तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी



"तू जशी आहे तशी निघून ये. डॉक्तरांनी आईला दवाखान्यात भरती व्हायला सांगितलाय पण ती आमच कोणाचंच ऐकत नाहीये. कदाचित तुझ ऐकेल." दादाचा हा निरोप वाचून ऋतू एक क्षण गोंधळून गेली. आई आणि असहकार हे समीकरणच तिला पटत नव्हते. खर तर आईला, एक पूर्णपणे सहकार्य करणारा रुग्ण असे प्रशस्तीपत्रक पण दिले होते. आणि हीच आई आज दवाखान्यात भरती व्हायला नाही म्हणत होती. ऋतूला काही सुचेनासेच झाले होते.

तशी आईच्या तब्येतीची आणि तिच्या नवीनच उदभवलेल्या आजारची थोडीफार कल्पना सगळ्यांना होती. गेले ३० वर्षापासून मित्र असलेला बी. पी. आता हळू हळू आपले हात पाय पसरू लागला होता. त्याने एकदम थेट आईच्या हृदयातच हात घातला आणि त्याचा आकारच मोठा केला. आई गमतीत म्हणायची पण " हम तो अब बडे दिलवाले होगये." आईच्या विशाल मनाचा मोह त्यालाही पडला होता. आईच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेत बी. पी. ने आपला परिणाम आता मेंदूवर पण दाखवायला सुरुवात केली होती. आईच्या मेंदूत लहान गाठ झाली होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करून ती गाठ काढावी लागणार होती नाही तर त्याचे दुष्परिणाम आईला खूप सहन करावे लागले असते. हे सगळे माहित असूनही आईने दवाखान्यात भरती व्हयला नकार दिला होता.

आईच्या ह्याच वागण्याच कोड सगळ्यांना, अगदी ऋतूला सुद्धा पडल होत. आत्तापर्यंत तिने तब्येतीवर झालेले हल्ले यशस्वी रित्या परतवून लावले होते. कधी मनाला उभारी देवून तर कधी खूप औषध घेवून तर कधी वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून ती जिद्दीने उभी राहिली होती. आई आणि कच खाणे हे कोणाला माहितीच नव्हते जणू. मला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मी माझी तब्येत नीट ठेवणारच हाच तिचा नेहमी घोषा असायचा. आणि हीच आई आता सगळ्याकडे पाठ फिरवत होती. आईच्या ह्या वागण्याचा अर्थ न कळल्याने ऋतू खूप उदास झाली होती. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. आईला भेटायला जायचे तर समोर कामाचा हा ढीग पडला होता. तिला काहीच कळत नव्हते, पण शेवटी तिने निर्णय घेतला कि उद्या सकाळीच वसइला जायचे आणि आईशी प्रत्यक्ष बोलायचे. तिला समजवायचे नाही ऐकल तर जबरदस्तीने तिला admit करायचे ह्या निश्चयाने ती झोपली.

आईचा हाडाचा सापळा बघून ऋतूला एकदम रडूच कोसळले. बी. पी. तरी मित्रा सारखा वागला होता पण हा ब्रेन ट्युमर एका गिधाडा प्रमाणे तिच्यावर वार करत होता. त्याला आटोक़्यात नाही आणले तर तो आईला कश्या प्रकारे त्रास देईल हे खुद्द डॉक्तर पण सांगू शकत नव्हते.

"आई अग काय हा वेडेपणा? तू कोणाचच ऐकत का नाहीयेस?"
"ऋतू ह्या विषयावर खूप चर्चा झाली आहे मला परत तू बोलायला लावू नकोस. माझा निश्चय अटळ आहे."
"तरी सुद्धा मला खर कारण जाणून घ्यायचं आहे. तुझ 
कारण जर खरच योग्य असेल तर कदाचित मी तुझी बाजू इतरांना समजवून सांगू शकेन."
"कारण सांगायलाच हव का?" आईच्या या अगतिक प्रश्नावर ऋतू काहीच बोलली नाही पण तिने आईशी आबोलाच धरला. 

बराच वेळ ऋतू काहीच बोलत नाहीये हे पाहून शेवटी आईच म्हणाली "ऋतू तुला माहित आहे ह्या शस्त्रक्रियेला किती खर्च येतो? कमीत कमी ६-७ लाख. आणि एव्हढा खर्च आत्ता करणं मला नाही पटत. म्हणून मी नाही म्हणते आहे."
"आई मी तुला खर कारण विचारलं होत." रागावूनच ऋतू म्हणाली. "तुला चांगलंच माहित आहे कि दादा काय, मी काय किंवा बाबा काय आम्हा सगळ्यांना ७-८ तर जावूच दे १५-२० लाख रुपये उभं करणं सहज शक़्य आहे."
"मी एक sr. project manager आहे.मला माझ्या मेडीक्लेम मधून आरामात तेव्हढे पैसे परत मिळतील. दादाचा तर स्वताचा व्यवसाय आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खूपच चांगला चालला आहे. काही करोड्स मध्ये निव्वळ नफा कमवणाऱ्याला इतके पैसे काहीच नाही. आई परत सांगते मला खर कारण सांग."

"तू एव्हढी जिद्द करते आहेस तर मग ऐक." बऱ्याच वेळाने धीर एकवटून आई म्हणाली.
"आता ह्या वर्षी मी झाले ७२ वर्षांची. देवाने मला एक छान आयुष्य दिल. तापट असला तरी समजून घेणारा, मनापासून प्रेम करणारा नवरा, आपापल्या क्षेत्रातली यशस्वी अशी तुम्ही दोघं, आणि छानशी ४ नातवंड. आयुष्या कडून अजून काय पाहिजे? सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आता शांतपणे जावूदे त्याच्या कडे."
"अस कस बोलू शकतेस तू आई? आई तुझी खंबीर साथ अजून पाहिजे ग आम्हा सगळ्यांना. माझी खात्री आहे हे operation झाल्यावर परत सगळे ठीक होईल. तू अस विचार नको ना करू." अगतिक पणे ऋतू म्हणाली.

"बेटा मला अगदी मान्य कि मी नवऱ्याला तर साथ दिलीच पण तुम्ही दोघेही जेंव्हा आपापल्या संसारात आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वताल सिद्ध करत होता त्यावेळी पण तुम्हाला वेळोवेळी साथ दिली. सुनेला पण तिचे शिक्षण पूर्ण करायला पूर्ण सहकार्य केले. पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची पूर्ण वेगळी आहे. तुम्हा दोघांचे आपापल्या संसारात, व्यावसायिक क्षेत्रात खंबीर पणे पाय रोवून उभे राहणे हे मी एक प्रकारे माझी जबाबदारी मानली. आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी पण झाले.
आता हीच भूमिका तुम्हाला तुमच्या मुलांना मोठ करताना वठवायची आहे. आणि तुम्ही दोघेही त्यात यशस्वी व्हालच. पण हे शिव धनुष्य पेलताना कधी मवाळ, तर कधी ताठर तर कधी तरी एकदम आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. कधी कधी तणावाचे प्रसंग पण येतील. हे सगळे मला अलिप्त राहून पण बघता नाही येणार आणि सहन पण होणार नाही. त्या पेक्षा आत्ता एक सुखी समाधानी चित्र साठवून तृप्त मनाने निरोप घेवूदेत."
बराच वेळ झाला पण ऋतू काहीच बोलत नाहीये हे पाहून आईच पुढे म्हणाली, "मला माहिती आहे ह्याचा स्वीकार करणं खूप कठीण आहे. अग मी तुमच्या मनात कायम असेन.तुमच्या संस्कारातून, तुमच्या वागणुकीतून कायम माझेच प्रतिबिंब दिसेल. शेवटी आज नाहीतर उद्या जायचेच आहे तर आज हे सुखी समाधानी चित्र का नको घेवून जावू?"
आईच्या ह्या बोलण्यावर ऋतूला कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासे झाले. आई जे म्हणत होती ते बुद्धीला थोडेतरी पटत होते पण मनाला सहनच होत नव्हते.
"आई जी गोष्ट उद्यावर जावू शकते ती आजच करायची तुला घाई का?" इतका वेळ माय-लेकींचे बोलणे शांतपणे ऐकणारा दादा म्हणाला, 

"आई तू नेहमीच म्हणत आली आहेस कि जेंव्हा मन एक म्हणत आणि तुमची बुद्धी काहीतरी दुसर म्हणते त्यावेळी नेहमी आपल्या मनाचे ऐका. आई मला सांग तुझ मन नाही सांगत का मुलांची जशी प्रगती पाह्यली तशी नातवंडाची पण पहावी. तुझ मन नातवंडात नाही अडकत? मग का नाही तू आपल्या मनच ऐकत?"
"नाही रे राजा. कुठल्याही यशाकडे नेणारा मार्ग सोपा नक्कीच नसतो. अनेक अडथळे असतात त्यात. तुम्हा दोघांच अडखळण, पडण मी पाहू शकले. तुम्हा दोघांना परत उभ राहायला मी मदत पण करू शकले. पण नातवंडाच तस नाही रे. अरे साकेतचा टी. व्ही. कमी करण्यासाठी तू ओरडतोस त्यावेळी माझा जीव तुटतो रे. नातवंडांच पडण-झडण आता नाही पाहू शकत. त्याच्या चांगल्यासाठी तू जेंव्हा खंबीरपणे निर्णय घेशील तर कदाचित मीच पहिला अडथळा असेन रे."
"पण आम्हाला तस वाटत नसेल तर. आणि तुझा अडथळा पण आम्ही व्यवस्थित पार पडला तर तुझी काही हरकत नाही ना?"
दादाच्या ह्या प्रश्नावर आई काही क्षण बोलेनाशी झाली. 
"ठीक आहे तुम्ही आपल्या राजगुरू डॉक्तरांना भेटा. ते जर हो म्हणाले तर मी operation करायला तयार आहे."
डॉ. राजगुरू हे family डॉक्तर. ऋतूचा जन्म पण त्यांच्याच देखरेखीखाली झालेला होता. ते पूर्ण कुटुंबाला ओळखत होते. आईची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. तिला जर का दुसऱ्या डॉक्तर कडे जावे लागले तरी ती तिची सगळ्या उपचाराची त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची. ऋतू आणि दादा तर नेहमी त्यांचेच उपचार घ्यायचे आणि आता तर त्या दोघांची मुले पण त्यांचेच सल्ले मानायचे. दोनही कुटुंबा मध्ये एक वेगळाच जिव्हाळा होता म्हणूनच आईला त्यांची खूप खात्री होती कि ते योग्य सल्ला देतील.
"आई जे म्हणते आहे ते स्वीकारायला जरी कठीण असले तरी योग्य आहे." राजगुरू डॉक्तरांचे हे म्हणणे ऐकून बाबा, दादा, ऋतू सगळ्यांना धक्काच बसला.
"डॉक्तर तुम्ही असा कस म्हणता?" बाबाना आपला आवेग आवरता आला नाही.
"आम्ही तुमच्याकडे एक आशा घेवून आलो होतो कि तुम्ही आईला operation  साठी तयार कराल. आईचा स्वतावर नाही एव्हढा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही अस म्हणता. " ऋतू म्हणाली.
"तुम्ही पूर्ण विचारांती आम्हाला योग्य सल्ला द्याल ह्याची खात्री आहे. पण हे सगळे मनाला खरच पटत नाहीये. ह्याच्यावर उपचार असून सुद्धा नाही करायचे हे कस शक़्य आहे?" बाबांना शांत करत दादा म्हणाला.

"परमेश्वराची अजब निर्मिती म्हणजे आपला मानवी मेंदू. डॉक्तरांना आव्हान देणारा शरीरातला अवयव म्हणजे मानवी मेंदू. ह्या मेंदूला, तो करत असलेल्या कामाला समजण म्हणजे एकदम अवघड काम आहे. आत्तापर्यंत फक्त २०% मेंदू आणि त्याचे कार्य शास्त्रज्ञांना समजले आहे. अजून ८०% मेंदू समजलाच नाही. मेंदूच्या तक्रारीवर अजून खात्रीशीर उपचार निर्माण झाले नाहीयेत. "
"म्हणजे operation झाल्यावर आईची सुधारण्याची आशा....."
"फक्त ५%." ऋतूचे वाक़्य मध्येच तोडत डॉक्तर म्हणाले, "शिवाय आई वर त्याचे अजून काय परिणाम होतील सांगणे खूप कठीण आहे. कदाचित ती हिंडू फिरू पण शकणार नाही."
"पण डॉक्तर, इतर  डॉक्तर तर खूप वेगळं सांगत आहेत. ते तर आमच्या पाठीच लागले आहेत कि लवकरात लवकर भरती व्हा. तुम्ही गैर समज नका करू. ते म्हणत आहेत कि ती ठीक होवूननित हिंडा फिरायला लागेल." बाबा म्हणाले.
"तुम्हाला आणि ह्या वैद्यकीय क्षेत्राला मी चांगलाच ओळखतो. हा मेंदू सगळ्यांना चांगलाच आव्हान देत आला आहे. त्यांना ह्या केस मधून एक अनुभव घ्यायचा आहे. डॉक्तरांना चांगलीच कल्पना आहे कि तुम्ही सगळे जण शिक्षित आहात उद्या रुग्णाच काही बर-वाईट झाल तर तुम्ही समजून घ्याल. माझा अनुभव आणि त्यांची तब्येत सांगतेय कि हे operation त्या सहन नाही करू शकणार."
"त्यांना अनुभव मिळणार असेल तर तस. हा अनुभव आज ना उद्या उपयोगी पडेल. आणि आम्हाला पण समाधान कि आई साठी आम्ही सगळे प्रयत्न केले." दादा म्हणाला.
"हा अनुभव फक्त मोजक़्याच लोकांना उपयोगी पडेल खरच तस वाटत असेल तर त्यांचे देहदान करा एका चांगल्या वैद्यकीय रुग्णालयाला.त्यांचे नेत्र दान करा. आईसाठी काही करायचे असेल तर त्यांचे हे दिवस उत्तम कसे जातील हेच बघा. त्यांना आता एकाचा गोष्ट देवू शकता तुम्ही ती म्हणजे तुमचा वेळ." डॉ. राजगुरू  आपले म्हणणे संपवत म्हाणाले, "त्यांच्या धीराचा सन्मान करा आणि साथ द्या. ह्या नीट होण्याच्या जंजाळात अडकू नका."

सगळ्यांच्या मताला ना जुमानता दादाने तिला भरती केलेच पण बी. पी. आटोक़्यात न आल्याने तिला परत घरी आणावे लागले. स्वीकारायला कठीण असला तरी आईचा निर्णय हा नेहमी प्रमाणेच योग्य ठरला. हळू हळू तिची तब्येत ढासळत होती. तिचे हे हाल तिच्या मित्राला पण बघवले नाही आणि त्यानेच तिची ह्या सगळ्यातून सुटका केली. बी.पी. अचानक खूप वाढल्याने ब्रेन इंज्युरी होवून तिची प्राण ज्योत मालवली.
गरज असेल तेंव्हा पूर्ण शक्तीनिशी लढायचं असतं, धावायचं असत आणि योग्य वेळी थांबायचं असत. जाता जाता हि शिकवण आई आम्हा सगळ्यांना देवून गेली होती.

साभार - लेखिका : राजश्री 

    मन माझे संस्थेतर्फे आम्ही १५ ऑगस्ट  २०११ रोजी  पनवेल  तळोजा  येथील  परमशांतीधाम  वृधाश्रमासाठी  काही मदत  योजना  आखली  आणि  तिथे  जायचा  योग  आला ..आणि  एक  हृदयस्पर्शी अनुभव  अनुभवायला  मिळाला  तोच  थोडक्यात  सर्वांसोबत  मांडत  आहे ..


अंदाजे  सकाळी १०  च्या  सुमारास  परमशांतीधाम  आश्रमात  आम्ही  प्रवेश  केला  


 आणि  एक  आजोबा  जाड भिंगाचा चष्मा , अंगावर करड्या रंगाच हाल्फ शर्ट घालून उभे होते आणि  जिज्ञासेने  पाहत होते  कि  आम्ही  कुठून  आलो  आहोत ...


बाहेर  आमच्या  गाडी  वरील  नाव  वाचून  गाडी कडे बोट करून तेच बोट ... आमच्याकडे फिरवत त्यांच्या  थरथरनार्या आवाजात  "मंन  माझे आणि काही शब्द पुटपुटले,   आणि  मि  म्हटलं.. "हो  आमचा  मंन  माझे ग्रुप आहे  ..तिथून आलो आहोत सर्व !!" :)  त्यांच्याशी दोन शब्द बोललो ..त्याचं नाव जोशी होत !!


तिथे रोज सत्संग  १२  च्या आसपास  सुरु  होत  असल्यामुळे आमच्याकडे  फक्त  दोन  तास  होते  ज्यामध्ये  आम्हाला  त्यांना  आणलेली  भेटवस्तू  द्यायची  होती ..अंदाजे  ७५ वयोवृद्ध  त्या  आश्रमात  होते ..२  मजली  इमारतीत  वेगवेगळ्या  खोलींमध्ये  ४  ते  ६  असे  वयोवृद्ध  एकत्रपणे   राहतात ..
आणि  मग  आम्ही  एक एक  आजोबा  आजीना भेटावयास  सुरवात  केली ..


पहिल्यांदाच  मि  ज्या  आजोबाना  भेटलो  त्यांच्या  ओठांवर  सुरेख  स्वागतार्ह्य  हास्य  होते  आम्ही   त्यांची विचारपूस  केली ..अगदी  उत्कृष्ट   इंग्लिश  भाषेत  ते  आमच्याशी  बोलत  होते ..
.
पुढे  एक  आजोबा  ज्याना  भेटताच  त्यांच्या  डोळ्यात  अश्रू  भरून  आले ...


हिंदीत  म्हणाले .." तुम  सब  लोगो  ने हमारे  लिये  वक़्त  निकाला  और  मिलने   को  आये .. .हमे   बहोत  अच्छा   लगा ..दिल  खुश  हो  गया..भगवान आप सबका भला करे " ..असे  म्हणत  त्यांनी  आम्हाला  आशीर्वाद  दिले ..त्यांच  रडू  सावरता  सावरता  माझे  डोळे  पण  पाणावयाला  सुरु  झाले ...त्यांच्या अश्रुनी  डबडबलेल्या  डोळ्यांमध्ये  खूप  प्रेम  दिसत  होत  आमच्यासाठी ....

नंतर  एका आजोबांची  तब्येतीची विचारपूस  केली   ....

त्यांच्या  मुखातून  उत्साहाने  शब्द  निघाले ..अरे आजारपण  तर  येत  जातच  असत ..लाईफ  मध्ये  चेंज   असायलाच  हवा ..एक रुटीन लाईफ असं  हे  कटाळवाणे असत ..सो  चेंज  इस  मस्ट   इन लाईफ ..:) त्यांचे  स्मितहास्य  नजरेत  टिपत आम्ही पुढच्या खोलीत गेलो

त्या  खोलीत  एक  अपंग  वृद्ध  बिछान्यावर  झोपून  होते  ..दोन्ही  हात  छातीशी  खिळलेले , बोलायला  जमत  न्हवत ..ना  हि  उठायला  जमत  होत ...पण  आम्हाला  पाहून  त्यांच्या  चेहऱ्यावर  आनंद  होता ..आम्ही  त्यांची विचारपूस  करत  होतो  तेव्हा  तेथील  काम  करणारा  मुलगा  आम्हाला  ते  काय  बोलत  आहेत  ते  समजावून  सांगत होता ..त्यांनी  इशार्यानी  सांगितलं  कि  ते  गुजराती  आहेत ..मग  मित्राने  गुजराती  भाषेत  काही  शब्द बोलताच  त्याच्या  चेहरा  आनंदी  झाला ..


आमच्याकडील  तिरंगी झेंडा त्यांना हवा  अशी  इच्छा  केली  आणि  तो लावताना  फोटो  काढावा  अशी  इशार्याने  विनंती  केली ..काढलेला  फोटो  पाहून  पुन्हा  त्यांचा  चेहरा आनंदाने  फुलला ..त्यांनी  त्याचं  नाव  सांगण्याचा  प्रयत्न  केला ..किशोरकुमार  ठक्कर  आणि  फोटो  पाठवण्याची  विनंती  केली ..शरीराने  अपंग  असूनही  मनाने  अगदी  एका  तरुण  मुलाप्रमाणेच  वागत  होते  हे पाहून  खूप  आनद  झाला ..

पुढे  एक  आजोबा  ..नाव रघुनाथ शेळके ......"इंग्लिश  येत  तर  ति  व्यवहारात  वापरा , जग  खूप  पुढारलेल  आहे"  असे  आम्हास  उत्स्फुरतेने  म्हणाले ...आंबेडकरांचे  भक्त  असे  ते  आजोबा  शेरो  शायरी  खूप  छान  करतात  असे  कळल ..मित्रा कडे त्यांच्या  काही  कविता  आहेत  त्या  मि  आपणास  सादर  करतों


किसीकी याद मेरे आस पास रहती है
बहुत दिनोंसे तबियत उदास रहती है
बिछड गये मगर दिल मानता नही
क्यों उसे मिलने की आस रहती है

मौत सबकी मंजिल है
जिंदगी एक सफर है
मत तोडना किसीका दिल
हर दिल खुदाका घर है

आशिक कभी मरते नहीं
जिंदा दफनाए जातें है
जब भी कबर खोल के देखो
ईंतजार मे पाए जाते है

किसीको अपना बनानेसे क्या फायदा
अब किसीका किसीको भरोसा नही
मेरे पहलु उठकर चले भी गए
वादा-ए-वापसी का भरोसा नही

देखो टकरा रही है नजरॊसे नजर
वो न आए न आयी खुशियोंकी घडी
जानेवाली खुषी तो चली भी गई
आनेवाली खुषी का भरोसा नही

फैसला साथ रहनेंका करलो अभी
आजका काम कलपर ना डालॊ कभी
जिंदगी कल रहे ना रहे क्या खबर
जानेमन जिंदगीका कुछभी भरोसा नही

असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

हा कलीयुगाचा फेरा
कसा वाहे उलटा वारा
ना सत्याला थारा देवा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

सांगे कोणी भोळ्या जनतेला मी देशभक्त मोठा
मारुनी थापा सा-या कमवी सा-या नोटा
नसे देशभक्ती त्यांची होई बोजवारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

ठाई ठाई अन्याय अत्याचारा तो उत येई सारा
पाहुनी कोणी दुबळ्या अबलेवर करती बलात्कार न्यारा
मग सांग देवा तुच आता देईल कोण निवारा??
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

सत्य अहिंसेचे सारे गोडवेच गाती
पण वरकरणी पाहूनी फुक न्याय करती
पुसे शेळके दादा कुठवर चालेल हा नंगानाच सारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

पुढील  खोलीत  एका  आजोबांशी  संवाद  साधला ..

गावापासून   सर्व   विचारपूस  केली  माझी ..आणि  एक  फोन करू  का ? अशी  विनंती  केली ..मि   त्यांनी  सांगितलेला  नंबर  लावून  दिला ..आपल्या  नातेवाईकांशी  त्यांनी  थोड्या  गप्पा मारल्या,  विचारपूस  केली  त्यांची ..त्यांचे  नातेवाईक  मला  विनंती  करून  म्हणाले  कि  त्यांच्याकडे  मोबाईल दिला  आहे  पण  त्याना  चार्ज  कसा  करायचा  , चालू  कसा  करायचा  माहित  नाही  ..प्लीस  सांगाल  का ?..
मि  सोप्याभाषेत  सांगण्याचा  पर्यंत  केला ...पण त्यांच्यासाठी हे तंत्र समजण अवघडच असावे ..

पुढच्या  खोलीमध्ये  गेलो ..एक  वृद्ध  आजी  बेडवर  पडून  होत्या ....
नुकतेच  काही  महिने त्यांची  तब्येत ढासळलेली   होती  अस  त्यांच्या  बोलण्यातून  समजल ...सुरवातीला  शांत  चेहरा  वाटल्यामुळे  ..कदाचित  त्या  काही जास्त  बोलणार  नाहीत  अस  वाटत  होत ..पण  मि  थांबलो  आणि  विचारपूस  केली  आणि  त्यांनी  बोलायला  सुरवात  केली ..
आर  यु   मराठी ?  अस  विचारून  त्याना  आम्ही  हो  म्हटल्यावर  मराठीत  संवाद  सुरु  केलां ..त्यांनी  इतक्या  वर्षात कधी  औषध  घेतलीच  नाहीत  असे  म्हणाल्या ..त्यांची  एक  मैत्रीण  येते  आणि  ते  रेकी  ट्रीटमेंट करतात ..वय  वाढल्यामुळे  फरक  लवकर  नाही  पडत  रेकीचा पण  त्यांची तब्येत सुधारत आहे  याची  त्याना  जाणीव होती ..आध्यात्मिक  विषयावर  बोलण्यास  त्यांनी  सुरवात  केली  आणि   सप्त  शरीराबद्दल  थोडीफार  माहिती  दिली कि मानवाच्या  सप्त  शरीरामधील  वरच्या  पातळीवरील  ३  सुश्म शरीरांना  जर  इजा  पोहोचली  तर  इतर  शरीराला व्याधी  होतात  ...इत्यादी  थोडफार  आध्यात्निक  ज्ञान  आम्हाला  सांगितलं  याचबरोबर  तुमच्या  ज्या  स्किल्स आहेत  त्या  तुम्ही  वापरून  स्वताचा  विकास  करावा  असा  मोलाचा  सल्ला  पण  दिला ...

त्यानंतर  एका काकुना  आम्ही  भेटलो ..
मि  गेलो  तेव्हा  त्या   इतर  सभासदांशी  बोलत  आणि  रडत  होत्या ..त्यांची कहाणी  ऐकून  खूप  वाईट  वाटलं ..मुलगी  झाली  म्हणून  नवर्याने  घरा  बाहेर  काढलं  आणि  त्याच  मुलीला सांभाळून  त्यांनी  मोठ  केल  लग्न  लावलं ..घर  मुलीच्या  आणि  जावयाच्या  नांवावर  केल  आणि  शेवटी  त्यांनाच घराबाहेर  पडाव   लागल ..एका  मातेच  हृदय  ओक्षाबोक्षी  रडत  होत ..मला  म्हटलं  किती  सांगेन  तुला  माझ दुखः  खूप  आहे  सांगण्यासारख ..माझे डोळे सुद्धा भरून आले .आणि  त्याचं  जगन पाहून  हेच  शब्द  आठवले ...

कुणीच  कोणाचा  नसतो  साथी
देहाची  अंती  होते  माती
आपणच  आपल्या  जीवनाचे  सोबती
हवीत  कशाला  हि  खोटी  नाती .

.....थोडावेळ  तिथेच  राहिलो  काकुंच्या  डोळ्यातील  अश्रू  कमी  होई पर्यंत .......

बाहेर  आलो  तर  काही  आजोबा  आमच्या  ग्रुप  बरोबर  गप्पा  मारत  होते ..
मस्करी  थट्टा  विनोद  सुरु  होते ...आम्ही  रिक्वेस्ट   केल्यावर  एका  आजोबांनी  " पावलीला बोंबील बारा ..." .तसेच "धनगर राजा वसाड गावाचा......" हि सुंदर गाणी बोलून  दाखवली ,..  तेवढ्यात  ते  दुसरे  आजोबा ज्यांनी  फोन  लावायला  विनंती  केलेली  ते  आले ..

आणि  आजारी असल्यामुळे खुर्ची  वर  बसून  आम्हाला  काही  गाणी ऐकवली ..वयाच्या  मानाने  त्याचा  आवाज  आजही  एका  तरुणाप्रमाणे  होता  आणि  खूप  सुंदर  अशा  आवाजात त्यांनी  गाणी  ऐकवली .." शाम ढले..खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो........." ,  " ए मेरे दिल काही ..और चल, गम के  गम कि दुनिया से दिल भर गया.........." तसेच " मेरा दिल ये पुकारे आजा ...मेरे गम के सहारे आजा...भीगा भीगा ये समा.... "इत्यादी जुनी सुंदर गाणी बोलून दाखवली, त्यांच्या गाण्यात आणखी एक खासियत होती कि ते शब्दांमार्फत मुझिक सुद्धा देत होते !  तब्येतीच्या  तक्रारी  मुळे  जास्त  वेळ  बसू  शकत  न्हवते  म्हणून  आम्हाला  विनंती करून  एक  गाण  मधेच  थांबवाव  लागल  त्यांना ...

नंतर  सत्संग   सुरु  झाला आणि तासभराने  भोजनाची  वेळ झाली ....." ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः " हा मंत्र जप भोजनापूर्वी सर्व जण करत होते आणि सर्वांनी जेवण ताटात वाढून घेतल्यावरच एकत्र सर्वांनी भोजन सुरु केल , 

आम्ही  त्यांना  भोजन  वाढून  आनद आणि थोडफार   पुण्य  मिळवलं तसेच तेथील काकुंच्या  विनंती  म्हणून  स्वामींचा  प्रसाद   म्हणून  थोडस  अन्न  ग्रहण  केल ..!

काही  आजोबा  आजी  हे  ठाण्याला  एका  कार्यक्रमाला  गेलेले  त्यातील  एका  आजोबाना  आम्ही  जाता  जाता भेटलो ..प्रसन्न    व्यक्तिमत्व , चेहऱ्यावर  तेज ,,त्यांचे  बोल  ऐकून  सर्व   जण  भारावून  गेले  होते ..

आमचे आभार  मानून  ते  म्हणाले  कि  मानवसेवा  सध्या  दुर्मिळ  होत  चालली  आहे ..जग  आता  अस  आहे  तर  उद्या  यापेक्षा बिकट  परिस्थिती  येवू  शकते  म्हणून  उद्या  कुठे  वृद्धाश्रम  असू  नये  अशीच  आशा  त्यांनी  व्यक्त केली ..सर्वजन  आपल्या  संसारामध्ये  सुखी  असावेत  आणि  कोणाला  वृद्धाश्रम  मध्ये  जाणे  लागू  नये  अशीच प्रार्थना  त्यांच्या  शब्दातून  दिसत  होती ..

सर्वांशी  भेटून  मनाला  एक  आत्मिक  समाधान  लाभल ..सर्वाना  जो  वेळ  दिला  तो  खूपच  कमी  होता  अस भासल ..प्रत्येकाच  दुख इतक  मोठ  आहे  कि  त्याना   जेवढा  वेळ  देवू  तेवढा  कमी  आहे ...मित्रानो आपण  जी  मदत केली  आहे  त्यापेक्षा  खरी  त्याना  गरज  आपल्या  प्रेमाची  आणि  वेळेची  आहे म्हणून मन माझे कडून पुढे सुद्धा असेच कार्य होत राहील असा आपण प्रण करू !!
                                                                                                          
                                                                                                            धन्यवाद !!
                                                                                                       - सचिन हळदणकर

                                                  

            १५ ऑगस्टचा मुहूर्त साधून टीम मन माझेतर्फे, आम्हा सर्वांचे "परमशांतीधाम वृद्धाश्रमास" भेट देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे हजेरी लावली. नाही म्हणता म्हणता २२ सभासद आश्रमास भेट देण्यास आले. तिथे पोहोचल्यावर आम्ही जेव्हा तिथल्या वृद्ध व्यक्तीना भेटलो, तेव्हा त्यांच्या चेहेर्यावर एक वेगळाच भाव, एक वेगळंच तेज होतं. जणू काही आम्ही त्यांच्यासाठी काही घेऊन आलो आहे, यासाठी नव्हे तर, आम्हाला भेटण्यासाठी कोणतरी आलं आहे,आपलं स्वतःच कोणतरी???
            जवळपास ७५ जणांचा समुह असलेलं आश्रम. "स्वामी आबानंद्गिरी महाराज" यांच्या छत्रछायेखाली मोठा झालेला हा आश्रम आहे. या आश्रमात खूप चांगले आणि काही वाईट अनुभव आमच्या पदरी आले. खरच त्यांच्या नशिबी हे असं जगणं का??? प्रत्येक आजी आणि आजोबा आम्हाला स्वतः बोलावून त्यांचे अनुभव सांगत होते,आणि ऐकताना खरंच डोळ्यात अश्रू तराळत होते. 
            आम्ही एका खोलीत गेलो तिथे १ आजी होत्या, त्यांचं नाव आठवत नाही,पण त्यांनी त्यांचा जीवनपाठ आम्हाला सांगितला. नुकत्याच ६ महिन्यापूर्वी त्या तिथे आल्या होत्या. का तर कारण असं की, सांभाळणारा एकुलता एक मुलगा होता, पण तोच परलोकी गेला,आणि या दांपत्याचा आधारस्तंभच ढासळला. त्यांच्या पतींना हत्तीरोगाचा त्रास आणि त्यामुळे दोघांनीही आश्रमाचा रस्ता धरला.दोघेही बाजुबाजुच्या खोलीत आहेत,आणि जवळ राहून एकमेकांची काळजी घेत आयुष्याचा गाडा ओढत आहेत. हे सांगताना त्या आजीच्या चेहऱ्यावर दुःखाची एक रेष सुद्धा नव्हती. जणू काही हे आश्रमच त्यांचं घर समजून ते इथे वावरत आहेत.
             त्यांच्याच बाजूला साधारण ७५ वर्षांच्या एक आजीबाई होत्या. बहुधा २-३ वर्षांपूर्वी त्या इथे आल्या आहेत. त्यांच्या घरी  एक मुलगा, एक मुलगी आणि ६ नातवंडे असा परिवार आहे. मुलगी गिरगावला,ब्राह्मण समाज हॉस्पिटल मध्ये नर्स आहे, आणि मुलगा चांगल्या कंपनी मध्ये नोकरीला आहे, आणि आई वृद्धाश्रमात मुलं आणि नातवांची वाट बघत असते. आजीने मला मुलाचा नंबर दिला आणि फोन लावायला सांगितला, पण शेवटी ही आई मुलाचा आवाज ऐकण्यापासून वंचितच राहिली. हेच त्या मातेचे दुर्दैव!!!!!!
             
तिथून पहिल्या मजल्यावर गेलो, तिथे बाहेरच १ आजी बसल्या होत्या. मुळच्या त्या बंगाली, त्या काय बोलत होत्या काही कळत नव्हतं. त्यांनी मला बोलावलं, आणि मिठी मारून रडू लागल्या,मला काहीच सुचत नव्हते, मी पुरता घाबरलो होतो.नंतर गायत्री तिथे आली आणि त्यांच्याशी बंगालीत संवाद करत होती,तेव्हा मला कळलं,कि तिचा नातू माझ्यासाखा आहे,आणि ती मला घरी घेऊन जाण्यासाठी विनवण्या करत होती. 
             
असे एकाहून एक अनुभव येत गेले. खरतर आम्ही त्यांचे अश्रू पुसायला तिथवर गेलो होतो पण आमच्याच डोळ्यात अश्रू आले, आणि रडता रडता आमच्या चेहेर्यावर हसू आणायचं काम पण याच वृद्धांनी केलं. त्याचं बालपण जणू आमच्यासोबत बागडत होतं.

एक गृहस्त होते, वय वर्ष ८५.पण त्यांची सेकंड इंनिंग अगदी फोर्मात होती. त्या आजोबांची एक खासियत होती ती तेथील काही जणांनी आम्हाला सांगितली, कि ते गाणं तर ऐकवतात आणि तेहीम्युज़िक सहित.. 
               ए मेरे दिल कही और चल,
  गम कि दुनिया से दिल भर गया...
धुंड ले अब कोई घर नया,
                ए मेरे दिल कही और चल........
               
 ते गाणं अजूनही माझ्या ओठावर रेंगाळतय..........

साभार - लेखक : प्रथमेश राउत 









 

Make a Free Website with Yola.