समीरपाटील हा कॅउम्प्युटर इनजीनिइर होता. नुकताच इंग्लंड वरून आला आणि
त्याचेआई बाबा त्याला लग्न कर म्हणून मागे लागले. इतके दिवस तो परदेशी
जायचयम्हणून टालात होता पण आता कसलाही बहाण उरला नव्हता. ठरलं तर मग,
"आपणशुक्रवारी पूजा च्या घरी जायचं समीर चे बाबा म्हणाले आणि सर्व
आप्तमंडळीनी होकार दिला. समीर चा भाऊ विशेष खुश होता.
त्यानं कित्तेक वर्ष्या पासून ठरवलं होत कि तो भावाच्या लागन्नात काय
शिवणार आणि कोणता रंगाचा कोट घालणार.
ठरल्या प्रमाणे दुपारी सुमारे २ वाजता, समीर, समीर चे बाबा आणि आई
आणित्याचा भाऊ सर्व जन पाहुण्या मंडलींच्या घरी हजार झाले. समीर च्या
मनातविचार आला कि हि मुलगी जेमतेम शिकलेली. तिला धड इंग्रजी बोलता येत
नाही.आपण यीला नाही म्हणूयात आंनी सोपस्कार म्हणून काही तर
प्रश्न्याविचारुयात.
सर्व मांडिली बसल्या नंतर थोड्याच वेळात पाणी घेऊन एक छोटीशी मुलगी आली.
ती नक्कीच मुलीची लहानी बहिण असावी, समीर विचार करत होता.मुली कडची सर्व
मंडळी त्याच्या कडेच पाहत असल्या मुळे तो शरमून खालीच नजरटाकून बसलेला
होता जणू मुलगी येणार आणि त्यालाच प्रश्न विचारणार होती.
म्हध्यास्ती असलेल्या एकाने टी. वी चालू केला. सर्व जन टी. वी. कडे
बघतबसले. समीर ला जणू काही असा वाटल कि त्याची न्यायाधीशाने निर्धोष
मुक्तताकेली आहे. थोड हलक वाटायला लागल त्याला. एकदाच लवकर पोहे उरकून
आणि काईनाही ते प्रश्न विचारून, घरी जाऊन मस्त बाईक वर मित्र कडे जाऊन
बसून रहावअसा त्याचा विचार होता. त्याला लग्न टाळण्या मागे एक कारण होता.
ते म्हणजेतो फक्त २५ वर्ष्यांचा होता आणि त्याचा एका देखील वर्गमित्रच
लग्न आणखीझालेलं नव्हत. इतकच काय कोणी लग्नाचा विचार देखील करत नव्हत.
१० - २० मिनिट नंतर एक २० वर्ष्याची मुलगी पोहे घेऊन आली. समीर ने
वरतीतिच्या कडे न बघतच पोहे घेतले आणि तो खाऊ लागला. सर्व मंडलींची पोहे
खाऊनझ्याला नंतर एक पाहुणा म्हणाल ठीक आहे आम्ही येतो आता. समीर ला वाटल
चला,प्रश्न्न उत्तचाचा कार्यक्रम न सहन करता आपण सुटलो. पण समीर चे
बाबाम्हणले आहो आमचा समीर जरा लाजरा आहे.
त्याला आणि मुलीला थोड बोलू द्या, एक मेकांची आवड निवड कळू देत. समीर ला
तर वाटल जस खटला पुन चालू झालाय कोर्टात आणि पुन्हा त्यालान्यायाधीशाला
सामोरे जावे लागणार. सर्वांनी समीर च्या बाबाच्याम्हनंण्याला दुजोरा
दिला.
मुलीला बोलावण्यात आल. मुलीगी आली आणि समीर समोर येऊन बसिली. मुलीचे
वडीलम्हणाले विचार तुम्हाला काही प्रश्न असतील तर. समीर च्या बाबांनी
समीरलासर्व मंडली समोर सुनावलं म्हणाले...समीर, विचार आता तुला काई
विचारायचंते, शेवटी तुम्हा दोखांची पसंती महत्वाची. सर्वी मंडळींनी,
ज्याना आतापर्यत फक्त पोहे खाण्याच काम होत त्यांनी लगेच होकार भरला.
समीर ने प्रश्न विचारण्यासाठी वर मान केली आणि क्षण भर तो फक्त
बघतराहिला. आई बाबा जेव्हा त्याला विचारी अरे बाबा..तुला मुलगी कशी
हवीतेव्हा तो काही सांगू शकत नाहे. त्याला कधी शब्दात माहित नव्हत
आपल्यालाकशी मुलगी हवी. पण समोर जी मुलगी बसली होती ति त्याचा
जवळनसलेल्या शब्दाचप्रत्यक्ष रूप होती. कुठे तरी मनात प्रत्येक तरुण
आपल्याला हव्या असलेल्यास्वप्नासुन्दारीची प्रतिमा तयार करतो....ती मुलगी
त्याची ति प्रतिमा होती.
अशी मुलगी जर आपल्याच जातीत आहे तर मग का सर्वांचा रोष पत्करून
प्रेमविवाह का करावा. एक क्षणात ते घर त्याला चित्रपटातलं लोकेशन वाटू
लागल.दुसरे सर्व पाहुणे , मुलीचे आई बाबा त्याला बघत असतील याचा त्याला
विसरपडला. त्याला वाटल आताच बाबांना सांगाव...मुलगी मला पसंत आहे,
आताचलग्नाची तारीख नक्की करा, पण तो ईन्ज्नीयर होता शिवाय लंडन रिटरन.
त्यालाथोडा भाव खावा लागत होता. त्याने मुलीला शेवटचा प्रश्न्या विचारला
कि "मीतुला पसंत आहे का?"
मुलीने लाजून खाली मान घालूनच होकार दिला. तिच्या गालावरच हसू सर्व
काहीसांगून गेल होत. त्या हसण्याला बघून समीरला त्या गाण्यातल्या
ओळीआठवल्या...जन्मात लाभे क्षण एकदा हाते भाग्य माझे झालीस तू.....दिसलीस
तू फुलले तृतू.
प्रश्न्या उत्तर झाल्या नंतर समीर चे काका ज्यांना समीर वर जास्तचअभिमान
होता त्यांनी मुलीच्या बाबांना सांगितले आम्ही ५ - ६ दिवसामध्येतुम्हाला
निर्णय कळवू. समीर ला वाटले आताच काकांना म्हणव...काका, तुमची मीआयुष्य
बर सेवा करीन पण हे लग्न पक्क करा. पण, रीतीप्रमाणे आताच सर्वबोलणी होणार
नवती.
२ दिवसांनी समीर आपल्या ऑफिस च्या गावी परतला. त्याला नन्तर
बाबांनीसांगितले कि, काकांनी जी मागणी केली ती त्यांना मान्य नवती म्हणून
आपण नाही म्हणून सांगितला आहे.समीर ला काही बोलवेना...त्याच्या स्वप्नातली
ती परी त्याला पुन्हा कधीच भेटणार नव्हती. तिने समीर ला सांगितले देखील
नाही कि हि त्याचीशेवटची भेट आहे आणि ती त्याच्या दुनयेतून निघून गेली.
तिचा चेहरा देखीलत्याला आठवत नव्हता ...आठवत होते ते फक्त तो जगलेले ते
क्षण.....समीर ने कधी विचारही केला नव्हता , ज्या मुलीला पाहायला जायला
आपण तयार नव्हतो....ती मुलगी त्याच्या जीवनात येवढ काही देवून जाईल किंवा
सर्व काही घेवून जाईल.

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...

मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....


काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
-----------------------------------------------------------------------------------
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
----------------------------------------------------------------------------
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. रात्रीच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

आंतरजालावरून साभार 
( लेखक - अज्ञात )


-

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं..


"अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला.
त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...
बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही.
ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.


तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता.
आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं.


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.


"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला.
आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!!
म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन!
मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं.
येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"



तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..

-----------

"शेखर, क्या तुमने कभी किसी लडकी से प्यार किया हैं?"
"हां! हैं एक लडकी, बिलकुल तुम्हारे जैसी, बहुत सुंदर, बहुत भोली.. और थोडी पागल भी.. लेकिन मेरे प्यार की खबर सिर्फ मेरे दिल को हैं.."
"उसे बताया क्यों नहीं?"
"यह प्यार भी बडी अजीब चीज़ हैं संजना.. जहां इकरार की पुरी उम्मीद हो, वहां भी यह दिल कहने से डरता हैं..और मुझे तो इनकार क पूरा यकीन हैं.. अब, तुमही कहो.. वह किसी और को चाहती हैं.. बहुत चाहती हैं.."

जब किसी की तरफ दिल झुकने लगे
"Jab Kisi Ki Taraf Dil Jhukne Lage"
Watch this video



एक छान गाणं खूप, खूप दिवसांनी ऐकलं.. त्यावरुन ही गोष्ट...  :)

 

१० वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. ११ वी - १२ वी पण छोट्या कॉलेज ला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे कसे वागायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता.  १२ वी नंतर मोठ्या कॉलेज ला गेलो. 
आणि Fy च्या पहिल्याच दिवशी ती दिसली.  तिकडे एका घोळक्यात थांबली होती. 
तिच अतिशय सुंदर,  निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं.
पण आम्ही इतके धीट कुठे?  मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकट्यानं लेक्चर जाऊन बसलो. 
तिच्याशी बोलण्याचा योग आला तो Fy च्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले 
"हाय, कसे गेले पेपर? मला electronics चे दोन्ही पेपर फार अवघड गेले. ".. 
"गेले गठठ्यातून, आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते.. बाकी?  सुट्टीत काय करणार? ".. ती बोलली.
"काही ठरवलं तर नाहीये, बघू.. ".. 
"ओके, बाय, मला जायचंय.. "
"बाय.. " मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले.  ... आणि स्कूटी वरून ती निघून गेली. 
दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता. त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही.  आक्खी सुट्टी निघून गेली... आणि परत एकदा कॉलेज चा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खूश होतो. 
ती कुठे दिसतिये का बघायला मी गेट वरच थांबलो.   ती आली,  गाडी पार्किंग मध्ये नेताना तिनी मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. 
'ती आपल्याकडे बघून हसली? ', मी ह्या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्या जवळ येऊन थांबली.
"काय म्हणताय साहेब? इथे का थांबलाय? " ह्या वेळेस तिनी सुरुवात केली. 
मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. "काही नाही, सहजच कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो.. चल जयाचं वर्गात? "
"हो चल, उशीर झाला आहे, लेक्चर चालू झाला असेल. "
आणि अशाप्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिच बोलणे तासंतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले,  तसे आमच्या मध्ये मैत्री निर्माण झाली.  इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिंधास्तपणे बोलू लागलो. 
मला बुद्धिबळात आवड. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कल च्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो.
साधारण आठवडा गेला असेल,  तिनी मला विचारलं,  "चल,  मी पण येते बुद्धी लावायला" 
"अरे वा!, चल की" मी एकदम आनंदानं उत्तर दिले.  आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चर ला न बसता थेट आर्ट सर्कल च्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्या झाली.
तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हत,  तरी ति यायची.  कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावी अस मला वाटू लागले. मग ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्या मधील नात हे मैत्री पुरते उरले नाहीये ह्याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती.
माझयासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होत, पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारायचं ठरविलं. त्या दिवशी ती आली, थोड्याफार गप्पा झाल्या.
"काय रे? आज इतका गप्प गप्प का? काही होतंय का तुला? ".. 
"नाही गं, असच, मला काहीतरी बोलायचं होत तुझ्याशी"; 
"अरे मग बोल की".. 
"असू दे गं, परत कधीतरी बोलीन.. "
माझ्या मनात काय चालू आहे हे तिनी बरोब्बर ओळखलं,  तिला पण हे हवंच होत की.. 
"चल आपण स्कूटी वर फिरायला जाऊयात"..  ती बोलली. मी मुकट्यानं तिच्या मागे बसलो. तिनी गाडी पाषाण च्या त्या मस्त एरियात नेली. 
"हा, तू काहीतरी बोलणार होतास.. "
तिनी दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो 
"मला तू खूप आवडतेस!! ".. 
"क क क्क क क काय? ".. तिच्याकडून हे उत्तर आलं. 
"मला जे बोलायचं होत, ते मी बोललो, आकाशवाणी एकदाच होते, चल आता मला परत सोड कॉलेज जवळ.. " मी प्रचंड हिंमत दाखवून घाई घाई मध्ये बोललो. 
तिनी गाडी बाजूला घेतली, आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हटली, 
"तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ"..  .
मी हळू हळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली. 
"हा आता परत बोल मगाशी काय बोललास"..  ती म्हणाली;
"मला तू खूप आवडतेस गं, तुझी खूप आठवण येते, तुझ्याशी बोललो नाही ना, तर करमत नाही बघ, फार विचित्र वाटत.. "  तिच्या नजरेला टाळून मी एवढे बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला अस मला वाटू लागलं.
"ए वेड्या, हे बघ,..... वरती बघ माझ्याकडे".. मग मी नजर हळू हळू तिच्या डोळ्याकडे नेली. 
"मला पण खूप आवडतोस, मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे. ".. हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडेच गेली होती. 
तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला, तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली.  पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं. 
गाडी परत फिरली, कॉलेज च्या गेट जवळ पोचेपर्यंतची ती ६-७ मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतः वरच मी प्रचंड खूश झालो होतो.  ह्या गोष्टीला propose टाकणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हत.
तिनी मला कॉलेज च्या दारात सोडले,  आता मात्र आम्ही दोघही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. 
तोंडातून एकही शब्द न कढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता..
गाडी परत फिरली, कॉलेज च्या गेट जवळ पोचेपर्यंतची ती ६-७ मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतः वरच मी प्रचंड खूश झालो होतो.  ह्या गोष्टीला propose टाकणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हत.
तिनी मला कॉलेज च्या दारात सोडले,  आता मात्र आम्ही दोघही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो.
तोंडातून एकही शब्द न कढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता...... 

मग कॉलेज २ ला संपले की घरी न जाता तिथेच ५ पर्यंत गप्प मारत बसायच्या, ५ ला गणिताच्या क्लास ला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचे, एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती. क्लास मधून घरी जाताना "घरी पोचलीस की घरच्या फोन वर मिस कॉल दे" अस सांगणं, बाहेर खणे पिणे, खास करून विद्यापीठातल्या त्या क्लोज कॅन्टिन ला जाऊन गप्पा मारणे   अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू झाल्या.
एक दिवस मी सहजच विचारलं, "काय मग ? मी पहिलाच ना?".. 
तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता; ती गोंधळली ...
बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना .. आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली.
बराच वेळ झाला शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचलले .. 
"अग बोल ना , काय झालं? कोणी असेल तर सांग.. प्लीज लपवू नकोस " .. 
आता मात्र ती खूपंच गंभीर झाली. आणि तिचे डोळे पाणावले. 
"मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं, मला एक जण आवडायचा या आधी, पण प्लीज, आता तसं काही नाहीये, आणि ह्या गोष्टीला आता बरेच दिवस झाले... मी ते विसरलिये.. .... 
भयाण शंतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती.  
वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे .. मला तू खूप आवडतोस रे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर.  "...
मला काय बोलावे ते कळेना.. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनी उत्तर दिल, जणू काही मी तिला हे प्रश्न विचारीन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानांमधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता. 
तो ८ महिने बाहेर आणि ४ महिने पुण्यात असतो, भरपूर पगार ...आणि अस बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळाल.    
माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली , मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण  मिळेल असा मी विचारही नव्हता केला. मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तिथून निघून गेलो. 
२-३ दिवस गेले,मी काहीच संपर्क केला नाही, तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता 
"हे बघ वेड्या, तुला ती खरंच मनापासून आवडते ?" तो मला धीर देत बोलला. 
"हो रे? हे काय विचारणं झालं का? "
"तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ? "
"हो आहे रे .. पण ... "
"पण वगैरे काही नाही, आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. "
तिला मी कॉलेज मध्ये गाठलं. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्याप्रकारे बोलेल त्या पद्धतीनं मी तिला म्हणालो, 
"हाय, काय चाल्लय ? ".. 
"काही नाही विशेष.. " तिनी पण तसंच उत्तर दिले.
कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो, पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या. 
"आज फार बोर होतंय नाही".मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो.    
"हो ना, खरंच आज फारच बोर होतंय, क्लास ला पण वेळ आहे अजून बराच; चल आपण कुठेतरी जाऊयात. ".. 
"कुठे जायचं ? मला फार काही माहीत नाही ह्या एरिअयात मधलं, प्लीज विद्यापीठ नको , तिथे जाऊन जाऊन मला कंटाळा आलाय".. मी पण माझं मत मांडलं. 
"वेड्या, माझ्या घरी येतोस ? इथे जवळच आहे.. " चल जाऊ.. बस मागे. 
माझ्या उत्तराची वाट न बघताच तिनी गाडी सुरू केली , मी मख्खासारखा मागे बसलो. आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत, ह्याची मी तयारी सुरू केली.
आम्ही घरी पोचलो. घरी कोणीच नव्हत. मी एक सुस्कारा सोडला. तिनी मस्त चहा आणि मॅगी करून आणले . आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो. आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती. 
मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली, मॅगी ची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली.
तिला पण खूप आनंद झाला. 
झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली. 
.. 
कधी कधी तिच्या घरी जाण , मग तिनी मस्तपैकी चहा - आणि मॅगी बनवणे, तिच्या कुशीत पडून मस्त गप्प मारण, भविष्याची स्वप्ने रंगवणे अश्या गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होत . प्रेम खरंच इतकं सुंदर असत ह्याची जाणीव झाली... 
काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होत.

त्यादिवशी त्यांच्या घरी असताना, अचानक फोन वाजला. तिनी उचलला. आणि ती खूप खिन्न झाली. फक्त "ठीके, येते लगेच " अस ती फोनवर बोलली. तिनी पटापट आवरायला घेतलं, आणि आवरता आवरताच ती मला बोलली.. 
"चल वेड्या, मला जायला लागेल , "
फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकले नाही, 
"अग, काय झालं? अस अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता?"
"तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? " तिनी उलट प्रश्न केला.. 
"हो , मला सांगायलाच पाहिजे .. " मला ते न जाणून कशी चैन पडली असती ?
"तो पुण्यात आलाय, त्यानं मला त्याच्या घरी बोलवलाय, काहीतरी काम आहे म्हणे".. 
माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरीपण मी स्वतः ला सावरत मन खंबिर केल, माझ्या भावना चेहर् यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला.     
"ठीके, जा.. " तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता.
का कुणास ठवूक , पण आमच्या नात्याचे अस्तित्त्व आता फार काळ टिकणार नाही, अस मला उगाचच वाटले.      

त्यादिवसपासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच  नाही, तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. 
माझं मन ह्या प्रकारानं फार चिरडून निघत होत.         
त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती, रडून रडून डोळे सुजले होते, ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिनी मला थांबवलं, गप्प मारत मारत आम्ही पूना हॉस्पिटल च्या पुलावर जाऊन उभे राहिलो. 
"वेड्या, मला तुला काहीतरी सांगाचय रे ".. 
"ह्म्म .. मला कल्पना आलिये, बोलून टाक.." मी अतिशय घट्ट मनानं तिला बोललो. तिला असे दाखवायचा प्रयत्न केला, की ती मला काहीपण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन.
"मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत.. एम सॉरी.. प्लीज मला माफ कर.. प्लीज .. "... 
मझी स्वतःवरच खुप चिडचिड झाली.  काहीही न बोलता मी उलटा फिरलो, माझ्या हताश, हरलेल्या मनाला सावरत घरी पोचलो. वरच्या खोलीचे दार लावून ओक्साबोक्शी रडत बसलो. ' तिनी जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हत ' अस म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं, पाकिटामधून तिचा फोटो काढला, कसलाही विचार न करता मी तो फोटोचे असंख्य तुकडे केले...
आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून मझ्या डोळ्यान्समोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो... 
.
.
असेच दिवस जात राहिले.  
परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. 
अजून पण अधून मधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोच. 
नंतर अनेक मुली भेटल्या, पण मनापासून कोणी आवडली नाही. मी पण शोधायचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितिवरच हसू येत. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते पण ती होती, आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, पण प्रेम करायला "ती" नाहिये. 

काही लोक म्हणतात "पाहिलं प्रेम तेच खरं प्रेम, बाकी सगळी मजबूरी ".. सद्ध्या तरी हेच बरोबर वाटतय....  

      

आधीच सांगतो माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या झाल्या असल्या तरी माझं ठरवूनच लग्न झाल आहे. माझ्या प्रेमकहाण्यांची सुरुवात चवथी पासून झाली म्हणजे माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या एकतर्फी झाल्या आहेत पण मी आपला हेका म्हणून काही सोडला नाही आहे पण आता लग्न झाल्या मुळे बऱ्याच गोष्टीवर बंधन आली आहेत असो तर माझ पहीलं प्रेम हे चवथीमध्ये झालं 
एक गवळी नावाची मुलगी होती छान दिसायची पांढरा शुभ्र फ्रॉक घालून यायची खूप हुशार होती त्यामुळे कदाचित वास द्यायची नाही ह्यांमुळेच कदाचित पुढे काही जाऊ शकले नाही मग आमच्या शाळेत मुलं मुली एकत्र बसण्याची पद्धत निघाली तेव्हा एक छान सुंदर मुलगी माझ्या शेजारी बसायला आली पण थोड्या दिवसात पुन्हा मुलं मुली वेगळे बसायला लागली आणि आमची ही प्रेमकहाणी देखील पूर्ण होऊ शकली नाही.नंतर मला पाचवी मध्ये पुन्हा प्रेम झालं ह्या वेळी एक मुलगी होती खूप हुशार आणि डांस मध्ये पण खूप पारंगत होती ती मराठी होती पण सगळे तिला ज्युली म्हणायचे तिच्या साठी मी एकदा सरांचा मार पण खाल्ला होता कारण ते शिकवत असताना मी तिच्या कडे बघत बसलो होतो असो.हे सगळं पाचवीत बरका, मग हे लहान पण संपल आणि मी थोडा मोठा झालो म्हणजे सातवीत गेलो त्या काळी QSQT लागला होता आणि प्रेमकैदी पण लागला होता मग माझा एक मित्र १०वित होता त्याच्या बहिणी वर मी प्रेम करायला लागलो त्या काळी आमच्यावर वरील चित्रपटांचा खूप इंफ्लुअन्स होता मी अंघोळी ला जाताना ति तिच्या बाल्कनीत यायची अशी ती मला आवडायला लागली. अलीकडेच समजलं तिचा डिवोर्स झालाय आणि तिला कसलीतरी ट्रीटमेंट चालू आहे असो बिचारी किती छान दिसायची अजूनही तिची ती बाल्कनीतली छबी मनातून जात नाही. मित्राच्या धाका मुळे पुढे काही होऊ शकले नाही असो
मग आम्ही थोडे अजून मोठे झालो म्हणजे आठवींत आलो मग आमच्या समोरच्या घरात साळुंखे म्हणून एक जण राहायला होते इकडे आमचं पहिलं खरं प्रेम जमलं ती मुलगी रोज तिच्या खिडकीत यायची आणि आम्ही दोघे एकमेकां कडे तासन तास पाहत बसायचो नंतर आमचं भांडण झाल आणि ही प्रेम कहाणी तिथेच संपली कारण ती अजून एक दोघांशी प्रेमालाप करत होती असो.
मग आम्हाला आणखी एक मुलगी सापडली ति आमच्या समोरच्या घरात राहायला आली होती. तिचं नाव खूप छान होत मौसमी गल्लीतली सगळी मुलं तिच्यावर मरायची ती हुशार होती माझा एक मित्र तिच्या बहिणी वर लाइन मारायचा मग एकदा तिने आम्हाला बोलवून खूप झापला होता मग नंतर मला तिच्या पाठी मागे लागायची हिंमतच झाली नाही असो
मग मला वरची मुलगी होती ना जिश्याची माझं भांडण झाल होत तिच्या बहिणीशी प्रेम जमल ते थोडं पुढे जाणार तेवढ्यात आमचं घरच शिफ्ट झाल आणि माझा हे प्रेम पण अधुरं राहिलं असो 

मी आता नवीन घरी आलो पण मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं आता मी बारावीत गेलो होतो एका लहानश्या गावांतून एका मोठ्या शहरात आलो इथे मला मायेची माणसं कमी आणि व्यवहारी माणसं जास्त भेटली इकडे मात्र मला उथळ प्रेमा पेक्षा संवेदनशील प्रेम काय असत ते समजलं आणि प्रेम ह्या विषयात माझा अनुभव मोठा झाला.
मी थर्ड इयरला असताना माझा एक मित्र एका मुलीवर लाइन मारायचा म्हणजे तसा त्याचा तिच्या मधला इंटरेस्ट फक्त मजा करण्यापुरताच होता त्याला वाटायचं आपल्या ह्या मित्राच पण सुत तिच्या बहिणीशी जमवून द्यावं किती चांगला होता माझा मित्र मी पण लगेच म्हणालो चालेल आम्ही भेटायची वेळ ठरवली बरोबर त्या वेळेस माझा मित्र त्या मुलीस घेऊन आला मी खाली मान घालून उभा होतो तसा मी लाजाळू आहे थोड्या वेळाने मी माझी मान वर नेली मी उडालोच ती मुलगी खूपच लहान होती ती मुलगी नववीत होती आणि ती सुद्धा तयार झाली होती कारण मी तसा बरा दिसायचो गोरा आणि घारा तिला बघितल्यावर मी गारच झालो एक नववीतली मुलगी माझ्यावर प्रेम करायला तयार होती इकडे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला मला तेव्हा खरं मुलींचं मन समजायला लागलं त्या निरागस असतात ही खूप जुनी गोष्ट आहे आज कालच्या मुली खूप उथळ असतात त्यांना सहवास हवा असतो तशा आजही काही मुली असतील म्हणा पण त्यांची संख्या नक्कीच कमी आहे मी माझ्या मित्राला जायला सांगितलं तिला म्हणालो तू खुपा लहान आहेस गं तू आता स्टडीज कंप्लीट कर तू इंजिनिअर्रिंग कंप्लीट केलेस की मीच तुझ्याकडे येईन ती काय समजायचा ते समजली मी काही पुन्हा तिच्याकडे गेलो नाही 
त्याच्या पुढे मला आमचा इलेक्ट्रॉनिक्सच्या मॅडम शी प्रेम जाल त्यांचे डोळे माझ्या सारखेच घारे होते त्यांचा क्लास मी कधीच चुकवायचो नाही त्यांच्या प्रेमात इतरही खूप मुले पडली होती एकदा आमच्या एका मित्र पैकी एक जण त्यांना म्हणाला होता की तुम्ही काजोल सारख्या दिसता तो मुलगा नंतर मॅडमच्या जवळ पासही नंतर दिसला नव्हता असो ह्या प्रकारा मुळे माझं ते प्रेम शोलेतल्या बच्चन सारखं अधुरं राहील होत.
माझं पुढचं प्रेम हे थोड्या परिपक्व वयात झालं जेव्हा मला माझा पहिला जॉब लागला ती खूप छान मुलगी होती शिल्पा तिचं नाव. एक वर्ष ती बिचारी माझ्या मागे लागली होती. मला तिच्या फिलिंगच समजल्या नाहीत पण खरं प्रेम असल्या मुळे ते जे म्हणतात ना दिल में कुछ कुछ होता है तसं व्हायचं तीच्या बद्दल खूप प्रोटेक्टीव झालो होतो मेहदी हसन च्या गझल ऐकू लागलो होतो मी खूप इन्सिक्युअर होतो म्हणून पण असेल कदाचित तिच्याशी बोलताना खूप घाबरायचो ती पण आधी मला प्रतिसाद द्यायची पण नंतर काय बिनसलं माहीत नाही ती माझ्या एका मित्रा बरोबर फिरू लागली पण अजूनही ती मला आठवते तिला त्या मित्राने देखील सोडलं आज तिच लग्न झालं आहे तिला एक मुलगी पण आहे

एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या सेक्रेटरीची जागा अचानक रिकामी झाली. त्या महत्वाच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी कंपनीमधल्या व्यक्तींमध्ये चुरस, चढाओढ, खटपटी लटपटी, दबावतंत्र वगैरे सुरू व्हायच्या आधीच बाहेरून एक हुषार, चुणचुणीत आणि कार्यक्षम नवी सेक्रेटरी निवडून तिला आणायचे त्या डायरेक्टरने ठरवले आणि प्लेसमेंट सर्व्हिस चालवणा-या आपल्या मित्राला फोन करून चोवीस तासात ही निवड करून द्यायला सांगितले. हे आव्हान स्वीकारून ती एजन्सी लगेच कामाला लागली. अनेक उमेदवारांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे होतीच. त्यांची छाननी करून टेलीफोन, एसएमएस, ईमेल वगैरे माध्यमांतून चाळीस पन्नास जणींना दुसरे दिवशी परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावून घेतले. विविध विषयांमधील प्रश्नांचे संच तयार होतेच, त्यातून निवडक प्रश्न घेऊन त्याचा वेगळा संच तयार केला. परीक्षण करण्यासाठी आणि मुलाखत घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना बोलावून घेतले. पन्नास मल्टीमीडिया कांप्यूटर तपासून घेऊन सर्व्हरला जोडून दिले. अशी सगळी जय्यत तयारी त्या दिवशीच करून ठेवली.

दुसरे दिवशी ठरलेल्या वेळी तीस पस्तीस मुली हजर झाल्या. त्यांना परीक्षेला बसवून त्या मित्राने डायरेक्टरला फोन लावला,"खूप उमेदवार आलेले आहेत. त्यांची परीक्षा तासभर चालेल. त्यानंतर विश्रांती आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. त्यात तासभर जाईल. तोंपर्यंत आमची तज्ज्ञ मंडळी परीक्षण करून योग्य मुली निवडतील. त्यानंतर या मुलींच्या मुलाखती घेण्यासाठी तुम्ही येऊ शकाल कां? म्हणजे त्या एकदा तुमच्या नजरेखालून जातील."
"छे! माझ्याकडे एवढा वेळ नाही. हे कामही तुम्हीच करायला पाहिजे."
"ठीक आहे. आम्ही त्या सर्वांचे तांत्रिक कौशल्य तपासून पाहू. आमचे मानसशास्त्रतज्ज्ञ त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेतील. त्यात चांगले वाईट असे नसते, तुम्हाला काय उपयोगाचे आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल. त्यामुळे तुम्ही येऊन एकदा त्यावर फायनल निर्णय दिलात तर ते बरे होईल."
"ठीक आहे, पण माझ्याकडे फक्त पाच दहा मिनिटे एवढाच वेळ आहे."
"हरकत नाही. आमचे तज्ज्ञ प्रत्येकीला फक्त एकच प्रश्न विचारून शितावरून भाताची परीक्षा करतील."
"ओ के"

चांचणी परीक्षा देत असलेल्या प्रत्येक मुलीला एक वेगळा संगणक दिलेला होताच, कानाला हेडफोन लावले होते आणि गळ्यात माइक अडकवला होता. प्रश्नपत्रिकेतचे स्वरूप अजब होते. प्रश्न वाचून त्याखाली उत्तरे देणे होतेच, शिवाय एकादा प्रश्न मॉनिटरवर दिसायचा त्याचे उत्तर माईकवर सांगायचे तर एकादा आदेश हेडफोनवर विचारला जायचा त्याप्रमाणे सांगितलेला प्रोग्रॅम सुरू करून त्यावर दिलेली कृती करायची. एकादा प्रश्न वाचल्यानंतर अदृष्य होऊन जायचा तर एकादे उत्तर लिहिण्याची खिडकी फक्त कांही सेकंदांसाठी उघडी रहात असे. कांही प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे होते तर दिलेल्या एकेका शब्दावर तीन चार वाक्ये लिहायची होती. सामान्य ज्ञान, ऑफीस प्रोसीजर्स, हिशोब, भाषा, व्याकरण, यांसारख्या विषयांची चाचपणी त्यात होतीच, शिवाय संगणक ज्ञान, शॉर्टहँड, टाइपिंग, वाचन, कथन, विवेचन, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, विनोदबुध्दी, हजरजबाबीपणा वगैरेचासुध्दा कस लागत होता. त्यातला एक प्रश्न मानसशास्त्रातला होता.

एक तास संपल्यावर सर्वांनी हुःश केले. या मॅरॅथॉननंतर त्यांना विश्रांतीची नितांत गरज होतीच. थोडे फ्रेश होऊन सा-या रिफ्रेशमंटसाठी गोळा झाल्या. गप्पांसाठी त्यांना एक छान विषय आयता मिळाला होता. कोणी त्या परीक्षेत विचारलेल्या नमूनेदार प्रश्नांचे कौतुक करत होती तर कोणी त्यांची टिंगल करत होती. कोणी हेडफोनवर ऐकलेल्या आवाजाची नक्कल करून दाखवत होती तर कोणी आपण माईकवर कशी गंमतीदार उत्तरे दिली याचे प्रात्यक्षिक दाखवत होती. कोणी बिनधास्तपणे बोलत होत्या तर हे बोलणेसुध्दा टेप होत असेल या धास्तीने कोणी आपण खाण्यात मग्न असल्याचे दाखवून बोलणेच टाळत होत्या.

परीक्षकांनी प्राथमिक फेरीमधून पंधरा सोळा जणींना निवडून मुलाखतीसाठी थांबवून ठेवले आणि इतरांना निरोपाचा नारळ दिला. मुलाखत घेणा-यांनी चार पांच प्रश्न विचारून सेक्रेटरीचे काम करण्यातले त्यांचे प्राविण्य तपासून पाहिले. त्यात अॅपॉइंटमेंट्स देणे किंवा घेणे, डायरी ठेवून कामाचे नियोजन करणे, पुढच्या कामाची सूचना आणि वेळेवर आठवण करून देणे वगैरेंचा समावेश होता आणि एकंदर व्यक्तीमत्व, चालणे बोलणे, त्याती अदब, मार्दव, हांवभाव वगैरे पाहून घेतले. त्यातून पाचसहा जणींची अखेरच्या फेरीसाठी निवड झाली.

ठरल्याप्रमाणे डायरेक्टरसाहेब आले आणि एकेकजणीला बोलावून फक्त एकच प्रश्न विचारला गेला. तो होता," १ आणि १ मिळून किती होतील?"
"०, १, २, ३, ११" अशी या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे आली आणि त्यावर तज्ज्ञांची चर्चा सुरू झाली.

" ० उत्तर देणारी मुलगी नकारात्मक विचार करणारी आहे"
"म्हणजे भांडखोर, एकमेकाशी क्रॉस करून दोघांनाही रद्द करणारी"
"किंवा विध्वंसक प्रवृत्तीची"
"कदाचित अखेरच्या फेरीत असला (?) प्रश्न विचारला यावर तिचा हा मार्मिक शेरा असेल"

"बरं, १ उत्तर देणारी मुलगी स्वतःला विरघळून टाकणारी आहे."
"म्हणजे ती स्वतःचे अस्तित्वच नाकारणार!"
"उलट कदाचित ती दुस-यालाच खाऊन टाकणारी निघाली तर?"
"दोघांनी मिळून एकदिलाने काम करायचे असे ती सुचवते आहे."
"किंवा दोघांच्या वाटा एकाच दिशेने जात आहेत असे..."

" २ असे उत्तर देणारी मुलगी सरळमार्गी दिसते."
"सरधोपट विचार करणारी, अगदी सामान्य कुवतीची.."
"किंवा दोघे मिळून दुप्पट काम होईल असे तिला म्हणायचंय्"
"किंवा दोन वाटांचे पर्याय सापडतील असे.."

" ३ उत्तर देणारी रोमँटिक दिसते आहे"
"किंवा सृजनशील"
"तिला सिनर्जी माहीत आहे"
"नाही तर तुला ही नको, मलाही नको, घाल तिस-याला असा विचार करत असेल"

"११ सांगणारी खूप महत्वाकांक्षी दिसते"
"किंवा कल्पनेच्या भरारीत रमणारी.. "
"किंवा एकावर एक अकरा चे निर्बुध्दपणे पाठांतर करणारी"

तोंडी उत्तरांचा अर्थ लावून झाल्यानंतर चांचणी परीक्षेत दिलेल्या मानसशास्त्रीय प्रश्नाच्या उत्तरांवर चर्चा सुरू झाली. एक या अंकाचा एक ठळक व मोठा आणि एक लहान व पुसट आंकडा देऊन त्यांना पाहिजे तशा प्रकाराने स्क्रीनवर मांडायला त्या प्रश्नात सांगितले होते.



"या चित्रातला लहान १ दूर उभा आहे. ही मुलगी फार संकोची स्वभावाची वाटते."
"किंवा सावधगिरी बाळगून राहणारी"
"किंवा पुढच्यावर दुरून लक्ष ठेवणारी"

"हा १ पुढच्या १ ला चिकटला आहे. ही मुलगी पावलावर पाऊल टाकून अनुकरण करणारी आहे."
"किंवा पाठीराखीण .. "
"किंवा पाठीमागे लागणारी.."
"म्हणजेच पाठपुरावा करणारी .."

"यातल्या लहान १ चे डोके मोठ्या १ च्या डोक्याच्या पातळीवर ठेवले आहे. ही समतावादी दिसते."
"म्हणजेच न्यूनगंड न बाळगणारी .."
"कदाचित स्वतःची उन्नती साधू पाहणारी असेल"

"यातला लहान १ मोठ्या १ च्या डोक्यावर उभा आहे. ही डोक्यावर चढून बसणारी असणार"
"म्हणजे अक्षरशः एकावर एक! वन अप(वू)मन !"
"दोघे मिळून जास्त उंची कशी गाठू शकतात हे ती दाखवते आहे."
"खांद्यावर उभे राहणा-याला अधिक दूरवरचे दिसते हे न्यूटनचे वाक्य तिला ठाऊक आहे"

"यातला लहान १ मोठ्या १ च्या पुढे दाखवला आहे. ही मुलगी कोणत्याही बाबतीत पुढाकार घेणारी आहे."
"समोरून येणारा हल्ला स्वतःच्या अंगावर घेण्याची तिची धडाडीची तयारी आहे."
"अनावर उत्सुकतेपोटी ती पुढे जाणारी दिसते"
"आपल्या पाठीशी कोणी आहे याचा तिला विश्वास वाटतो आहे."
"किंवा तिच्याकडे जबर आत्मविश्वास आहे."

"या चित्रातल्या लहान १ ने मोठ्या १ ला चाट मारून आडवे पाडले आहे. ही खट्याळ दिसते."
"किंवा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तिला दाखवायचे आहे."
"ती तर खाली पडलेल्या मोठ्या १ ला मदत करायला जवळ आली आहे, सुस्वभावी दिसते."

"या चित्रातला लहान १ मोठ्या १ च्या पाठीवर ङभा आहे."
" दुर्गामाता दिसते आहे."
"ती कांहीच नाही, या चित्रातली पहा. यातल्या लहान १ ने मोठ्या १ ला साफ उताणे पाडले आहे."
" आणि त्याच्या छाताडावर उभा आहे."

"आता ही दोन्ही प्रकारची उत्तरे एकत्र पहायला पाहिजेत."

ही चर्चा थांबवून डायरेक्टरने विचारले,"या सगळ्या मुलींना टाइपिंग, शॉर्टहँड येते ना ?"
"हो. सर्वांची त्यात चांगली गती आहे."
"आणि सगळ्याजणी ते बिनचूक करतात."
"अवघड जोडाक्षरे व्यवस्थित लिहितात."
"व्याकरणातले नियम नीट पाळतात."
"त्यांच्याकडे पुरेशी शब्दसंपत्ती (व्होकॅब्युलरी) आहे."

"डायरी कशी ठेवायची हे त्यांना माहीत आहे ना?"
"हो. अॅपॉइंटमेंट्स कशा द्यायच्या हे त्या जाणतात."
"कुणाला ती लगेच द्यायची आणि कुणाला टिंगवायचे हे सुध्दा .. "
"कोणती अॅपॉइंटमेंट घेणे जास्त महत्वाचे आहे याची जाण त्यांना आहे."
"आणि ती कशी मिळवायची असते याची पण.. "

"या सर्वांना नेहमीचे काँप्यूटर प्रोग्रॅम्स येतात ना?"
"हो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वगैरे एमएस ऑफीसची माहिती यातल्या सगळ्या मुलींना आहे."
"ई-मेल उघडणे, त्याचे उत्तर पाठवणे, त्याची अटॅचमेंट्स पाहणे आणि जोडणे वगैरे कामे या सर्वजणींना येतात."
"इंटरनेटवर ब्राउजिंग करून आवश्यक ती माहिती शोधायला पण येते."

"झालं तर मग. ही लाल स्कर्ट आणि सोनेरी टॉप घालून आलेली पोरगी बरी वाटते. तिला जरा चांगले गुण जोडायचे आणि ते माझ्या ऑफीसला कसे उपयोगी ठरतील हे पहायचे काम तुमचे. तेवढे करून तिच्या नांवाने शिफारस देऊन टाका आणि तिला लगेच कामावर हजर व्हायला सांगा.


"?" "?" "?" "?" "?" "?" "?" "?" (कमिटी मेंबर्सच्या चेहे-यावरील भाव)

 
एक शेठ होता, एकदा खुप मोठ्या सँकटात सापडला, प्राण जायची वेळ आली. 
त्यान देवाला नवस केला की आता माझे प्राण वाचले तर मी माझा बँगला तुला देईन. 
देव म्हणाला बँगल्याच मी काय करु ? 
शेठ म्हणाला मी बँगला विकुन सारे पैसे दान करीन. 
त्याचे प्राण वाचले आता नवस पूर्ण करण्याची वेळ आली. 
शेठला वीस लाखाचा बँगला द्यावासा काही वाटेना. 
विस लाख असेच देवुन टाकायचे काय कराव ? 
त्याने ब्राम्हणाला विचारले ब्राम्हणाने मार्ग सुचवला. 
अँडव्हरटाईज आली एक बकरी विकणे आहे किमँत वीस लाख रुपये आणि त्यासोबत बँगला फक्त शभँर रुपयात. 
पटकन बकरी आणि बँगला विकला गेला 
बगँल्याचे शभँर रुपये देवाला दिले, नवस यथासाँग पूर्ण झाला. 

असा देव फसेल का ? अगदी एवढ नाही तरी थोडफार असच सारे देवाला फसवताहेत आणि त्याना वाटत की आपण केलेल्या चुका माफ होताहेत !




***  साथ,सोबत संगत... ***
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तरही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय
चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालंकी हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेलअसं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिलीजे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खातेकाही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही२ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.
तेंव्हाअडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे 
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,
विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतंपरंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं


एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.


' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.


आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.


आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.


राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.


आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.


आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.


संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.


वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.


पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.



शाळेने पत्रक काढलं ,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे , तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा , ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला /विद्यार्थिनीला मिळेल ! 
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे
 , खरोखर पंचाईतच होती . ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की , अगदी एक विजार , एक सदरा असेल , तरी तो रोज धुऊन - वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात . गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं , तुमच्यात कोण गरीब ;तेही सर्वात गरीब म्हणून ?! मोठीच अडचण होती . तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले . वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ; पण लहान मुलांमधे अडचणीचं . शेवटी दोन - चार मुलांना हाताशी घेतलं , जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची . मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची . अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का ? आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले ,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं , तो सर्वात गरीब आहे ." 
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता
 . " कशावरून म्हणता ?" " सर . त्याचा सदरा दोन - तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय . त्याने शिवलाय ; पण फ़ाटलेला शर्ट घालतो . त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत . चपला त्याला नाहीतच .मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो . सर , ती भाकरीही कालचीच असते . भाजी कुठली सर ? गुळाचा खडा असतो .आम्ही सांगतो , तो सर्वात गरीब आहे . शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते . मयूर एवढा गरीब असेल ? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत
कारण
 , मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता . अक्षर स्वच्छ , मोकळं होतं . त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे . एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं ," पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर . असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते . उत्तराल सुबक परीच्छेद , समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे ........."   चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई . माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे .असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये , या गोष्टीचीच मला खंत वाटली . जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो ...... अरेरे !..., मी खूप कमी पडतोय . मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता . अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं . आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही . असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती . केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Parkबघण्याचे राहून गेले . एका छान अनुभवाला मुकला होता तो . हा आनंद मी हिरावला होता . यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही ? मयूर स्वत: हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता ! 
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो
 . खरंच आहे , मुलांनी सुचवलेलं नाव .आर्थिक मदत , तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी . आता शंकाच नव्हती .त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते . मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले .' मयूर जाधव , सातवी अ , अनुक्रमांक बेचाळीस ' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले , " खात्री केलीये ना सर ? कारण थोडीथोडकी रक्कम नाही . या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी , त्याचे शालेय शिक्षण साहित्य ,गणवेश ... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे ." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं , " सर , त्याची काळजीच करू नका . वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर - मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो . मयूरला मिळणारी मदत , त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही .  दुस ~ या दिवशी शाळेत लवकरच गेलो . देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता . त्यावर ' गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं .   शाळा भरली . मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो . इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला . त्याच्या चेह ~ यावरचा भाव समजत नव्हता . राग आवरावा तसा करारी चेहरा ... 
"
 सर , रागवू नका ; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका ." 
"
 अरे , काय बोलतोयस तुला समजतय का ?" 
"
 चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा ; पण ते नाव ...!!" 
त्याच्या आवळलेल्या मुठी
 , घशातला आवंढा , डोळ्यातलं पाणी ...... 
मला कशाचाच काही अर्थ लागेना
 . मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत , तो असा.....? " सर , मला मदत कशासाठी ? गरीब म्हणून ? मी तर श्रीमंत आहे ."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती . येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते . 
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती

"
 अरे पण ....?" 
"
 सर , विश्वास ठेवा . मी श्रीमंत आहे . कदाचित सर्वात श्रीमंत असेन ... सर , मी गरीब आहे हे ठरवले कोणी ? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला ; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज ." 
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले
 . त्याला उठवत मी म्हणालो ,"ठीक आहे . तुला नकोय ना ती मदत , नको घेऊस ; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?" 
"
 सर , माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा , कुठल्याही विषयाच्या .... त्या पूर्ण आहेत .पुस्तकं मी Second Hand वापरतोय ... खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का ? सर , माझे पाचवीपासूनचे मार्क बघा , नेहमी पहिल्या तीनात असतो . गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर ... सर , सांगा ना , मी गरीब कसा ?" मयूर मलाच विचारत होता 
आता मघाचचं दु
 : खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं . 
"
 खरयं मयूर . पण तुला या पैशाने मदतच ......." 
"
 सर , मदत कसली ? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल . शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर , मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"
 म्हणजे ?"  
"
 वडील घरांना रंग द्यायचे काम करतात .Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते .तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात . चार पैसे मला मिळतात , ते मी साठवतो . सर ,संचयिका आहे ना शाळेची , त्यातलं माझं पासबुक बघा . पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात ... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते ..... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं . पण सर , मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे .घरातले सगले काम करतात . काम म्हणज कष्ट . रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात . आई धुणं - भांडी करते . मोठी बहीण दुसरी - तिसरीच्या शिकवण्या घेते . सर , वेळ कसा जातो , दिवस कसा संपतो ते कळतच नाही ....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत . तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी . सर , माझ्या घरी याच तुम्ही , माझ्याकडे पु . ल . देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे . . 
.......
 सर , आहे ना मी श्रीमंत ?" 
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता
 .
सर , शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो . रात्री देवळात होण्या ~ या भजनात मीच पेटीची साथ देतो . भजनीबुवा किती छान गातात ! ऐकताना भान हरपून जातं ." त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता . 
अभावितपणे मी विचारलं
 ," व्यायामशाळेतही जातोस ?" " सर , तेवढी फ़ुरसत कुठली ?घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ." अंगावर एक थरार उमटला ... कौतुकाचा . 
"
 मयूर मित्रा , मला तुझा अभिमान वाटतो . तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."
" म्हणूनच म्हणतो सर ......!" 
"
 हे नाव ज्या कारणासाठी आहे , त्यात तू नक्कीच बसणार नाहीस . आमची निवड चुकली ; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल . शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून , हे पारितोषीक तरी ........." 
"
 सर , एवढ्यात नाही . त्याला वर्ष जाउ द्या . मी लिंकनचं , सावरकरांचं चरित्र वाचलं ,हेलन केलरचं चरित्र वाचलं . सर , हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली . माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या , योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा ; पण सर , नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल .जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल ... सर ..... प्लीज .....!"
वाचनानं , 
स्पर्धांतल्या सहभागानं
 , 
कलेच्या स्पर्शानं
 , 
कष्टानं
 ....... 
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती
 , 
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती
 . 
आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता
 . 
त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते
 . 
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता
 . 
परिस्थिती पचवून
 , परीश्रमाने स्वत : वर पैलू पाडणारा 
श्रीमंत 
सर्वात श्रीमंत

 

Make a Free Website with Yola.