Understanding Love story...एक पुस्तक असही ज्याची सुरुवात प्रेमाने होते अणि शेवट ही प्रेमाने...

Understanding Lovestory... 




एक पुस्तक असही ज्याची सुरुवात प्रेमाने होते अणि शेवट ही प्रेमाने...त्यातले प्रतेक पान जणू त्या दोघांचा प्रेमाचा प्रतेक शकन असावा...एकदा त्या दोघानी ते पुस्तक वाचायाच अस ठरवल...
फरक फ़क्त एवढाच होता की तिने ते Start to end वाचायाच ठरवल अणि त्याने end to start...त्यामुले आता दोघांकड़े दोन वेगवेगले विचार होते, भेटल्या नंतर त्यांचे विषय ही वेगले होते..हाँ पण त्या दोघात प्रेम होत,आपुलकी होती,एक मेका विषयीचे विचार होते तसेच विश्वास ही होता...
पण फ़क्त एक या पुस्तक वाचण्याचा वेग वेगळ्या पद्धतीमुळे  ते जवळ असुनही खुप लांब होते...सगळ काही  जवळ असूनही त्या दोघंकडे काही नव्हते...in short की त्या दोघांत  खुप मोठ अन्तर होते...कधी ही न संपणारे !!

Hmmmm त्यात एक दिवस ते पान ही आल जेंव्हा ती ही start to ते पान अणि तोहि end to ते पान...वाचू लागले...

त्या नंतर...ते भेटले...
एकमेकाना ते सांगू लागले त्या पुस्तकात काय आहे त्या बदल...अणि काय झाल माहित आहे...
ते परत जवळ  आले...एकमेकाना पहिल्यापेक्षा जास्त समजू लागले अणि अर्थात प्रेमही करू लागले...

का माहित आहे कारण...त्यांचे विचार जरी वेगवेगळे होते, जरी शरीर वेगवेगळे होते...अणि असा बराच फरक असून पण त्या दोघंच एकमेकावर खुप प्रेम होत...एकमेकावर विश्वास ही होता...अणि बरच काही......

विशेष म्हणजे ते पुस्तक ही एकच होत...अणि त्यांची मनही एक होती... !!!

Why you serious now...हैप्पी एंडिंग Dear...Smile now... :-)


मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लोमम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं नादुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस होआज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, 'करेन करेनम्हणत होतेजमलच नाहीतसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणूनतसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मगहवं तेवढं बोलूफुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरंतू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय तशीच आहेपाच फुट दोन इंचरंग गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवातुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होतीकसे आहेत जावयबापू मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीतअसेल कदाचितत्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय काय झालं ?
मुलगी - कसं सांगू लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवाअस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... ॅसिडीटी झालीय.
मम्मी - ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला  प्रोब्लेम ?
मुलगी - अगंहा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अगकाय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहेसांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे  माझामी तरी काय करू मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अगमी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्यालाजा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडेपण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही रोज रोज ती करीबिरयाणी कशाला खायची ?असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अगअसं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस तुझं मराठी एकदम विक झालय बघबाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञानएक काम कररोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगंमाझ्या बायेथंड दुध देत जात्याने ॅसिडीटी कमी होईलअजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवाहे आता काय नवीन ?
मुलगी - हो नापरवा कैर्या घेऊन आलाकाल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणेलोणचं कर म्हणतो मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडेकैर्याआवळे माझ्याकडे पाठवमी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतातलोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली विसरलीस की काय तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाहीमी माधूरी.... अय्याराँग नंबर लागला वाटतंसॉरी हें... मधुराच्या मम्मी...


त्या दिवशी एक गजरा विकणारी छोटीशी सुन्दरशी गोड गोजिरी मुलगी
ति फ़ुलराणी
माझ्याजवळ आली आणि म्हणाली
दादा गजरा घेता का? पाच रुपायाला आहे चारला देइन.
मी : कुणासाठी घेऊ?
ति : बायकोसाठी घ्या.
मि : मला बायकोच नाहिये.
ति : मग लवर, गर्लफ़्रेन्ड आसलना,तिच्यासाठी घ्या ना?
मी : अग, पण मला ती पण नाहिये.
(ति हिरमुसली)
मी : आण, दे एक गजरा मला.
ति : (थोड आश्चर्याने) आता हा कुणासाठी?
मी : तुझ्यासाठी . .
अस म्हणताच . .
ति निरागस फ़ुलराणी खळाळुन हसु लागली आणि मी ही . .

चिखलफेक

चिखलफेक

हसून हसून तिची पुरेवाट झाली होती. चिखलात पडलेल्या अरविंदाची अवस्था पाहून ते स्वाभाविकही होते. खरी गम्मत त्या दोघांना पाहणाऱ्यांची झाली होती. लोकांना दिसत होते दोन काळया कुट्ट चिखलाने माखलेल्या आकृत्या. निशाचे हसणे अजुनही थांबलेले नव्हते. खरे तर ती काय कमी माखलेली नव्हती. 

कॉलेजच्या पहिल्या तासापासून अरविंद निशाला पाहून पहिल्या बघण्यातच खल्लास झाला होता. मग कोणतीही निशाशी बोलण्याची संधी त्याने सोडली नाही. निशा आता त्यांच्या गटातली झाली होती. केमेस्ट्री प्रॅक्टीकल्स, छोटे मोटे ट्रेक्स, कधी कधी एखादे सुट्सुटीत हॉटेल अशे त्यांच्या गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम मजेत पार पडत होते. निशा सगळ्यांशीच छान वागत असे. पण अरविंदच्या मनातले विषेश तिला काय ठाऊक नव्हते. 

अनिकेतला जेव्हा सांगितले तेव्हा तो उडालाच. म्हणाला अरविंद "काय सांगतोस काय? खरंच की काय?" 
"नाही मी चित्रपट काढायला घेतलाय आणि तुला नवा प्लाट ऐकवत होतो", अरविंद चिडून म्हणाला. 
"अरे रागावतोस काय! चेष्टा केली रे मी", अनिकेत बोलू लागला, "तुला काय वाटले, मांजर डोळे बंद करून दूध प्यायली म्हणजे कुणाला कळत नाही, अरे तुझे तोंड ती दिसली की जे उघडते आ वासून ते ती दृष्टीआड होईतो बंदच होत नाही माहित आहे". 

"ए ते तोंड वगैरे अतिरंजित वर्णन आहे बर", आता अरविंद मारायच्या पावित्र्यात अनिकेत कडे सरसावत होता, आणि तो अनिकेतला एक गुद्दा घालणार तेव्हड्यात अनिकेत निसटला आणि पळता पळता म्हणतो काय 
"एक जरी गुद्दा बसला ना विंद्या तर कालेजच्या कॅन्टीन मध्ये जाऊन डरकाळी फोडेन की ऐका हो ऐका, अरविंद शेट यांना प्रेमरोग जडला असून...", अनिकेत पुढे काही म्हणणार इतक्यात त्याला अरविंदाचे आर्जवी डोळ्यांनी, अगतिक चेहऱ्याने आणि दोन्ही हातांनी नमस्कार मुद्रा करून त्याच्या कडे बघणे दिसले आणि त्याचे शब्द मधेच अडकले. 
"अरे अरे, काय यार आता काय रडणार आहेस की काय?", प्रेमात पडल्यावर माणूस हळवा होत हे ऐकले होते पण पाहवत नाही रे गड्या. 
"मग काय, इथे माझे प्राण जायची वेळ आलीय, तिला कसे सांगावे काय कळत नाहीये आणि तुला चेष्टा सुचतेय", अरविंद एव्हडूसं तोंड करून म्हणाला. 
"ए, तुला राजेश ठाऊक आहे", अनिकेत ला काहितरी नविन आठवल्यासारखे अरविंदाकडे बघून त्याने विचारले. 
"तो, प्रणिताला गटवणारा, तो उंचसा राजेश", अरविंदाला आठवणे फार कठिण नव्हते, कारण प्रणिता कॉलेजची तारका होती. 
"हो रे तोच, माझ्याशी बोललाय एक दोनदा. प्रेमाच्या बाबतीत बाप माणूस आहे बेटा. अरे व.पु.काळेंच्या पुस्तकातले उतारे घडाघडा म्हणतो रे बोलता बोलता. एकदा त्याला विचारू की सल्ला काय करता येईल ते. बघ आज संध्याकाळीच भेटू तू म्हणशील तर", या एका वाक्यात अनिकेतने मिटींग मनातच निश्चित देखील करून टाकली होती आणि अरविंद मानेने हो देऊन मोकळा पण झाला कारण त्याच्या हृदयाची जखम खोल होत चालली होती. 
कॉलेजमध्ये प्रवेश करतांना आज अरविंदाची स्वारी जाम खुश्शीत होती. आज राजेश ला भेटायचे होते ना संध्याकाळी. नेहमीप्रमाणे अरविंद, निशा, अनिकेत, पायल, सुधा सगळे स्कुटर स्टॅन्ड वर भेटून एकत्र कॉलेजात प्रवेश करत होते. थट्टा मस्करी नेहेमी प्रमाणे चाललेली होतीच. पण अनिकेतच्या डोळ्यात मिश्किल भाव होते. तो सारखा सारखा अरविंदा कडे पाहून हसत होता. अरविंदला सगळे कळत होते, तो डोळ्यानेच जमेल तेव्हढे त्यांना मोठ्ठे करून त्याला दटावत होता, आणि तेव्हढ्तात कोणत्यातरी दगडाने तोल जाऊन एकदम निशा समोरच्या चिखलात ढाडकन पडली. 

दोन मिनिटे काय झालेय हे कळायलाच लागले सगळ्यांना. आजुबाजुला हशा पिकलेला पाहून काय झालेय याची आता थोडी थोडी कल्पना गटाला यायला लागली. निशाला हात देऊन उठवण्याच्या नादात खरी गम्मत झाली ते अरविंद ची. निशा हात धर म्हणता म्हणता साहेब तिच्याहून अधिक सपाट्याने चिखलात लोळण घेते झाले आणि प्रक्षकांना आता फुकटात डबल मजा देते झाले. 

चिखलात माखून रडवेली झालेली निशा सुद्धा अरविंदचा तो मदत प्रकल्प पाहून खो खो हसू लागली. गट आणि तमाम प्रेक्षकवर्ग आता दोन चिखलात माखलेले गोळे एकमेकांकडे पाहून कसे घमासान हसतात, हे पाहत होते. 

"काय वेंधळा आहेस रे विंद्या", निशा हसता हसताच म्हणत होती, "कसली मदत रे तुझी?", आता ती चिखलात रूळली होती. 
"मदत नाही निशा", अरविंद अचानक शांत झाला, "तू अचानक पडलीस आणि सगळे तुझ्याकडे पाहून हसू लागले, मला नाही आवडलं, नाही आवडलं मला. मग मी काय करणार तुला हात देऊन उभे केले तरीही चिखलात माखलेलं सत्य काय मला बदलता येणार नव्हतं. मग माझ्याजवळ एकच उपाय होता." 
आता निशाच्या अवाक होण्याची पाळी होती, "म्हणजे तू, तू, चिखलात..", आता निशाचा चेहरा आ वासून अरविंदाकडे बघत होता. 
"निशा, मला तू खूप आवडतेस, आयुष्याचा प्रवास एकत्र माझ्याबरोबर आखायला तुला आवडेल?", अरविंद बोलून गेला आणि नंतर त्याला कळले की आपण बोलून गेलो आहे, आणि आता त्याची परिक्षेचा निकाल लागण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यासारखी स्तिती झाली. 

निशाने एकदा चिखलाकडे पाहिले, पुन्हा अरविन्दाकडे पाहून ती "तू, मुद्दाम..." असे काहीतरी पुटपुटली, आणि एकदम चिखलाचा एक गोळा उचलून तिने तो अरविंदाकडे फेकला. आणि हसत हसत ती कॉलेज कडे धावली. मधेच थांबून तिने मागे पाहिले आणि अरविंदाला लाहान मुलीसारखी जीभ दाखवून ती पुन्हा हसत हसत कॉलेज च्या नळाकडे धावत गेली. 

अरविंदाला तो चिखलाचा गोळा हृदयावर लागला. तो तसाच एका हाताने धरून तो अनिकेत कडे पाहत होता. अनिकेत ने हुश्श केले आणि नळाकडे बोट दाखवून म्हणाला "चला, चिखल साजरा करूया" 

तुषार जोशी, नागपूर 


एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.

भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.
त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.

( तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे ...

तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?

ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन .

तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ?

ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तूला जायाला सांगीतले नसते

तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस

ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते

तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?


ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते

तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही

ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज वेळ कसा वाया गेला?

तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून )

ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे

ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल

( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...

ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?

तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे .

(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

--

आधी विचार करा, मग कृती करा.



For More Marathi Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Lekh scraps, Stories, Greetings, Sahitya etc
Please Visit: http://mannmajhe.blogspot.com/

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

With Lots Of Love
Sachin Haldankar.



प्रेमपत्र – व्हेलेंटाइन  डे स्पेशल

तसं ह्याला काय नाव द्याव ते सुचत नव्हत .....ही २ जणांची पत्र आहेत . . दुसर  पत्र उत्तर म्हणुन लिहलय. 

काय आहे ते वाचुनच बघा आवडतं...की नाही ते :)


-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

१.

Hi Dear!!!!!!

कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना? आणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविन? मुंबईला कधी येते आहेस? कळव मग फोन करुन.

Actually, सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि 'विनाकारण' लिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.

आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं? तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तु? खांदे उडवुन चार-चारदा मला Thanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतो, तेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"

किती मजा केली ना आपण कॉलेज मध्ये? कॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी 'जान' आणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला 'अरे ये!' म्हणुन बोलावलसही, पण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही 'जे काहि' करतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?

आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळी? पण तू उगाच मधे पडलीस, नाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतात? मैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.

अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं - 

आई:काय करते रे ती सध्या?
मी:M.B.A.
आई:आहे कुठे मग सध्या ती?
मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीची? काहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेस? तिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?
आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच 'अपघाती वळण' अशी पाटी दिसली, आणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालं? काहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहे, काय घाई आहे? बघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(पण त्या भाजीच्या देठा बरोबरच, तीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस का? अश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची ना? फार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?
आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(मला कळ्लं, आई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मी: आ‍ऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?
आई: आई काय आई? मुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेत, शिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)
मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असं? तु कितीवेळा भेटली आहेस तिला? ८वेऽऽळा १० वेळा? आणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये ती? त्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(पण ऐकेल ती आई कसली?)
आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनु? कसा करायचा? तुला अजुन काय काय आवडंत? सगळं विचारत होती!! बाकीच्या तिघी, बाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(तिला सांगुन काहिच फायदा नव्हता, चटकन चहा संपवला आणि उठलो, तर म्हणाली - )
आई:अरे, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?
मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येय, पुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकन t-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.

तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलो, तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच 'कोचे' आले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रे? काय झालयं? दुपारपासुन असेच आवाज येत आहेत, आणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतो, नाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.

कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असो, पुढले ७-८ दिवस तरी जेवताना 'नाहि' म्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.

बर, तर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या 'गधा-मझदुरी' करतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!

असो, तु इथे कधी येते आहेस? पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझा, तेव्हा जमणार आहे का? आणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोस, आणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.


तुझा,
बुद्धुराम उर्फ जोकर.



ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!



-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------



Hiiiiiiii!!!!!!

खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेय, त्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.

माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्ये? ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणार? काय करणार? आता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागली, मी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांना? तरी एकमेकांच्या contact मध्ये असतो आपण.

कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होते, ती पारीजाताची नाजुक फुल आणि...........'तू'. होय, तु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं, तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडली, अजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडली, खरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.

त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील, जमेल तसा नाचशील, किमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलास, तुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.

आणि हो! माझी छेड काढणार्‍याला तु मारत होतास, मारत कसला 'तुडवत' होतास. तेव्हा मी मध्ये पडले, मुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तर? म्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले, पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं 'काहितरी' आहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतास, मी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.

अरे हो, कॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होता, आठवतयं तुला? तुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला 'एका चाकावर' तयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलं, तुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं का? पाय टेकवत नाहिये का? चल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्‍या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होते, कारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर 'तू' त्यावेळी 'माझ्यासाठी' तिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेच, पण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी 'बाबांना काहि झालं असतं तर?' या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलास, कारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होता, दोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावस, आणि त्या कोसळणार्‍या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहि, माझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि.

तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा 'तळणीचे मोदक' करुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.

तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते 'तुला' बघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. का? ते तुला कदाचित समजणार नाहि.

६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतं, काय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.

आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.

हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!



'फक्त तुझीच'
रडुबाई.



ता.क. - मी नेहमी म्हणते तसा तु खरचं बुध्दुराम आहेस. वर लिहायला विसरले होते!!!

ती - किती उशीर?

तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर. 

ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.

तो - बरं.

ती - फक्त बरं?

तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो. 

ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू? 

तो - म्हणजे कसा?

ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.

तो - डोकं फिरलंय त्याचं?

ती - त्याचं की तुझं?

तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?

ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं? 

तो - नाही.

ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.

तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.

ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही. 

तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये. 

ती - अरे देवा

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.

ती - बरं

तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय? 

ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.

तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.

ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार. 

तो - आता? 

ती - हं आता. 

तो - बरं जातो.

ती - ए काऊ थांब रे. 

तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.

ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.

तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.

ती - काऊ तू मला खूप आवडतोस.

तो - मला माहितेय.

ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.

तो - बरं. 

ती - अरे आता म्हण.

तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.

ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.

तो - बरं.

ती - ...

तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे. 

ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.

तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.

ती - चल.


तो - पार्टी कधी?

ती - कसली?

तो - कसली काय? प्रमोशन कुणाला मिळालं? मला की तुला? 

ती - मला.

तो - मग पार्टी कुणी द्यायची? मी की तू?

ती - तू.

तो - कसली कंजूस आहेस तू. अगं तोंडावर तरी हो म्हण. माझ्या ऍड ऑन कार्डावरून पैसे भर हवंतर. म्हणजे मलाही समाधान आणि तुलाही.

ती - म्हणजे मी मारल्यासारखं करते तू लागल्यासारखं कर.

तो - चालेल.

ती - अरे? चिडतोस काय? देईन मी पार्टी. 

तो - नको.

ती - चिडका बिब्बा.

तो - मी? तूच चिडकी बिब्बी. उगाच नाही हिंदीत बायकोला बिब्बी म्हणत. 

ती - प्रॉब्लेम काय आहे? तोंड का वाकडं तुझं? खूश व्हायला पाहिजेस तू. 

तो - कुठे काय? सगळं छान तर आहे. मला चांगली नोकरी. तुला चांगली नोकरी. मला प्रमोशन तुला प्रमोशन. मला गाडी, तुला गाडी. मला..

ती - हे रे काय? तुझं माझं, तुझं माझं. आपलं म्हण.

तो - बरं आपलं. 

ती - मग छानच तर आहे सगळं. तू असा का झालायस? स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरणाऱ्या भूभू सारखा?

तो - हं. झालोय खरा.

ती - पण का?

तो - लग्नानंतर माणसाचं असंच होतं.

ती - बरं. मग नव्हतं करायचंस लग्न? का केलंस?

तो - शादी के लाडू. खाये तो पचताये न खाये तो पचताये. म्हटलं, पचतवायचंच आहे तर खाऊन पचतवा.

ती - तुझं लाडकं वाक्य आठवलं.

तो - कोणतं?

ती - खाऊन माजा पण टाकून माजू नका.

तो - इथे थोडं उलटं आहे. शादी चे लाडू खाणारा कधीच माजत नाही. ज्याच्या नावाने लाडू खातो ते माजतात.

ती - म्हणजे मी?

तो - मी तसं म्हटलेलं नाहीये.

ती - न म्हणता, दुसऱ्याला जे ऐकायला आवडत नाही ते म्हणण्याची कला तूच जाणे. तुला काय वाटलं? मला पचतवायला होत नाही?

तो - तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाही.

ती - अरे मी म्हणून तुला सहन करते. दुसरी कुणी असती ना, मग कळलं असतं तुला.

तो - काय कळलं असतं ते कळलं असतं. पण आता काय उपयोग? हे सगळं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं असं आहे. आता कसं काय कळणार? कितीही कळावं असं वाटलं तरी.

ती - ओ काका विथ मिशा. तुमचं स्वप्नरंजन बंद करा. आणि तुमचा असा स्वतःची शेपटी पकडणारा कुत्रा का झालाय ते सांगा?

तो - कुत्रा? आता खरा शब्द बाहेर निघाला. सुरवातीला भूभू म्हणाली होतीस. आता एकदम कुत्रा झालो काय मी?

ती - हे बघ हा वाक्प्रचार आहे. 

तो - आता बघा कशी मराठी तांडवनृत्य करायला लागलेय जिभेवर? एरवी एक वाक्य सरळ बोलता येत नाही. मला शिव्या द्यायला मात्र मराठी.

ती - असं काही नाहीये?

तो - मग कसं आहे?

ती - तुला मी कुठल्याही भाषेत शिव्या देऊ शकते.

तो - इथेच प्रूव्ह झालं की तू मला शिव्या देतेस.

ती - त्यात प्रूव्ह करण्यासारखं काय आहे? मी खुलेआम हे मान्य करते.

तो - पण का?

ती - का म्हणजे? तू जर शिव्या देण्यासारखं वागलास तर मी शिव्या देईन नाहीतर काय ओव्या म्हणीन? तुझ्या सन्मानार्थ.

तो - हे अती होतंय.

ती - बरं होवूदे. अर्धा तास झाला मी तुला विचारतेय प्रॉब्लेम काय आहे? असं तोंड वाकडं करून बसायला काय झालं तर तू उत्तर देत नाहीयेस. कोण करतंय अती? मी की तू?

तो - मी.

ती - हं. मग काय झालं तरी काय? 

तो - कुठं काय?

ती - तोंड.

तो - ओह ते. दात दुखतोय.

ती - अरे माणसा, मग हे पहिल्या वाक्याला सांगितलं असतंस तर इतकं भांडण कशाला झालं असतं.

तो - भांडण? कसलं भांडण?

ती - अत्ता आपण केलं ते?

तो - नाही दात जास्तच दुखत होता. लक्ष उडवायचं होतं त्याच्यावरून म्हणून. असं म्हणतात की कसला त्रास होत असेल, आणि त्यापेक्षा अधिक त्रासदायक काही घडलं की पहिल्या त्रासाचा विसर पडतो. म्हणून. 

ती - टू मच.

तो - थ्री मच.

ती - बस बोंबलत आता दात घेऊन. पार्टी बिर्टी काही नाही.

तो - अगं गंमत केली.

ती - मीही गंमतच करणारे आता. ज्या दिवशी तो दात उपटून घेशील ना,त्याच दिवशी माझी पार्टी.

तो - अगं पण.

ती - ...

तो - बरं. 






तो - झाल्या का पोळ्या? खूप भूक लागलेय.
ती - झाल्या ना. मलाही भूक लागलेय पण पोळ्या करायला वेळ लागतो.
तो - म्हणूनच सांगत होतो, लवकर स्वैपाकाला लाग.
ती - आणि तू काय करशील? सोफ्यावर बसून टी. व्ही. बघशील?
तो - तसं नाही गं. जरा जास्तच भूक लागली होती म्हणून जरा. ते जाऊदे. कसली भाजी आहे.
ती - नाही
तो - ही कोणती नवी भाजी? नाही?
ती - म्हणजे भाजी नाही.
तो - भाजी नाही? मग काय नुसत्याच पोळ्या खायच्या काय आज?
ती - हे बघ मला स्वैपाक करायला वेळ लागतो. सवय नाही. आणि तुला भात, भाजी, आमटी, पोळी सगळं लागतं. आज भाजी चिरायला वेळच मिळाला नाही.
तो - मला सांगायचं
ती - सांगितलं. पण कॉम्प्युटर समोर बसलास की तुझ्या कानाची होते फुंकणी. नळी फुंकिली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे.
तो - मी फुंकणी आणि तू सोनार? जरा जोरात फुंकायचं ना. ऐकू आलं असतं.
ती - जेवायचंय ना? की फुंकर मारू अजून एक? माझ्या ऑफिसमधल्या लोकांना मी केलेल्या पोळ्या खूप आवडतात. तुला नसतीलच खायच्या तर ते खातील.
तो - नको. एवढं अन्नदान नको.
ती - कंजूस.
तो - मुद्दा तो नाही आहे. तू आज पोळ्या केल्यास म्हणून तुझे जाहीर आभार. पण आता त्या पोळ्या पाण्याबरोबर खायच्या का?
ती - नाही.
तो - हवेबरोबर?
ती - शिकरण केलंय. ते वाढून घे आणि गीळ किती गिळायच्यात त्या पोळ्या.
तो - शिकरण केलंय? अरेरेरे, काय ही भाषा. शिकरण स्त्रीलिंगी. ती शिकरण, ते शिकरण नाही.
ती - ई…. ती शिकरण काय. ते शिकरणच बरोबर आहे. ते केळं आणि त्याचं ते शिकरण.
तो - फालतू लॉजिक सांगू नकोस हं. तुला गाणं आठवतं का ते? केळ्याची शिकरण करायला गेली धुपकन पडली आत?
ती - आठवतं.
तो - मग मान्य कर की चूक झाली.
ती - चूक तुझी होतेय. मला आठवतंय, केळ्याचे शिकरण करायला गेली धुपकन पडली आत. चुकलायस तू मी नाही.
तो - हे बघ तू मला बाकी कशाचंही लेक्चर दे, पण मराठीचं देऊ नकोस.
ती - का बरं का? मी तुला कसलंही काही सांगायला लागले की तुझं हेच. हा विषय सोडून दुसरं कशाचंही लेक्चर दे. असे काय दिवे लावलेस रे तू मराठीत? पु. ल. देशपांडेच की नाही तू? की आचार्य अत्रे?
तो - अगदी तितका नसलो तरी थोडं फार लिहितोच की मी
ती - कुठे? ब्लॉगवर? काळं कुत्रंतरी वाचता का रे तुझा तो ब्लॉग? अरे ब्लॉग लिहिण्यापेक्षा जरा घरातली कामं कर, म्हणजे शिकरण खायची वेळ येणार नाही. मी एकटीने काय काय म्हणून करायचं.
तो - मुद्दा मी कुठे काय लिहितो हा नाहीये. मुद्दा हा आहे की माझं मराठी तुझ्यापेक्षा चांगलं आहे.
ती - हे आपलं तुझं मत. तुझ्या मताला मी किंमत देत नाही.
तो - ते माहितेय मला. आजचं का आहे ते. पण हे माझं मत नाही. दहावीत मला मराठीत ऐंशी मार्क मिळाले होते.
ती - मला एटीटू मिळाले होते.
तो - अगंपण माझी फर्स्ट लँग्वेज होती मराठी.
ती - लँग्वेज होती ना? मग तर झालं. मार्क कुणाला जास्त होते? मला. मग मराठी कुणाला जास्त येतं? मला? मग ती शिकरण का ते शिकरण? ते.
तो - च्यायला. तुला शिकवणारे धन्य आणि तुला मार्क देणारे त्याहून धन्य.
ती - ए. जास्त बोलू नकोस हां. माझी आईच शिकवायची मला. आणि तिला तिच्या आईने शिकवलं.
तो - तरीच.
ती - लाज नाही वाटत माझ्या माहेरच्यांना नावं ठेवायला?
तो - नावं ठेवायची नाहीत म्हणूनच तर लग्नात तुझं नाव नाही बदललं.
ती - फार उपकार केलेस हं. बदललं असतंस तर बदडलं नसतं तुला?
तो - पुन्हा विषयांतर करू नकोस. मुद्दा वेगळाच आहे.
ती - ते शिकरण
तो - ती शिकरण
ती - मी जेवतेय तुला हवंय?
तो - हो.
ती - पोळीबरोबर ते….. शिकरण देऊ का?
तो - मला ती शिकरण दे तू ते शिकरण खा.
ती - आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास.
तो - थांब पोळ्या थंड झाल्यात मायक्रोव्हेव करून आणतो.
ती - शहाणा माझा बाळ.
तो - हं 


प्रिय

खरं तर मला हा अधिकार आहे का नाही, हे ठरायचे आहे. तरी मी तुला प्रिय म्हणतो. कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल, किंवा मिळणारही नाही. म्हणूनच प्रिय......

मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही. कदाचित इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल, किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हिच योग्य वेळ असेल म्हणून. म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितोय.

गेल्या चार वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो, आणि एसएमएस, नेट चॅटींगही करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.

पण आज अचानक तू, नाही मी, नाहीच मुळी, पावसाने तुझी आठवण करून दिली. मी खिडकी बाहेर डोकं काढलं, मला एक जोडपं जाताना दिसलं, आणि मला असा भास झाला, की, ते दोघे आपणच आहोत. आपलंच प्रेम या पावसाच्या टपोऱ्या थेंबांमध्ये एकमेकात गुंतत, एकमेकांना आधार देत, आणि एकमेकांच्या भावनांमध्ये चिंब भिजत जातेय. मला तुझी इतकी आठवण आली की चक्क, ते पावसाचे थेंब माझ्या पापण्यांना ओलावून गेले.

मन जड झालं, आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली, वाटलं, आता सारी बंधनं तोडावीत, चटकन फोन उचलून तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं...... मला तू खूप आवडतेस.... इतक्याच वीज कडाडली. शुद्ध आली. वाटलं हे सारं मी केल्यावर जर तू नाही म्हटलंस तर....? तर मी ते एक्सेप्ट करू शकेल?

तुला माझ्या बद्दल काय वाटेल? तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी मैत्री केलीस? यासाठी तू माझी इतकी काळजी घ्यायचास?
या प्रश्नांनी माझे दोन दिवस वाया गेले. आणि मग ठरवलं, काही झालं तरी तुला जे खरं आहे, ते सारे सांगायचे. अगदी सारे काही.......

एसएमएस पाठवण्याचे धाडस मी केले नाही, कारण त्यातून समज कमी परंतु गैरसमज जास्त होतात. आपण दोघांनीही ते अनुभवले आहे. नेटवरची चॅटींगही महाग आहे. बाबांना हिशोब द्यावा लागतो त्यात सारखे इंटरनेटवर पैसे खर्च केल्याचे दिसले तर बाबही रागावतात. मग सर्वात चांगले साधन म्हणजे पत्र. आणि म्हणूनच आज मी तुला या पत्रातून विचारतो आहे.

माझ्याशी लग्न करशील? नाही आता लगेच नाही. मी आता शिकतोय नं? मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात. तुला हे सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे. हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज.. प्लीज मला तू सांग. हवं तर शिव्या दे, माझ्यावर रागव, पण अबोला धरू नकोस..

तुझा नकार एकवेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू शकेन गं, पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार........
तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.............

तुझाच,
कखग
प्लीज एक्सेप्ट मी....

प्रिय

कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. कारण शेवट कदाचित मला माहीत आहे. आपली फारशी ओळखही नाही अजून. परंतु, तू मला आवडतोस. धक्का बसला ना?यापेक्षा जास्त धक्का मला स्वतः: ला बसला होता, जेव्हा मला हे जाणवलं, की तू मला आवडायला लागलास.

हे कसं झालं, त्याचा शोध मी स्वतः:च घेत आहे. बॉटनीच्या त्या पेपरमध्ये तू केलेली मदत... त्यानंतर वारंवार आपलं भेटणं.. याचा कधी असा परिणाम होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं...

हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण
आता त्याच स्वप्नात तू मला रात्रभर छळतोस.. परवा तर आई म्हणत होती, का गं आज काल जरा जास्त अभ्यास करतेस का? मी म्हटलं का? ती म्हणे आज काल रात्री झोपेत बडबडतेस ती? मला एकदम धस्स झालं. काय बडबडत असेन मी? बापरे तुझं नाव घेत असेल का? आईने ऐकले तर बोंबलंच सारं!

मला तुझ्या बद्दल हे जे काही वाटतं, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला एकवेळ वाटलं, ज्या प्रमाणे मला अमीर खानही आवडतो, तसंच काही हे असेल.. पण नाही मी अमीर खानचा फोटो न पाहता आठवडा काढू शकते, पण मग तू, तू जर कॉलेजमध्ये दिसला नाहीस तर मग मला काय होतं, लेक्चरमध्ये तर लक्षच लागत नाही प्रॅक्टिकलमध्येही  गडबड होते. परवा सरांच्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या मी, या कारणांवरून. मी काय करतेय तेच मला कळत नव्हतं. मग मी विचार केला, आणि मला जाणवलं, तू नाही आलास ना आज? म्हणून कदाचित असं होत असेल.

आज तिसरा दिवस आहे, तू भेटला नाहीस.. म्हणून मी चक्क तुला हे पत्र लिहितेय.. (प्लीज अक्षरांना पाहून हसू नकोस) आणि मराठीच्या चुका तर मुळीच काढू नकोस. माझं हे अक्षर असंच आहे, आणि मराठीही.

पण मला असं का होतेय? लक्ष लागत नाही, झोप येत नाही, तुझी नुसती आठवण जरी आली, तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण तू भेटतोसच कुठे आज- काल? आणि कॉलेजला आल्यावरही चटकन निघून जातोस हल्ली. ए काय झालंय तुला? प्लीज कदाचित माझ्याशी हे सारं शेअर केल्यावर तुला बरं वाटेल?

प्लीज माझं प्रेम एक्सेप्ट कर.....
तुझीच
कखग

अधुरी प्रेम कहाणी

पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता.  आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो.  रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो.  समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो, तर भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या, विजयश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा. 
पावसात भिजत, समुद्राच्या हळुवार लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वर्णावे. पण आज मला कशातच आनंद वाटत नव्हता. त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटेपण मला जास्तच बोचत होते.  ज्या हातात कुणाचा हात नाही, त्या हाताचा उपयोग तरी काय? आपली कुणीतरी असावी, जवळची. मनातले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत, आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे, आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. तिच्या डोळ्यात बघत..सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे विचार मनात गर्दी करून होते.  माझी तंद्री भग्न पावली ति कोणाच्या तरी आवाजानेच. कोणीतरी मला हाक मारत होते. मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली.
नेहा, माझ्या वर्गातली एक गोड चेहऱ्याची, गोड आवाजाची, मुलगी. .कोणालाही आवडावी अशीच. माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिचे वर्गातीलच विनीत या मुलाशी जमले.  खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला. विनीत दिसायला नीट-निटका, श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या, सिनेमे, पार्ट्या यामध्येच रमणारा, त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. कॉलेजमध्ये अधून-मधून घडणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे. माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती, पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो. नेहा अजूनही पळत येत होती. वाऱ्याने तिचे लांबसडक केस पार विस्कटून टाकले होते. कपाळावर टिकली, एका हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या असणाऱ्या बांगड्या, आणि पांढरा शुभ्र पंजाबी. समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते.
"ओळखलंस मला?", नेहा
"व्वा, तुम्हाला कोण नाही ओळखत, खरंतरं माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले", मी
"ए s s s तुम्ही वगैरे काय?", नेहा
"मग काय, मोठी लोकं तुम्ही", मी स्तुतिसुमन उधळायची काय थांबत नव्हतो. खरं तर ती माझ्याशी बोलतीय यावरच माझा विश्वास बसत नव्हता.
"पुरे पुरे.. तूच ठीक आहे.. बरं, तू एकडे कसा?" नेहा
"आलो असाच फिरत फिरत, मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला खूप आवडते." मी
"हो sss  मला पण.. मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना?", नेहा
त्यानंतर जवळ-जवळ एक तास भर आम्ही मस्त मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी खूप वर्षापासून ओळख असल्यासारखी.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला जरा खुशीतच गेलो. नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इंप्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता. पण आज नेहा वर्गात आलीच नाही, त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. बाहेर पडलो. कॅटीनबाहेर नेहाची गाडी दिसली, म्हणून आत डोकावून पाहिले. नेहा-विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. शेवटी वैतागून ती बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झाली होती. मी बाहेरच उभा होतो. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.
मी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली.  माझा अंदाज खरा ठरला. दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली.  मला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, "विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेले त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये."
एवढे बोलून ति निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.
त्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही. रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो मला भेटून तिला त्याच्यासाठी मनवायला सांगायचा. एव्हाना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो.  नेहा मला म्हणाली सुद्धा, तू वकील का नाही होत, चांगले बोलता येते तुला.
कित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होती. विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहा बरोबर थांबायला सांगायचा. मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो. तिचे सरदारजीचे विनोद, कधीतरी एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो.  पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याला या ना त्या कारणाने टाळू लागली. त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि आमच्यातले अंतर कमी कमी होत गेले.
एके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून टाळले. इकडे, मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी जत्रेला जाणार होतो, तेंव्हा नेहाने चक्क माझ्याबरोबर यायला संमती दाखवली. हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसवून जत्रेला गेलो. तिकडे आम्ही खूप मजा केली.  जत्रेत रंगांची, गुलालाची खूप उधळण झाली. मग आम्ही सगळे अंगाला, कपड्यांना लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो. तिकडे मस्त पाण्यात खेळलो, मातीत किल्ले केले, खूप धमाल केली. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहजच तिला फोन केला, बोलताना सहजच विचारले, "कालचा रंग गेला का?".
तर म्हणाली, "तो रंग केंव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये.
 मी म्हणले, "म्हणजे काय?"
तर पटकन सारवासारव करून म्हणाली, "अरे म्हणजे तो कुठलातरी रंग तू लावलास ना, तो जातच नाहीये."
त्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले, ती मला काही सुचवायला तर बघत नव्हती?, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती? नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले. तिच्या मैत्रिणींचा पण माझ्याशी बोलण्याचा सुर बदलला होता. नेहा कुठे दिसली नाही, की त्या मलाच येऊन विचारायच्या, आणि मग उगाचच हसत निघून जायच्या. विनीत पण मला जाता येता टॉन्ट मारायचा, "गद्दार, बेवफा, दोस्त दोस्त ना रहा" वगैरे म्हणायचा.
दिवसांवर दिवस जात होते. माझी आता खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे.
पण एक दिवस माशी शिंकली, जे होऊ नये ते घडले. नेहा आणि विनीतला मी नारळाच्या बागेत हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले. माझ्या मनात रचलेले मनोरे, क्षणात कोसळून गेले. पुढे-पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध विनीत नेहा चे जमले. एकत्र फिरणे, सिनेमा वगैरे. आमच्या कॉलेजचे लव्ह-बर्डस…
आज बऱ्या दिवसांनी, पावसाचे परत भरून आले होते. आज परत मी एकटाच होतो. चालता-चालता सहज मागे वळून पाहिले, सगळा समुद्र-किनारा रिकामाच होता. कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा व्यर्थ होती. ओल्या मातीमध्ये पावलांच्या खुणा उमटत होत्या, आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट, आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होत्या, जणु काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता.
दूरवर MTDC मध्ये कुठल्याश्या रिमिक्स गाण्यावर तरूण-तरूणी नाचत होते, त्यातील काही ओळी कानावर पडल्या:
" जिंदगी मे कोई कभी आए ना रब्बा..
       आए तो कोई फीर जाए ना रब्बा ssss
   देने हो अगर मुझे बाद मै आसू..
      पहेले कोई हसाए  ना रब्बा  s s s..  पहेले कोई हसाए  ना  रब्बा  "

एक स्वप्नाळू मुलगी ...
नुकतीच प्रेमात पडलेली ....
त्याच्या विचारात पुरती हरून  गेलेली...."तो स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटला असं वाटून ती खूप सुखावली होती. 
तिच्या मैत्रिणीनी  तिला खूप समज दिली . हि मुलगी वेड्यासारखी अशा माणसावर प्रेम करतेय , ज्याला तिच्या प्रेमाची काहीच खबर नाही . उद्या तो नाही म्हणाला तर ती जीवच देईल  याची त्यांना खात्री होती. झालंही तसंच.
एक दिवस जनामांची पर्वा न करता ती त्याला जाऊन भेटली . तिने त्याला सांगून टाकलं कि, "माझ तुज्यावर खूप प्रेम आहे . जीवापाड प्रेम आहे. तुही माझ्यावर तेवढंच प्रेम करतोस न?"
तो मुलगा सरळ नाही म्हणाला आणि निघून गेला .
हि बिचारी मोडून पडली ...तिच्या आयुष्यात त्या क्षणी सारंच संपलं होत. पण दुसरया दिवशी ती पुन्हा कॉलेजात आली . मैत्रीणीना भेटली तेवा मात्र एकदम नॉर्मल होती. नेहमी सारखी हसत-खेळत होती.
एका मात्रीनीने विचारले कि , " तू इतकी शांत,नॉर्मल कशी? तुला वाईट  नाही वाटलं?"
ती म्हणाली ,वाटलं ना , खूप वाईट वाटलं . पण काय म्हणून रडत बसू? तो नाही म्हणाला म्हणून जीव देऊ का? माझ प्रेम खोट नव्हतं. ते त्याला कळलं नाही . तो त्याचा निर्णय घ्याला मोकळा आहे, त्याच्यावर जबरदस्ती कशी करता येईल ?
फक्त वाईट एवढंच कि, ज्या मुलीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होत तिला तो गमावून बसला.
तोटा माझा नाही, त्याच झालाय .....
ज्याच माझ्यावर प्रेमच नव्हत , त्याला गमावण तसं फार वाईट नाही ..
पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुणाला कायमच गमावून बसन....? ते प्रेम पुन्हा कुठून येईल....?????


------ ती भेटली ! एका प्रवासात, एक कंतालवाना प्रवास तिच्या मुले आनंद मई झालेला. ती भेटली एक स्वप्न सुंदरी सारखी ! तिचे मनाला भुरल घालणारे रूप, तिचे मोहक हास्य! पहिल्यांदाच वाटले तिच्याशी मैत्री करावी! मनातून वाटत होते स्वतः बोलावे, पण! डोक्यातील तत्व मनातील वादल क्षमावन्याचा केविलवाना प्रयत्न करीत होते. डोल्यां समोर पेपर धरला, मन मात्र केवाच तिच्याशी बोलू लागले होते.
मन चलबिचल होत होते, विचार येत होता किती वेल शांत बसणार आपण? आणि--- आणि चमत्कारच झाला, गुलाबाच्या पकली सारखे तिचे ओठ अलगद विलग झाले. ती माझ्याशी बोलली, मी मात्र सुरवातीला चेहरयावर काहीच हाव भाव दाखवले नाही. मनावर खोलवर नकळत तृप्तता आली होती.

मनाला वाटत होते, ते घडत होते विचारी घोड्यान्ना मनासारखा उत्तम सारथी लाभला होता! जुजबी विचारपूस झाली त्यातून कलले की ती विदर्भातली, नकळत विदर्भ वासियां विषयी उस्तुकता निर्माण झाली.
तिने तिचे नाव सांगितले, निसर्गाला साद घालणारे, रुतुन्न जन्म देणारे, रुतुन विषयी हेवा वाटावा, एवढे भाग्यवान का नाही अस्से वाटणारे ! "रुतुजा", नावातच बरेच काही लपले होते.
ती निराश झालेली, कारण विचारल्यावर कलाले, की परिक्षे मधे कमी गुन, तिची ही निराशा कशी दूर करावी हा विचार माझ्या मनात सुरु झाला.विचारी घोड्यान्ना सारथी मनाने त्या दिशेने भरदाव वेगा ने फेकले. विजेच्या चापल्यतेला लाजवनारा हा वेग. एक विचार मनात आला, योग्य ती जुलवनुक करुन मांडला. "परिक्षेतिल गुण म्हणजेच यशाचा एकमेव मापदंड नव्हे " एखाद्या विचार वनता सारखे आपण ही विचार करतो याचे समाधान वाटले . एवढ्या छोट्याश्या परन्तु परिणाम करक विचारामुले तिच्या चेहर्यावर हास्य उमटले। क्षणभर तिचे ते मोहक हास्य मी पाहताच राहिलो। "हलू हलू आमचे विचार कोणाला का होईना पटतात याचे समाधान वाटले। "

बरयाच विषया वर आमच्या गप्पा रंगत आल्या होत्या, सारथी उत्तम लाभ्ल्या मुले विचारी घोड्यान्ना कसला ही त्रास होत नव्हता। विषय शिक्षणात गेला, मी इलेक्ट्रानिक्स विद्यार्थी आहे हे कलल्या वर तिला ही आनंद जाला कारण ती पण याच विषयची स्टुडेंट होती। आणि हे ऐकल्या वर माज्या अंगावर जरा मूठ भर मॉस चढले। आणि आमच्या गप्पा आणखी पुढे रंगु लागल्या।

नेहमी चे विषय चालू होते पण आमचा विषय वेगळ्या विदर्भ राज्य वर घोंगावु लागला, प्रत्तेक गोष्टी मधे विदर्भ राज्य वर अन्याय जाला आहे, आणि विदर्भा वेगले राज्य हवे असे तिला वाटत होते। माझ्या ही मनात मराठवाडा विषयी विचार येवू लागले, पण वेगळ्या राज्य साथी नव्हे कारण मराठवाडा महाराष्ट्र मधे सामील होंय साथी आपल्या स्वातंत्र्य सेनानिन्नी दिलेल्या बलिदानाची माला जान होती। (पण! ही वेल च वेगली होती ना !)

शेवटी मनातल्या मानत मी त्या स्वातंत्र्य सेनानी ची माफ़ी मागितली आणि जे पश्चिम महाराष्ट्र विषयी माज्या तोंडातून उड्गार निघू लागले ते थम्ब्ता थम्बत नवते। थोद्यावेल तर आपणही विदर्भा वासी असल्या सारख जाणवत होते। जसे काही मी एखाद्या मंत्रिमंदाला मधील मंत्री आणि ती विदर्भा ची नागरिक, माझा पुढे वेगळ्या विदर्भा चे प्रश्न मान्दत होती (आणि एखाद्या राज कारन्याला शोभेल अशी मी परवानगी देवून देखिल टाकली), तिच्या चेहरया वर पुन्हा स्मितहास्य परतले। तिच्या गालावर पडलेल्या खली कड़े मी पाहताच राहिलो।

बसने जवालपास शे-सवाशे किमी अन्तर पर केले होते। बस थोड्या वेला साथी धाब्या वर थांबली, तिला चाह काफी साथी विचारले, थोड़े ओढे -वेधे घेतल्यावर ती तयार जाली। तिची aawad निवड कलाली आणि खूप झालेल्या आनंदात साखर पडल्या सारखेच झाले कारण तिच्या आणि माज्या आवड निवाडी जवाल पास सारख्याच होत्या। मग थोडी चित्रपटा न विषयी चर्च झाली आणि चित्र पटा न मधे काय सुधारना घडवावयात याची एकमेकां समोर मते मांडली। जशे के आम्हीच निर्माता- दिग्दर्शक आहोत।

मनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती आपले गाव जवाल येण्या ची, असे वाटत होते की हा प्रवास अखंड पाने चालू रहावा। शेवटी मी तिला सांगितले की मी औरंगाबाद ला उतरत आहे। तिच्या चेहर्यावरचे भाव मी पटकन ओलखले। माज्या लक्षात आले की ती थोडीशी भावनिक होणार, पण मी तिचा पत्ता घेवून या नवीन वर्षाला शुभेच्चा पत्र पाठवनयाचे कबूल केले।

तिन साडेतीन तासांच्या प्रवासात जालेली मैत्री कित्तेक वर्ष जुनी तरी ही सदाबहार वाटत होती। मी तिला म्हणालो, "रुतुजा, प्रवासात भेटलेले सहप्रवासी पुन्हा भेटतात की नाही मला माहित नाही, परत जर भेटलो तर माहि ओळख ठेव।" ती म्हणाली अरे अससे काय म्हणतोस, पुन्हा आपण नक्कीच भेटू, आणि मी तुला मज़ा ईमेल देत आहे ना! असे अत्तयंत भावनिक चेहरया ने ती म्हणाली।

प्रवास संपला! एक क्षण भर तिच्या भावनिक चेहरया कड़े मी पाहत होतो। हातात हात घालून निरोप घेतला। हात सोडताना जवाल्चे कोणी तरी सोडून जाट आहे असा भास् होत होता। बराच वेल ती हात दाखवत बस च्या दारा मधे उभी होती। बस धुरादा उडवत तिच्या वाटेने निघून गेली, मइ माझ्या वाटेने निघालो। मनात एकाच विचार येत होता, ती मला पुन्हा भेटेल? आमचे वेगळ्या झालेल्या वाता पुन्हा एकत्र येतील? तिचा तो प्रसन्ना चेहरा सारखा डोल्या समोर येत होता। डोले मिटले, आणि स्वत: च स्वत: ला म्हणालो, "रुतुजा" !
मन जुलत असताना
मन मोडून गेलीस
तुजे माझे नाते नसताना
नाते जोडून गेलीस
भेटीस अधीर असताना
अति दूर निघून गेलीस !

काल्पनिक?
Make a Free Website with Yola.