डॅडी आय लव यु".....
गेल्याच आठवड्यात खरेदी केलेली नवी कोरी गाडी धुवून पुसून लख्ख करण्यात मग्न असलेल्या बापाचे आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलाकडे लक्ष गेले. मुलगा दुसऱ्या बाजुला गाडीवर दगडाने रेघोट्या मारण्यात गुंतला होता. राग अनावर झालेल्या बापाने त्याचा हात खेचून दगड काढून घेतला आणि बोटे जोरातच दाबली. इवल्या जीवाला ते सहन झाले नाही. ते मुल कळवळले. त्याच्या रडण्याने भानावर आलेल्या बापाला वास्तवाची जाणिव झाली. ताबडतोब त्याने मुलाला दवाखान्यात दाखल केले. कोवळ्या बोटातील हाडात मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते.
दुखऱ्या नजरेने त्याने बापाला विचारले "डॅ..डी, बोते कदी बरी होनाल?"
हवालदिल झालेल्या बापाच्या डोळ्यात अश्रू तरले. तो संदिग्ध मनाने दवाखान्या बाहेर आला. समोरच त्याची कार उभी होती. रागाने तो गाडीकडे आला आणि गाडीला जोर जोरात लाथा घालू लागला. शेवटी थकून आत पुढच्या सिटवर बसला. त्याला त्या रेघोट्या दृष्टीस पडल्या. न राहुन त्याने बाहेर येउन पाहीले.
त्या रेघोट्या नव्हत्या. ती वेडीवाकडी अक्षरं होती... "डॅडी आय लव यु".....
--
With Lots Of Love
Sachin Haldankar.
♥
" प्रेयसी :- असे काय बघतोस ?
प्रियकर :- अरे !!! .... चंद्राला तासन-तास बघत बसलो, तरी तो काही बोलत नाही !!
प्रेयसी :- हो का ? ... मग चंद्रालाच बघना !!
प्रियकर :- बघितले असते ..... पण तो मला श्वास व जीवन जगण्याची आशा नाही देऊ शकत ..... तुझ्यासारखं !!" ♥ ♥ ♥
♥ Love is sweet ...Is't It ? ... Keep Loving Truly ♥
" प्रेयसी :- असे काय बघतोस ?
प्रियकर :- अरे !!! .... चंद्राला तासन-तास बघत बसलो, तरी तो काही बोलत नाही !!
प्रेयसी :- हो का ? ... मग चंद्रालाच बघना !!
प्रियकर :- बघितले असते ..... पण तो मला श्वास व जीवन जगण्याची आशा नाही देऊ शकत ..... तुझ्यासारखं !!" ♥ ♥ ♥
♥ Love is sweet ...Is't It ? ... Keep Loving Truly ♥
होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्या सणामागे एक आख्यायिका आहे.
पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.
थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.
होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.
अशी हि होळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो ..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
थर्टी फस्ट'चा बेभान जल्लोष करण्यापूर्वी. हे पत्र वाचा.!
ठरवलं असेल ना तुम्ही,
थर्टी फस्र्टला खूप धमाल करायची.. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटकेच करायचं.
कुणी कितीही ओरडाआरडा करो.
आई-बाबा परवानगी देवो ना देवो
तुम्ही ठरवलेही असतील एव्हाना तुमचे प्लॅन्स.
किती लवकर संपलं ना हे वर्ष.
त्याला निरोप द्यायचा तर जंगी प्लॅनिंग करायलाच हवं.
काही दिवसांवर आलाय थर्टी फस्ट.
फुल्ल कल्ला करायचा आणि सॉलिड एन्जॉय करायचं प्लानिंग असेल तुमचं.!
एन्जॉय.! करा, मस्त मज्जा.!!
पण एक मिनिटं, थर्टी फस्ट आणि कोरडं.?
तुम्हीही ठरवलंय का. की यंदा थर्टी फस्टला 'ते'ही हवंच म्हणून.!
ठरवा हवं तर.
दारू प्यायची की नाही यावर तात्त्विक चर्चा नाही करत आत्ता.आत्ता मुद्दा थोडासा वेगळा आहे.
थर्टी फस्टची पार्टी संपली की घरी परत येताना कसे याल तुम्ही.? आणि मुख्य म्हणजे याल ना.?
दारू पिऊन गाडी चालवू नये, दुचाकी-चारचाकी दामटू नये. हा झाला नियम. तो किती जण पाळतात. ?
प्रत्येक वर्षी ड्रिंक आणि ड्राईव्हमुळे किती तरुण जीव आनंदाला मुकतात.?
आनंद करायचा म्हणून असं स्वतशीच वैर करायचं का, तुम्हीच ठरवा.!
पण ते ठरवणं सोपं जावं, म्हणून ही एक सध्या इंग्रजीतून फॉरवर्ड होत असलेली इमेल वाचा.
तुमचं सेलिब्रेशन प्लॅनिंग सुरू असेल सध्या. त्यात पाच मिनिटांत वाचून होईल ही ईमेल.
एका मुलाने आपल्या आईला लिहिलेलं हे पत्र आहे.
अशी मेल आपल्या आई-बाबांना वाचायला लागू नये.एवढंच.!
आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण 'पिऊ' नकोस.. !
आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!
आई,
खूप आग्रह केला मित्रांनी.
म्हणाले पी रे. पी रे.
पण नाही प्यायलो मी.
सगळ्यांनी चिडवलं मला,
भरीस पाडलं.
पण मी नाहीच ग्लासला हात लावला.
तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. न पिण्याचं.!
आई,
कोणी काहीही म्हणो.
न पिता एन्जॉय करता येतं
हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं.
मला गरजच नाही वाटली नशेची.!
आई,
पार्टी संपत आली आहे आत्ता.
जो तो घराकडे निघालाय.
खूप पिऊन 'टाईट' झालेले
माझे मित्र
स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत.
मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय.
निघालोय. पूर्ण शुद्धीत..!
मी येईन घरी धडधाकट.
नशेत गाडी ठोकण्याचा,
काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही
मी प्यालोच नाही.
तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.
आई,
मी निघालो.
गाडी काढतच होतो बाहेर.
पण पाहतो तर काय
समोरून एक गाडी सुसाट
येताना दिसतेय.
माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती. माझ्या गाडीवर..आदळतेय..
आई,
मी पडलोय गाडीबाहोर..
काहीच कळत नाहीये.
अंगातून काहीतरी
कारंजं फुटल्यासारखं उडतंय.
कोणीतरी हवालदार ओरडतोय जोरजोरात.
दारू पिऊन बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं.
त्यांच्या गाडीनं ठोकलं याला.
मरणार हे पोरगं हकनाक.
आई,.
मला वेदना होताहेत गं खूप.
तू जवळ असावीस असं वाटतंय.
मी. मी.? आई.
मला का ठोकलं गं त्यांनी.
रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.
जमलेत इथे सगळं जण.
डॉक्टर, पोलीस, .
ते डॉक्टर म्हणताहेत..
काही चान्सेस नाही,
संपलंय सारं.
काहीच उपाय नाही.
नाही वाचणार हा.
आई,
तुझी शपथ.
मी 'प्यायलो' नव्हतो गं.
त्या गाडीतली मुलं नशेत होती.
खूप प्यायली होती.
दारू पिऊन गाडी चालवत होती..
आई,
ती मुलंही माझ्याच बरोबर
त्या पार्टीत होती बहुतेक
फरक इतकाच..
की प्यायले ते आणि मरतोय मी.!
का पितात गं आई हे लोकं.?
सगळं आयुष्य नासवतात..
स्वत:चं.
आणि दुसर्यांचंही. !
आई,
मला आता असह्य वेदना होतायंत.
आतल्या आत काहीतरी चिरत, कापत जातंय.
आई,
ज्या मुलाने माझी ही अवस्था केली
तो शुद्धीत येतोय आता.
मी कळवळतोय आणि
तो फक्त पाहतोय. सुन्नपणे. !
आई,
माझ्यासारखंच त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं.
दारू पिऊन गाडी चालवू नकोस.
त्यानं ते ऐकलं असतं तर
आज मी जिवंत राहिलो असतो गं.
आई,
मला आता श्वास लागायला लागलाय.
तुटायला लागलोय मी अख्खा. आतल्या आत.
पण
तू नाही रडायचंस माझ्यासाठी.
मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती.
तेव्हा तेव्हा होतीस तू माझ्या बरोबर.
माझ्यासाठी.!
पण मरताना मला फक्त
एक शेवटचा प्रश्न पडलाय.
जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायंचं?
दुसर्याच्या चुकीची शिक्षा
मीच का भोगायची..?
आई. का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.?
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.
पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते " :)
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
अग काय करतीयेस
नाश्ता करायला येतेस न आई हाक मारत होती...
हो ग आलेच मी ...आणि बघितलं तर काय
आई ने शिरा केलता ....
आणि मग काय उभी राहिली तुझी आठवण.....
तुला हि शिरा खूप आवडायचा
एकदा मी ठरवलं कि तुझ्या साठी शिरा करायचा
आणि त्यादिवशी मी आई कडून शिरा शिकायचं ठरवलं...
मग सकाळी लवकर उठून शिरा करायला घेतला
आईने सांगितलं तस सर्व केल....
नेमक त्यात मी साखर एवजी चुकून मीठ टाकल होत ....
तो शिरा मी न टेस्ट करता तुला घेयून आले...
आणि मी तो शिरा तुला खायला दिला ...
तो तू टेस्ट केला आणि म्हणालास कि
वाह वाह !!! क्या बात है ......
आज पर्यंत मी असा शिरा कधीच नाही खाल्ला ...
मग मी म्हणाले खर्च का रे चांगला झाला आहे ...
त्यावर तू म्हणाला खर्च खूप छान झाला आहे...
मी म्हणाले बघू मला टेस्ट करू दे मी अजून नाही खाल्ला
तू म्हणालास नाही हा फ़क़्त माझ्यासाठी आहे..... तू पण नाही खायचं..मी एकटा खाणार आहे ...
तरी हट्ट करून मी तो टेस्ट करून पहिला आणि मला कळाल कि मी कसा केला होता तोः शिरा.....
आणि माझ्या डोळ्यात पाणी आले ....मी म्हणाले कसा काय खाल्लास तू तो शिरा
तर मला गठ्ठ मिठीत घेत महानाल्स ...अग वेडाबाई तुझ्या प्रेमाचा गोडवा आहे ना त्यात
म्हणून तर तो गोड लागतोय ना मला ...आणि मग काही वेळ मी तुला अशीच बिलगून बसले...
अग गार झाला तो शिरा...... माहित नाही कुठे लक्ष असत ह्या मुलीच?
आई तुला कस सांगू ...कुठे लक्ष असत ते....:-P ;-) :-D :-D :-D
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
पहिला मित्र : एक प्रश्न विचारू?
दुसरा मित्र : हा विचार ना?
पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?
दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणात कोणालाच भेटणार नाही....
पहिला मित्र : असे का?सांगशील?
दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुला असे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही"......... :)
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.
एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.
त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.
एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,
""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''
पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??
मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण
आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण
आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!















