल केला तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते खूप वेळ बोलले त्याच्याशी त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये. त्याला सॉरी वगेरे म्हणाले खूप रडले त्याच्यासाठी कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता कोर्स संपताच परत आला .अचानक येऊन त्याने मला सर्प्राइज़ दिल.त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता .काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच काळात नाही पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते. किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत .त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले .रड रड रडले त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले .त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले .माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये. घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल.मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती. माझी मूल्य तत्व मीच संपवली होती,

त्यानंतर फोन वर बर्याचदा बोलायचो भेटताना खूप सावधता बाळगायचो  .पण आता प्रणय खूप बदलला होता त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती.पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या . नेहमी भेटल्यावर हातात हात घेण, चालताना बोटांची गुंफण करण , ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघन हे चालू असायचं .या गोष्टीना मी कांतले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले ; "किस करणे , स्पर्श करणे हेच प्रेम असत का? तस असेल तर मला नाही जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला


त्याच्या बर्थडे ला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव नाही केला सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केल आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला ,मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट  बघते जरूर ये .मी त्याची तब्बल दीड तास वाट  बघितली पण तो नाही आला .तो विसरला होता मला....कायमचा .त्या नंतर  त्याला एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले .त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली .तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली .

तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घर्त्ल्याना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यंचे चांगले संबंध होते आणि समोरची मानस चांगली होती.याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं .याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती.एकदम सज्जन गृहस्थ होते . म्हणून प्रकरण निपटल .त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .







........म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत.गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता . बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू...खरच...... खूप छान खेळतोस .त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल आहे पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची .

मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच  निदान झाल .खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता औषध ,गोळ्या, मांत्रिक, तांत्रीक  काही फायदा नाही झाला . कारण मी आतून पोखरले होते औषधांना माझ शरीरच रेस्पॉन्स देत नव्हत .कावीळ पोटात झाली होती .दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती मम्मी -पापा खूप काळजी घ्यायचे .पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू? का अस फसवलस ? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......एकाच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसूवू  नकोस ..बस !!!! खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत ...


तो तिच्या शेजारी उभा होता .त्याला वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली .तिची आई गप्प झाली होती पप्पांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते .प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस  मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..! तिच्या आईसाठी कारण सोनू गेली होती खूप दूर गेली होती कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती .आणि त्याच शॉक ने तिची आई गप्प झाली होती.तिच्या डाव्या हात प्रणयने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही त्याला पाहताच तो ढासळला.

वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते....

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स' असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण... पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.

खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला, तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे. एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह स्टोरी' माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.''






लोणावळा, चांगले ठिकाण आहे, दोघांना फिरण्यासाठी. पण माझ्या नशिबात ते नाही. गेले दोन वर्षे नियमीत जातोय, मैत्रिणीला नाही तर मित्राला घेऊन. त्याला GF नाही, म्हणून तो नेहमी सोबत येतो. पण आज काहीतरी वेगळेच वाटतेय. मी लोणावळ्यालाच आहे. माझ्या सोबत माझा मित्रच नाही तर सगळा ऑफिस स्टाफ देखिल आहे. आमच्या कंजुस कंपनी-मॅनेजमेन्ट्ला कसे सुचले कुणास ठाऊक, आज इथे चांगले हॉटेल बुक करून सगळ्यांना घेऊन आलेत.
नेहमी प्रमाणे मी व माझा मित्र बाहेर फिरून हॉटेलमधे परत येतो, ऑफिसचा ईतर स्टाफ देखिल बाहेर कुठेतरी फिरायला गेलेला आहे. मला घरी एक फोन करायचाय म्हणुन मोबाईल ट्राय करतो, पण नेटवर्क चा पत्ता नाही. म्हणुन खाली रिसेप्शन काऊन्टरवर फोन लावायला जातो.
रिसेप्शन काऊंन्टरला तर आमच्याच कंपनीची ऑफिस-कॉर्डीनेटर बसलेय. बॉसने बिचारीला इथेपण ड्युटीवर लावलेय का, मला तीची दया येथे.
सगळे बाहेर फिरायला गेलेत, आणि हि इथे एकटीच काय करतेय मला समजत नाही. कदाचीत कुणाचीतरी वाट बघत असेल. मी रिसेप्शन चा फोन घेऊन सोफ्यावर बसतो, आणि नंबर डायल करतो. तेव्हड्यात ती माझ्या शेजारी येऊन बसते. मी फोन चा रिसीव्हर खाली ठेवतो.
अरे, तु बाहेर फिरायला नाही गेलीस?,.... मी बोलण्याची सुरवात करतो.
नाही,.... ती म्हणते.
का?,.... मी विचारतो.
असच!.... ती म्हणते.
असचं?.... तर मग माझ्या सोबत येतेस का फिरायला?,.... आता पर्यंत छप्पन पोरी फिरवल्या आहेत इतक्या सहजतेने मी तीला विचारतो.
Hmm.. ok ठिक आहे,.... ती देखिल तेव्हड्याच सहजतेने गालावर खळी आणत ऊत्तर देते. आज सुर्य पश्चीमेलातर उगवला नसेल ना.. कुणास ठाऊक. असेल देखिल, बाहेर तर सगळीकडे ढग पसरले आहेत
बाहेर निघताना ती तीचे जॅकेट घेते, तर मी छत्री घेतो. बाहेर काही वेळापुर्वीच पाऊस थांबला आहे, पाण्याचे प्रवाह ठीकठीकाणी भरून वाहतायेत. हॉटेलच्या जवळच सेंट् मेरी व्हिला नावाचा एक चांगला स्पॉट आहे. माझा फेव्हरेट. आतापर्यत कितीतरी फिल्म्सच्या-गाण्याच्यां शुटींग इथे झाल्या असतील. आज इथे कोणच नाहीये, फक्त आम्ही दोघे. दरीतुन येणारे ढगांमुळे क्लायमेट मस्तपॅकी रोमॅटींक झालेय. दोघेही पाण्याच्या ओहोळांवरून उड्या मारत एकमेकांना सांभाळत दरीच्या कड्यापर्यंत पोहोचतो. ती जरा जास्तच ऍडव्हेन्चरस आहे. 

दरीतुन ढगांआड मला waterfall दाखवत म्हणते.... Its so beautiful ...ना?
मी मात्र waterfall च्या एवजी तीलाच जास्त बघतोय.
जास्त पुढे नको जाऊस, Its quite slippery here.... मी तीला सुचना करतो,
ती दोन पावले मागे येते.
कंपनीत ईतके दिवस सोबत होतो, पण आम्ही कधी फोनवर ऑफिशीअल बोलण्यापलीकडे गेलो नव्हतो. समोरासमोर क्वचीतच बोलणे झाले असेल. आज हातात हात घेऊन फिरतोय, खुप वर्षांपासुन एकत्र असल्या सारखे. कशाचीच पर्वा नाही....
....प्रिये... मनातही.. काजवा.. नवा नवा... मिलींद ईगंळेंच्या गारव्याच्या ओळी मला अचानक आठवतात. माझा हात पुढे करून तिच्या मनाला साद घालावीशी वाटते.

मी तीच्याकडे पाहतो,
ती नजरेनेच ....काय? असे विचारते.
काही नाही गारव्याच्या ओळी आठवल्या....मी म्हणतो.
ती गोड हसते... अन् मी देखील.
दोघेही पुन्हा एकदा ढगांआड उसळणारे पाण्याचे झरे शोधायला लागतो.
ईतक्यात माझ्या पाठीवर एक थाप पडते, वळून पाहतो तर माझा मित्र प्रश्नार्थक चेहरा करून ऊभा आहे. हा कशाला ईथे आला, मला खरोखर त्याचा राग येतो. ती मात्र चेहय्रावर कोणतेही हावभाव न आणता दुरवर पहात असते.
काय रे, जुन्या मित्रानां विसरलास का?.... तो विचारतो
अरे नाही तर. असच सहज फिरायला आलो होतो...
पण नेहमी तर माझ्या सोबत फिरतोस ना?.... तो ऊगाचच निरागसतेचा भाव चेहय्रावर आणत विचारतो.
बरं झाले ती दुर आहे, तीला आमचे बोलणे एकू जात नसेल.... कदाचीत
थोड्यावेळात आम्ही हॉटेल कडे परत येतो.
हॉटेलमधे सर्वजण गरमागरम सुप पिण्यात बिझी आहेत. माझा मित्र देखिल त्याच्या मधे गायब होतो. इतरांना तो माझ्याबद्दल गॉसिप वैगेरे काही सांगणार नाही याची मला खात्री आहे, मित्र आहे ना..
आम्ही दोघे मात्र रूमकडे वळतो. तीच्या डोअर पर्यंत आल्यानंतर ती जॅकेटमधुन रूमची चावी काढते. माझी रूम वरच्या मजल्यावर आहे.
तीच्यापासुन दुर जाण्याआगोदर मी थोडावेळ तिथेच थांबतो.
Thanks!... मी म्हणतो.
कशासाठी?.... ती विचारते.
माझ्यासोबत आल्याबद्दल,.... मी म्हणतो.
No, Thax to you.... for such a nice trip, तुझ्यासोबत मी सुध्धा Enjoy केले,....
ती पुन्हाएकदा गालावर गोड खळी आणत म्हणते.

Well,....Actually तुझ्या आगोदर मी कधी कुणासोबत Dating वर गेलो नव्हतो....
मी विषय वाढवतोय.
Oh really? दरवाजाच्या चाव्या सोडून ती माझ्याकडे वळते.
ती माझ्या जवळ आलेय, फक्त एका फुटाचे अतंर आमच्यात ऊरलेय. मी तिच्या डोळ्यांमधे हारवत चाललोय अन् ती माझ्या. बाहेरचा पाऊस आणि वारा या क्षणाप्रमाणेच थांबलेले वाटतायेत. सर्व काही स्थब्ध झाल्यासारखे वाटतेय, आणि......
तितक्यात आमचा बॉस कुठुनतरी ऊगवतो. दोघेही त्याच्या अचानक येण्याने भांबाऊन गेलो आहोत. हा ईथे कशाला आला, निट गप बसुन सुप गिळता येत नाही का...मी मनातल्यामनात म्हणतो
अरे तुम्ही अजुन ईथेच?... तो विचारतो. त्याने माझ्या मनातला विचार कदाचीत ओळखला आहे
दोघानांही काय बोलावे सुचत नाही
दोघेजण एकत्र हं! काय विचार काय आहे, यावर्षी लग्नाचे लाडू मिळणार वाटतय....Tont मारून तो हसत बसतो आणि निघून जातो ..
. बॉस आहेना.. काहीही बोलण्याची परवानगी आहे.
मला घाम सुटायला लागलाय, ति गालात हसते आणि लाजुन तिच्या रूम मधे जाते ...
तिच्या पाठमोरया आकृतिकडे पाहताच राहतो ... आणि मनात नकळतपने  तेच गाण सुरु असत ..
" ...प्रिये... मनातही.. काजवा.. नवा नवा...गारवा !!!! "



आधी काही कारणाने घेईन घेईन म्हणता म्हणता घ्यायच्या राहून गेलेल्या भेटवस्तू विकत घ्यायला मी क्रिसमसच्या आदल्या दिवशी सुपर मार्केटमध्ये गेले. तिथल्या तौबा गर्दीला बघता माझी स्वतःशीच कुरकुर सुरू झाली,"आता इथेच जाणार सगळा वेळ.. कित्ती ठिकाणी जायचं बाकी आहे अजून ! क्रिसमसची गर्दी वाढतेच आहे दरवर्षी. किती बरं होईल या सगळ्यातूनच सुटका झाली तर.." असं कुरकुरतच मी खेळण्यांच्या विभागाकडे सरकले आणि तिथल्या महागड्या खेळण्यांकडे बघून किंमतींच्या नावाने बोटं मोडायला सुरूवात केली. इतक्या महागड्या खेळण्यांशी मुलं खेळत तरी असतील का? असा प्रश्न आगंतुकाप्रमाणे मनात डोकावून गेला.

खेळणी बघत असतानाच छोटा, साधारण ५ वर्षाचा एक मुलगा बाहुली छातीशी कवटाळत असलेला मला दिसला. बाहुलीचे केस कुरवाळत हताशपणे तो त्या बाहुलीकडे बघत होता. कुणासाठी बरं त्याला ही बाहुली घ्यायची असेल? अशी मला उत्सुकता वाटली. तोवर तो मुलगा वळून त्याच्यामागे उभ्या असलेल्या एका वयस्कर स्त्रीला म्हणाला,"ग्रॅनी, खरंच आपल्याकडे नाही का गं ह्या बाहुलीसाठी पुरेसे पैसे?"

"तुला माहितेय ना बाळा,तुझ्याकडे नाहीत तेवढे पैसे." एवढे बोलून त्या स्त्रीने त्या मुलाला तिथेच थांबायला सांगून दुसरीकडच्या वस्तू बघायला सुरूवात केली. तरीसुद्धा तो लहानगा ती बाहुली हातात धरूनच उभा होता. 

शेवटी मी त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलंच की ही बाहुली त्याला कोणासाठी घ्यायची आहे. "ही बाहुली माझ्या बहिणीला खूपच आवडली होती आणि तिला ती ख्रिसमससाठी हवी होती. कित्ती खात्री होती तिची की सांताक्लॉज तिला हीच बाहुली देईल म्हणून !"

"देईल की मग आणून सांताक्लॉज तिला ती बाहुली. तू का काळजी करतो आहेस?" 

 .
तो दुःखी स्वरात बोलला,"नाही. ती आत्ता जिथे आहे तिथे सांता नाही जाऊ शकत. मला ही बाहुली माझ्या मम्मीला द्यावी लागणार आहे, मग ती देईल माझ्या बहिणीला जेव्हा ती तिच्याकडे जाईल." त्याचे डोळे पाणावले होते हे बोलताना. "माझी बहिण देवाकडे गेली आहे. पप्पा म्हणतात की मम्मीपण लवकरच जाणार आहे देवाकडे, म्हणून मला वाटलं की ही बाहुली मी मम्मीकडे देईन म्हणजे ती ही बाहुली माझ्या बहिणीला देईल."

काळजात चर्र झालं माझ्या. मान वर करून माझ्याकडे बघत तो मुलगा म्हणाला,"मी सांगितलं आहे पप्पांना, मम्मीला इतक्यात जाऊ नका देऊ म्हणून. तिला वाट बघायला सांगितलं आहे, मी इथून परत जाईपर्यंत." त्याने हळूच त्याच्या खिशातून त्याचा स्वतःचा एक सुंदर फोटो काढला ज्यात तो खूपच गोड हसत होता ,"मम्मीला मी हा फोटोही तिच्याबरोबर न्यायला सांगितला आहे म्हणजे ती मला विसरणार नाही. मला माझी मम्मी खूप खूप आवडते आणि ती मला सोडून कुठ्ठे कुठ्ठे जाऊ नये असं मला खूप वाटतं पण पप्पा म्हणाले की तिला जावंच लागेल, माझ्या बहिणीची काळजी घ्यायला." डबडबल्या डोळ्यांनी तो परत त्या बाहुलीकडे बघायला लागला. मी पटकन माझ्या पर्समधून काही नोटा काढल्या आणि त्या लहानग्याला म्हणाले,"आपण तुझ्याकडचे पैसे परत मोजून बघुया का? काय सांगावं पुरतील इतके झाले असले तर?" आशेने मान डोलवत तो तयार झाला. मी त्याला कळणार नाही अशा बेताने माझ्याकडच्या नोटा त्याच्या पैशात मिसळवून टाकल्या आणि आम्ही मोजायला सुरूवात केली ! बाहुलीकरता पुरेसे पैसे तर झालेच आणि तरीही थोडीशी रक्कम उरली. अत्यंत आनंदित होत तो म्हणाला,"ओह गॉड तू कित्ती चांगला आहेस, मला आत्ता हवे होते तर पैसेही दिलेस तू." मग तो माझ्याकडे बघून म्हणाला,"कालच मी रात्री झोपताना गॉडला सांगितलं होतं ही बाहुली घ्यायला मला पैसे द्यायला.. म्हणजे मम्मी ती माझ्या बहिणीला देऊ शकेल. त्याने ऐकलं माझं. मला मम्मीसाठी पांढऱ्या रंगाचा गुलाब घेण्यासाठीही पैसे हवे होते, पण इतका हावरटपणाही बरोबर नाही म्हणून मी नव्हते मागितले. पण आता माझ्याकडे दोन्ही गोष्टी घ्यायला पैसे आहेत ! माझ्या मम्मीला पांढरा गुलाब खूप खूप आवडतो." अशाच आमच्या गप्पा चालल्या होत्या तोवर ती वृद्ध स्त्री परत आली आणि मी माझ्या सामानाबरोबर पुढे निघून गेले. काही केल्या त्या मुलाचे विचार माझ्या मनातून जात नव्हते. 

   

 दोन दिवसापुर्वीच्या वर्तमानपत्रातली एक दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्यामुळे झालेल्या अपघाताची बातमी आठवली. त्या ट्रकने कारला धडक दिल्याने तो अपघात झाला होता. त्या कारमध्ये एक तरुणी आणि एक छोटी मुलगी होती. अपघातात ती लहान मुलगी तर जागीच गतप्राण झाली होती आणि ती तरुणी अत्यवस्थ होती, असं सांगितलं होतं. त्या तरुणीला जिवंत ठेवण्यासाठीची यंत्रणा चालू ठेवायची की नाही हे फक्त त्या कुटुंबाने ठरवायचं होतं, कारण ती तरुणी कोमामध्ये गेली होती. हा लहानगा त्याच तर कुटुंबातला नाही ना? असा विचार मनात तरळून गेला. 

त्या मुलाशी भेटले त्यानंतर दोनच दिवसांनी मी वर्तमानपत्रात त्या तरुणीच्या निधनाबद्दल वाचलं. मी स्वतःला आवरूच शकले नाही आणि पांढऱ्या गुलाबांचा एक गुच्छ घेऊन तिच्या अंतदर्शनाला गेले जिथे तिचा मृतदेह सर्वांना शेवटचे दर्शन घेता यावे म्हणून ठेवला होता.

कॉफिनमधल्या तिच्या हातात त्या लहानग्याच्या फोटोसोबत एक सुंदरसं पांढरं गुलाबाचं फुल होतं आणि ती बाहुली तिच्या हृदयाशी ठेवली होती.


रडतरडतच मी ते ठिकाण सोडलं. या घटनेनी माझं आयुष्य पारच बदलून टाकलं होतं. एकीकडे त्या क्षणी त्या निरागस मुलाचं त्याच्या आई आणि बहिणीवरचं इतकं अलोट प्रेम दुसरीकडे एका क्षणात एका कुटुंबाचं सर्व सुख मातीत मिसळणाऱ्या त्या दारुड्याचा अतोनात राग.. दोन्हीही सहन करणं हे निव्वळ आवाक्याबाहेरचं होतं.

मूळ कथाकार - अज्ञात ( फॉर्वर्डेड मेलमधून आली होती ही कथा. )
स्वैर अनुवाद - वेदश्री जोशी.
















  आई, असं का ग केलंस?
 ( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )


              उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
 त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
 त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
 ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
 हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा
 असावी.
 आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )



 आई, असं का ग केलंस?
 का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
 मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
 तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
 माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
 आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
 आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
 तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
 राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
 तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
 भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
 हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
 तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
 कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
 ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
 मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
 जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
 माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
 एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
 मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
 त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
 सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
 मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
 रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
 गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
 हे पाहून मला किती बर वाटल होत.
 दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
 तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
 "मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
 थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
 "सर, अबोर्शन करा..."
 डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
 मी पोटामध्ये खिदळत होते.
 दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
 मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
 की माझ्या आईला लवकर बर कर....
 नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
 आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
 मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
 आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
 राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
 आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
 'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
 ............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........


आईचे डोळे


ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.
ईंन्स्पेक्टर आले.
शिकवल्याप्रमान पोर ऊटली.
' येक सात नम ~~~~ स्ते'
' बसा बसा मुलांनो .' ईंन्स्पेक्टर म्हनला.
' मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मी त्याला
गणीतातील काही प्रश्न विचारतो .'
' मिथन्या ऊट . ' मास्तर.
मी ऊबा रायलो . ४७ मार्क झेऊन सामाईत पयला आल्तो बोल.
' १७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल.
' अं ...अं ...' माजी हातभर फाटली .
मना त १० परयंतच पाडे येत वते.
' येकशे चालीस ' मी ठोकल.
' एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगा ना ? हा
चक्क एकशे चाळिस सांगतो .?
' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.
' सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान .'
ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.
ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल ' सर मूलांनी
महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू ?'
' सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.
' चंद्रकांत ऊट . भाषण कर.' मास्तर न आदेश दिला.
चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.
' मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी .
२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.
गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी
चोरी केली न्हाई.
आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले. तीते त्यानी वकीलीच
शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले.
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते
आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय
चाल्ला नाय मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला .
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात
आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता . :) :)


                         लग्नानंतर   आयुष्यात  आलेला पहिला  मुलगा .
वयाने  लहान  पण  मनाने  आणि  बुद्धीने  खूप  मोठा   होता. त्याच्याशी
बोलताना  परकेपणा  कधीच  वाटला  नाही . नेहमी  तो  माझ्या जवळचा  वाटायचा
.कधी  कधी  तर  अस  वाटायचं  कि  विवेक  ऐवजी  हाच  जर माझ्या  आयुष्यात
आला  असता  तर .…..पण  म्हणतात  ना  नियतीने सर्वांच्या  गाठी
बांधलेल्या  असतात  तसच  काही  झाल  असाव . त्याचा फोटो  मागूनही  त्याने
कधी  पाठवला  नाही , तो  नेहमी  म्हणायचं  कि माणसाची  प्रतिमा
त्याच्या  बोलण्यातून  प्रकट  होते . अस  समाज  कि तू आंधळी  आहेस  आणि
तुला   एक  शिल्पकृती  बनवायची  आहे  . मी  खूप प्रयत्न  केला  त्याची
प्रतिकृती  बनवण्याचा  पण  मनासारखी  जमलीच नाही . एका  एकदम  सामान्य
मुलाची  मुर्त्य  माझ्या  हातून  घडली . अस वाटलं  त्याच्या  चेहऱ्यातून
मुख्यतः  त्याच्या  डोळ्यातून  त्याच्या मनातले  सराव  भाव  प्रकट  होतात
. जणू  काही  त्याचे  डोळेच  माझ्याशी मूक  संवाद  साधत  आहेत . एकदा
त्याने  phone केला  आणि   माझ्या आवडीचे  colour   विचारले , मी  तपकिरी
आणि  cream colour सांगितले  . त्याने  त्या  दिवशी  तपकिरी  colourcha
 shirt आणि  cream colourchi pant   घेतली  . मग  माझ्या  मनातल्या
आकृतीलाही  मी तेच  वस्त्र  चढवले . खूप  गोड  दिसत  होता  तो . कधी
motor   cycle   वर  बसून  मला फिरवताना ,कधी  पावसाच्या  सारींपासून
एकाच  छत्रीतून  स्वतःचा  बचाव करताना  दिसायचा . त्याच्याबरोबर  फिरताना
अस  वाटायचं  कि  हा  प्रवास कधीच  संपू  नये  . आणि  लवकर  तो  सत्यात
उतरावा .


                     1 ऑक्टोबरला  माझ्या  वाढदिवसाला  chatting
वरून celebrate   केलेला  तो  वाढदिवस  मी  कधीच  विसरू  शकत  नाही .
ज्या अपेक्षा  मी  विवेक  कडून  केल्या  होत्या  त्या  सर्व  त्याने
पूर्ण केल्या . माझ्याकडून  कशाचीही  अपेक्षा   न  करता ……! कस  जमत  रे
तुला हे . माझा   नवरासुद्धा  काही  न  काही  तर  शारीरिक  सुखाची
अपेक्षा करतो , पण  तू  मात्र  फक्त  देत  गेलास  अमाप  सुख , ज्यात  मी
पूर्णपणे  न्हाऊन  निघाले .
            Orkut मधाळ  तुझ  नाव …..मनापासून  ! तुझ  प्रोफिले  खूप
आवडल  आणि  तुला  मैत्रीसाठी  विचारलं . वाटलं  होत  सर्व  मुलांप्रमाणे
तुही  बोलशील  काय  करतेस ? नाव  काय ? राहायला  कुठे  ? BF   आहे  का ?
फोन   no.दे . पण  तू   यातला  एकही  प्रश्न  विचारला   नाहीस . तुझा
पहिलाच  प्रश्न  मनाला  स्पर्शून  गेला   कधी  कुणावर  प्रेम  केल  आहेस
का ? या  प्रश्नाने  माझ्या   आयुष्याच्या  पुस्तकातली  सर्व  पाने
उलगडली  गेली . पण  खूप  विचारांती  ठरवलं  कि  इतक्या  लवकर  याला  काही
 सांगायचं  नाही . स्वतःची  personal life अशी  कुणाबरोबर  शहरे  करायची
नाही . मी  तुला काहीच  नाही  सांगितलं . घरी  आई  ,वडील  आणि  भाउ
यांच्याबरोबर  राहते . स्वतःची  separate   room आहे  ,कॉम्पुटर
engineering करते  सर्व  खोट  सांगितलं . तास  न  तास  तुझ्याशी  chating
 करायचे  पण  तुला  काही  खर  सांगितलं  नाही  . तीन  दिवसांच्या
बोलण्याने  तू  मला  पूर्ण  जिंकलास . अशा  स्वभावाचा  मुलगा  मी
आजपर्यंत  कधी  बघितला  नव्हता . तुझ्याशी  chatting करताना  रोहन , राज
यांच्याशीही  बोलायचे  पण  त्यांच  बोलन  आणि  तुझ  बोलन  यात  कितीतरी
फरक  hota  . जगापेक्षा  कितीतरी  वेगळा  होतास . तुला  फसवण  मला  जमलाच
 नाही  रे . काय  अशी  जादू  केलीस  कोण  जाणे  पण  चौथ्या  दिवशी ठरवलं
तुला  सर्व  काही   खर  सांगायचं . तसा  scrap   तुला  केला , माझ  लग्न
होऊन  3 वर्ष  झालेत . मी  माझ्या  नवरयाबरोबर  देल्हीला  राहते . हे
सर्व  ऐकून  तू  माझ्याशी  मैत्री  ठेवणार  नाहीस , नको  ठेउस , bye.
एवढाच  scrap   होता  तो . पण  तुही  तितकाच  शांत  reply दिलास  . लग्न
हे  एक  बंधन  आहे , त्यात  तू  अडकली  आहेस .पण  तुझ  मन  अजूनही
प्रेमासाठी  आसुसलेल  आहे  शारीरिक  नाही  तर  मानसिक . मी  ठरवलं  होत
कि  तुला  काही  reply  द्यायचा  नाही . या  आधी  मी  बर्याच  जणांना  अस
 सांगतल  होत  पण  कोणी  मला  reply केला  नाही .  खोटारडी  म्हणून  माझा
 अपमान  केला  . पण  कोणी  माझ्या  मनात  उतरून  बघितलं  नाही  कि  मी का
अस   वागते  ? पण  तू  मात्र  बरोबर  ओळखलस . मनकवडा  आहेस  कि  काय रे
? पूर्ण  जिंकलस  रे   मला   तू  पूर्ण  जिंकलस . ठरवलं , कि   तुला सर्व
सांगायचं .


            College मध्ये  असताना  विवेकशी  प्रेम  झाल . जातीच्या
कारणामुळे  पळून   जून  कोर्टात  लग्न  केल . विवेक  oberoy च्या 'साथिया
' फिल्म  सारख  शेवटी  घरी  कळल्यावर  आम्ही  gajiyaabadla flat   घेऊन
राहायला  लागलो . सुरुवातीचे  दिवस  खूप  सुखात  गेले .विवेकाने  फक्त
चंद्र  तारे  तोडून  ते  माझ्यावर  उधळायचे  बाकी ठेवले  होते . इतके
सुख  त्याने  मला  दिले . पण  काही  दिवसातच ग्रहणाचे  काळे  ढग  आकाशात
दिसायला  लागले  ते  माझ्या  सासुबाइन्च्या  रूपाने . तिला  मी  सून
म्हणून  मान्य  नव्हते  .पण  विवेकसमोर त्या काही  बोलायच्या  नाही . पण
तो  office ला  गेल्यावर  मात्र  बारा  तास मला  टोमणे  सहन  करायला
लागायचे . तो  थकून  यायचा  म्हणून  मी  त्याला  काही  न  सांगता  सहन
करत  होते  . पण  एकदा  सहन  करण्याची  क्षमता संपली  आणि  त्याला  सर्व
काही  सांगितलं . आश्चर्य  म्हणजे  त्याने त्याच्या  आईची  बाजू  घेतली .
Tevhaa  मी  2 महिन्यांची  pregnant होते . भांडणामध्ये  त्याने  मला
ढकललं    आणि  मी  kitchen च्या  ओट्यावर पोटाशी  पडले . हा  माझा  पहिला
miscourage. सासूबाई  सर्व   बघत होत्या  पण  काही  बोलल्या  नाही .
त्यानंतरही  एका  वर्षाने  असाच  झाल तेव्हा  मी  जमिनीवर  पडले  तो
दुसरा  miscourage . मला  काही  कळायचं नाही  कि  काय  कराव  आई
वडिलांकडे  जायला  तोंड  नव्हत  .सर्काशिताल्या  वाघासारखी  माझी  अवस्था
झाली  होती . नंतर  मी  काही  बोलायचे  नाही .सासूबाई   lucknow ला
निघून  गेल्या  आणि  सर्व  त्रास  कमी  झाला . पण विवेकबद्दल  असलेल
प्रेम  कितीतरी  पटींनी  कमी  झाल  . ज्या  मुलासाठी मी  स्वतःच्या  आई
वडिलांचा  विचार  न  करता  घरातून   पळून  आले . त्याने  माझा   जराही
विचार  karu  नये  ? दिवसभर  घरात  बसून  कंटाळा यायचा  मग  time pass
म्हणून   orkut वर  एक  fake account उघडल  आणि सहज  म्हणून  मुलांसोबत
time pass करायचा  मजा  यायची  सर्वांना छाल्ताना  , मी   chat करताना
त्यांची  उत्सुकता  अगदी  शिगेला पोहोचायची   खूप  खेळायचे  त्यांच्या
मनाशी  , आणि  मग  कंटाळा  आला  कि  त्याला  सांगायचं  माझ  लग्न  झाल
आहे . तो  मुलगा   आपोआप  बोलायचं बंद  करायचा .पण  तू  तास  काही  केल
नाहीस  . बाकीच्यांना  कलाल    कि माझ  लग्न  झालेलं  आहे  ,तर  कधी  मला
विचारायचे  नाही  कि  तो  कसा आहे ? काय  करतो ? पण   तू  मात्र  मला
त्याच्याविषयी  सर्व  विचारलास मलाही  तुझ्यापासून  काहीही  लपवता  आल
नाही  .जी  गोष्ट  मी   आजपर्यंत  माझ्या  मित्र  -मैत्रीणीना    आई
-वडिलांना देखील   नाही   सांगितली तइ   सर्व  तुला   सांगितली
तुझ्याशी    बोलताना   वेळ   कसा  निघून जायचा   कळायचं  सुद्धा   नाही .
           त्या  दिवशी  पहिल्यांदा  तू  call केलास  , पहिल्यांदा  मी
तुझा  आवाज  ऐकत  होते  .तुझ्या  बोलण्याकडे  maaz  लक्षच  नव्हत , तुझी
मधाळ  वाणी  , बोलण्यातला  आदब्शिर्पना , नम्रता  यातच  मी  गुंग  झाले .
गमतीने  तुला  विचारलं  कि तू  गायक  आहेस  का ? माझ्या  सात
पिड्यांपासून  एकही   गायक  आमच्या  घरात  जन्मला  नाही  हे  तुझ  उत्तर
, मग  chatting करतानाही  तुझा  आवाज  ऐकत  आहे  अस  वाटायचं . 3 महिने
झाले  आपल्या  मैत्रीला  मी  तुझे  सर्व  उपदेश  पाळण्याचा  प्रयत्न  करत
 होते . दर  मंगळवारी  तू  माझ्यासाठी  प्रार्थना  करायचास , स्वतःसाठी
का   नाही   मागितलास  रे  ? का  आम्हालाच  भरभरून  दिल ? तू  नेहमी
म्हणायचास  कि   everything will be all right देव  सर्व  काही  ठीक करेल
.  तो  माझी  प्रार्थना  जरूर  पूर्ण  करेन .
             विवेक  आणि  मी  काही  दिवसांसाठी  जेव्हा  दिल्लीला  गेलो
तेव्हा  तुझ्याशी  नित  बोलताच  आल  नाही . कधी  जाव  तुझ्याशी  बोलते अस
वाटत  होत  . पाच  दिवसांनी  गाजीयाबाडला  आलो  , मी  सतत  विवेक च्या
office मध्ये  जाण्याची  वाट  बघत  होते . त्याने  जसा  घराच्या बाहेर
पाय  ठेवला  तसच  विजेच्या  वेगाने  येऊन  कॉम्पुटर  चालू  केला आणि
आश्चर्याचा  धाक्का  बसला   तुझा  एकही  scrap नव्हता . तुला   call
करण्याचा  प्रयत्न  केला   पण  तोही  लागत  नव्हता  मी  खूप  वेळ  विचार
केला  मग  म्हटलं  मी  इथे  नसल्याने  तू  scrap   केला  नसशील  .तुला
scrap पाठवले   SMS केले  पण  काही  उत्तर  मिळाले  नाही  .एवढा  राग
येतो  तुला  माहित  नव्हत  कारण  गेल्या  3 महिन्यात  एकदाही  रागावला
नाहीस  आणि  आज  मात्र    एकदम  नातच  तोडून  टाकल्यासारख  वागत  होतास .
2 दिवस  मी  वाट  बघितली  कॉम्पुटर  समोर  बसून  .तुझ्या  online
येण्याची  vaat बघत  होते  पण  तू  online आला  नाहीस  . तुझा  एकही
reply आला  नाही . मग  मात्र  खूप  बावरले  काय   घडल  काहीच  काळात
नव्हत . 


अचानक  आठवण  आली   कि  email च  account open करून  बघाव .
त्यात   तुझा  mail बघितला  आणि  अधाशासारखी  वाचायला  सुरुवात  केली
Dear मेघा ,
                      

माझ्या  आयुष्यातले  सर्वात  चांगले  क्षण  मी
तुझ्यासोबत  घालवले . हे  क्षण  मी  माझ्या  मनाच्या  कप्प्यात  बंदिस्त
करून  ठेवले  आहेत . ते  फक्त  माझे  आहेत . त्याच्यावर  कुणाचा  हक़्क़
नाही . आता  मी  जे  काही  तुला  सांगणार  आहे  त्यावर  कदाचित  तुझा
विश्वास  बसणार  नाही .  पण  दुर्दैवाने  हे  सर्व  खर  आहे  . मी
engineering student आहे  ,मुंबईला  राहतो  हे  सर्व  खर  आहे  .पण  मी
कुठलाही  part time job करत  नाही , माझे  वडील  watchman नाहीत , आई
दुसर्यांच्या  घरी  धुनी  भांडी  करत  नाही  . तू  जस  मला  सांगितलं
होतास  कि तू   अविवाहित  आहेस  तसच  मी  तुझ्याशी  खोत  बोललो  यासाठी
मला  माफ  कर . I am really sorry for that.माझे  वडील  import- export
चा  buisiness कटात , आई  cardiologist आहे . एक  वर्षापासून  मला  blood
cancer आहे , आणि  तुला  माहीतच  असेल  कि  यावर  काही  इलाज  नाही .
माझंही  तेच   झाल  आहे  .orkut वरच्या  कुठल्याही  मित्राला  मैत्रिणीला
 हे  माहित  नाही . तुझ्याप्रमाणे  माझाही  हे  fake account आहे  आणि
यातले  सगळे  मित्र  अनोळखी  आहेत . पण  तुझ्याशी  मैत्री पलीकडच  नात
निर्माण  झाल  त्यामुळे   तुझ्यापासून  मी  काहीही  लपाउ  शकत  नाही
.जेव्हा  मी  तुला  सांगायचो  कि  मी   job ला  जातोय  तेव्हा  मी
आईबरोबर  दवाखान्यात  जायचो . तिने   प्रक्टीचे  बंद  केली  आणि  पूर्ण
वेळ  मला देते माझ्या  देखभालीसाठी . ज्या  दिवशी  मला  cancer असल्याच
कलाल  त्या  दिवशी  दोघांवरही  आभाळ  कोसळल  . आमच्या  हसत्या  खेळत्या
घराला  कोणाचीतरी  नजर  लागल्यासारख  झाल . खूप  इलाज  केले  पण  काही
झाल  नाही , मंत्र -तंत्र , उपास -तपास , नवस  सर्व  काही  झाल  पण  काही
 उपयोग  झाला  नाही . माझ्या  खूप  जवळच्या  मित्रांनाच  हे  माहित  आहे
.मला  कॉलेज मध्ये  जायला  बंदी  केली  म्हणून  मीही  घरीच  orkut वर
नवीन  friend बनवन  त्यांच्याशी  गप्पा  मारणे  यात  वेळ  घालवायला लागलो
. तू  ज्या  दिवशी  मला  mail केला  तेव्हाच  मला  कलाल  कि  काहीतरी
प्रोब्लेम  नक्कीच  आहे  आणि  तूच मला  खर  काय  ते   सांगशील  आणि  तसच
घडल . त्या  दिवसापासून  दररोज बाप्पाजवळ  प्रार्थना  करायचो  कि  सर्व
काही  ठीक  होऊ   दे . तुझ्या miscorage बद्दल  वाचून  तर  अंगावर  काटाच
आला  .doctor ने  तुला सांगितलं  होत  कि  परत  तू  conceive नाही  करू
शकणार  पण  माझा देवावर  पूर्ण  विश्वास  होता  दर  मंगळवारी  बाप्पाकडे
तुझ्यासाठी प्रार्थना  करायचो .
                   तू  दिल्लीला  जात  आहेस  पण  मला  मात्र  करमणार
नाही  आणि  आजकाल  मलापण  त्रास  खूप  होतोय . आई  जास्त  वेळ
कॉम्पुटरसमोर   बसू  देत  नाही  . म्हणून  तुला  सर्व  काही  सांगतोय
,काही दिवसांनी  कदाचित  मी  या  जगात  नसेन  पण  देवाजवळ  एवढीच
प्रार्थना करतो  कि , तू  कुठेही  राहा  पण  सुखात  राहा . विवेकच
तुझ्यावरच प्रेम  कधीच  कमी  होऊ  नये  आणि  तुझ   त्याच्यावार्चाही . जर
तुम्ही दोघे  मानाने  एकत्र  आले  तर  सर्वात  जास्त  आनंद  मलाच  होईल
, आणि मला  माहित  आहे  कि  हे  लवकरच  होईल , आणि  तुझ्या  pregnancy चा
एक mail माझ्या  inbox मध्ये  पडला  असेल . काय  माहित  मी  असेन  का
नसेन …..एक  प्रार्थना  जरूर  करेन  माझ्यासाठी  कि  जर  मी  या  जगातून
गेलो  तरी  पुनर्जन्म  घेऊन  तुझ  आणि  विवेकच  बाल  म्हणून  या  जगात
परत पाउल  ठेवेन . सर्व  काही  ठीक  होईल  ,देवावर  विश्वास  ठेव  आणि
हो काळजी  ghe स्वतःची  ,विवेकाची  आणि  होणार्या  बाळाची .
 फक्त  तुझाच   मनापासून  (मनु )
                    Mail   वाचून  एकदम  shock झाले  . मन  अगदी  सुन्न
झाले  .सुमती  क्षेत्रामाडेंची    'युगंधरा ' वाचल्यानंतर  झाल  अगदी तसं
.तुला  call करायचा  प्रयत्न  केला , पण
                                                      तुमसे  मिलके  ऐसा  लागा
                                                      तुमसे  मिलके
                                                      आरमा  हुये  पुरे  दिलके
                                                      ऐ  मेरी   जाने  वफा
                                                      तेरी  मेरी  मेरी  तेरी
                                                      एक  जान  हैं
                                                       साथ  तेरे
रहेंगे   सदा ……..
                         हि   callertune नुसतीच  वाजत  राहिली ,रोज
तुला  SMS, scrap करते पण  उत्तर  कधीच  येत  नाही  .आज  3 महिन्यांनी
तुला  mail करते  आहे .खरच  तुझ्या  प्रार्थनेत  खूप   शक्ती  आहे  ,ज्या
ठिकाणी  डॉक्टरांनी आशा  सोडली  होती  तिथे   तुझ्या  प्रार्थनेमुळे
चमत्कार  घडला . आज तुला  सांगावास  वाटत  कि  मी  pregnant आहे . जेव्हा
विवेकला  कळल तेव्हा  त्याने  मला  उचलून  गिरकीच  घेतली  पण  मला  तू
हवा  होतास त्या  ठिकाणी . काय  माहित  का  पण  तू  सांगितल्याप्रमाणे
मी त्याच्याशी  चांगल  वागतेय  आणि  तोही  खूप  चांगला  वागतोय  माझ्याशी
खूप  काळजी  घेतोय  माझी . तू  स्वतःसाठी  का  नाही  प्रार्थना  केलीस
…..का  नाही ?  माझ्या  पोटात  वाढणार  बाल  तुझ्या  रूपात  नाही  याव
हीच प्रार्थना  देवाजवळ  करते . माझ  आयुष्य  तुला  लाभू  दे……..मनापासून
फक्त  तुलाच

 

Make a Free Website with Yola.