सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?"
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला
प्रामाणिक (ला)कोड तोड्या
कलियुगातील गोष्ट आहे.
एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.
एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला.. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले
"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही.. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?"
जलदेवता म्हणाली, "रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."
इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता.. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."
जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले.. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले.. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
"हाच माझा लॅपटॉप !!"
जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले.
दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, "मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ?" प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.
दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले,
"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे - नाही नाही - बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार ?"
जलदेवता म्हणाली,
"रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."
इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले,
"यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?"
लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला,
"माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता."
जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.
कलियुगाचा महिमा :
प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला.
लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना.
मग कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला :)

धोतराचा सोगा सावरत खाली उतरून आबा म्हणाले, ''शिऱ्या, तू मला ह्या बॅटिंगच्या गमजा सांगू नकोस. आमच्या काळात सीके नायडू जाम फॉर्मात होता. आम्ही सारे त्याचे भक्त. हे समोरचं आंब्याचं झाड आहे ना! त्याच्या शेंड्यावरून सिक्सर मारायचो आम्ही त्या काळात. ते करून दाखवशील, तर तू खरा बॅट्समन!''
झालं... शिऱ्या पेटला. उंच, डेरेदार आंब्याच्या झाडावरून सिक्सर मारण्यासाठी त्यानं जिवाचा आटापिटा केला. पण, बॉल फांद्यांत आपटून, एखादी कैरी तोडून खाली पडायचा.
तासाभरानंतर दमछाक झालेला, वैतागलेला शिऱ्या गप्पपणे आबांबरोबर घराकडे निघाला, तेव्हा आबा खुसुखुसू हसत म्हणाले, ''अरे शिऱ्या. मघाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा ते आंब्याचं झाडही लहानच
होतं... चार फुटांचं!!!!''
आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.
एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.
अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?
प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?
ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.
खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
आणि शेवटी....
ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.

प्रिये,
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.
खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
आणि शेवटी....
ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.
Ek Khooppchhh Chhan Ani Hrudayala Kamp Futhavnari Kathaa Kharachh Nakki Vachha Ani Avadali tar Bharbharun Kautukachee Reply Dyaa Bar kaa.......
त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते…..
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का – तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ….
महीना उलटला…त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते….तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती…………

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)

एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता…
या डोंगरावर वेगवेगळया फळांच्या फळबागा होत्या.
सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
भाज्यांचे मळे होते.
मुलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
बागेत थुईथुई उडणांरं कारंजं होतं.
या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
एक छोटसं पण काठोकाठ भरलेलं तळ होतं.
तळयात सुळसुळणारे मासे होते.
आणि
फक्त पावसाळयातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
सगळया गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
पाहुणे जंगलात फिरायचे.
रानमेवा खायचे.
विहिरीत पोहायचे.
फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
झ-यातले गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
डोंगर उतरतांना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
मुलं बागेत खेळायची.
कारंज्यात भिजायची.
मजा करायची.
सगळे कौतूकाने म्हणत , अजबच डोंगर आहे!
पण…
हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बैचेन होता.
डोंगराला वाटे,
छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्याचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होतं.
पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.
पण…
आपण कधीच मोठं होतं नाही!
आपली कधीच वाढ होत नाही.
आपण सगळयांना मदत करायची. सगळयांना ऊर्जा पुरवायची.
सगळया सगळयांना आनंदी करायचं.
पण तरीही…
आपली होते झीजच!
मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
..माझी कुणालाच काळजी नाही.
हे असं का?
डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.
डोंगरावरच्या झाडांना, झ-यांना व रस्त्यांना डोंगराच्या मनातलं कळलं.
डोंगरावरची झाडं हसली.
झाडं सळसळली.
झाडं म्हणाली,
अरे डोंगरा, असं काय करतोस?
तुझ्यामुळेच तर आम्ही आहोत. आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरून ठेवलंय की
तुझी झीज होणारच नाही !
आणि रे डोंगरा, आम्हाला आहे रे तुझी काळजी.
कडक उन्हाळयात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर
अंथरतो आणि आम्ही मात्र…
निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहतो.. अतिशय आनंदाने!
तुझ्या पोटातलं थोडस पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.
हे ऐकून डोंगराचं मन भरून आले.
डोंगरावरचा झळा जरा खळाळला.
दगडाजवळ बुडबुडला.
झरा डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरून आम्ही वाहतो, बागडतो.
आम्हाला आहेच की तुझी काळजी”.
रे डोंगरा, आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
भर उन्हाळयात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
आणि पावसाळयात, तुझ्यावरचा सगळा कचरा, गाळ वाहून नेतो.
तुला चांगलं स्वच्छ करतो.
आणि पुढच्या उन्हाळयासाठी…
तुझ्यावरच्या विहिरी भरून ठेवतो.
तळं भरून ठेवतो.
हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
डोंगरावरचा रस्ता उधळला.
डोंगराला बिलगला.
रस्ता डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, असं काय करतोस?
अरे आम्ही, तुझ्यावरच चालतो, तुझ्यातूनच वळतो, त्यातुनच वाट काढतो..
आणि वाटसरूंना वाट दाखवितो.
मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात, तेव्हा,
ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
तुलाच आर्शिवाद देतातन ना?
आम्हीच काय?
पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना, रे डोंगरा?”
हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
भल्यामोठया डोंगराचा इवलासा आनंद झाडांना, झ-यांना व रस्त्यांना समजला,
कसं कुणास ठाऊक, पण गावातल्या मुलांना पण कळला!
मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
बागे खेळली.
मातीत लोळली.
विहिरीत पोहली.
आणि मग..
फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!
हे पाहायला सारा गाव जमा झाला.
तेव्हा डोंगराला मनापासून, अगदी मनातल्या मातीपासून खूप आनंद झाला!
सगळे म्हणाले अजबच आहे हा फूल डोंगर!

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ? दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे !."
प्रिय सखे
तू कदाचित बावरली असशील की, तुझ्या पुस्तकात हे पत्र आणि ते पण माझं.
खरचं आत्ता पर्यंत मी कधी कुणाला असं पत्र लिहिलेच नाही.
कारण तशी वेळच कधी आली नाही, पण
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन?
( तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते
तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज वेळ कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो. ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ? तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ घरातल्या सोफ्यावर बसले होते.बाजूला त्यांचा ४५ वर्षांचा उच्चशिक्षीत मुलगा बसला होता.खिडकीत एक कावळा येऊन बसला.वडिलांनी मुलाला विचारलं''ते काय?''मुलगा म्हणाला''कावळा''काही वेळानंतर वडिलांनी पुन्हा विचारलं,''ते काय?''मुलगा म्हणाला''आताच सांगितलं ना कावळा आहे म्हणून''थोड्या वेळेनंतर वडिलांनी मुलाला पुन्हा तोच प्रश्न केला,यावेळेस मात्र मुलगा त्रासला होता.रागातच तो उत्तरला,''कावळा आहे कावळा!'' त्यानंतर चौथ्या वेळेस वडिलांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला.यावेळेस मुलगा वडिलांवर खेकसलाच'' पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता? कितीवेळा सांगितलं कावळा आहे म्हणून? समजत नाही?''वडिल उठले.त्यांच्या खोलीतून एक डायरी आणली.मुलगा जन्मल्या दिवसापासूनच्या नोंदी त्यात होत्या.त्यातील एक पान उघडून मुलाला वाचायला दिले.मुलगा वाचू लागला,लिहिले होते'' आज माझा तीन वर्षांचा छकुला माझ्यासोबत सोफ्यावर बसला होता.खिडकीत कावळा येऊन बसला.बोबड्या स्वरात मला छकुल्याने २३ वेळा विचारलं,ते काय?२३ वेळा मी त्याला सांगितलं "कावळा". मुलाने वडीलाना मीठी मारली, त्याच्या डोळ्यात अश्रु आले
चिंटूच्या आईनं चिंटूच्या शेपटीला धरलं व त्याला ओढतच बिळात नेलं… दुसऱ्या दिवशी पहाटे राजूची आई उठली… तिनं सगळे घर स्वच्छ केलं… मग राजू व राजूचे बाबाही उठले… राजूनं बागेतील फुलं, दूर्वा तोडून आणल्या… २१ दुर्वांची जुडी केली. राजूच्या बाबांनी टेबलावर गणपतीचं मखर बसवलं व सगळीकडे झिरमाळ्या लावून गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी केली… चिंटू बिळाच्या तोंडाशी येऊन सारखा बघत होता व परत बिळात जाऊन आईला रनिंग कॉमेंट्री सांगत होता…
हं चल चल आई, आरतीची वेळ झाली बघ! चिंटूनं आईला आवाज दिला… चिंटूची आई शेपटी झटकून, केस नीट करून, आरशात बघून चिंट्याच्या मागोमाग बिळाच्या बाहेर आली… गणपती बाप्पा हॉलमध्ये टेबलावर बसवला होता… चिंट्या व आई हळूहळू सरकत सरकत कॉटच्या खाली येऊन बसले… तिथून त्यांना बाप्पा छान दिसत होता… आई आई बघ बघ मोदक… बापरे… ताट गच्च भरून… एवढे सगळे बाप्पालाच का ग? चिंटूनं विचारलं… शू ऽऽऽ… गप्प बैस चिंट्या… गडबड केलीस तर आपण इथे लपून बसलोय हे राजूच्या आईला कळेल अन् मग आपली काही धडगत नाही बघ… सॉरी सॉरी आई… हं आता गप्प बसतो हं… आई आरती सुरू झाली, की टाळ्या वाजवू? हं वाजव…; पण जरा हळूहळू हं…. राजूच्या बाबांनी मोदकाचा व पेढ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला… नारळ फोडला व सगळ्यांना प्रसाद वाटला… चिंटू कॉटखालून डोळे फाडून बघत होता… त्याच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलं होतं; पण तो काहीच हलचाल करू शकत नव्हता… आरती झाल्यावर सगळे जण स्वयंपाकघरात जेवायला गेले… हीच संधी चिंटूनं साधली. त्याची आई अरे म्हणेपर्यंत त्यानं गणपती बाप्पाच्या समोर वाटीत ठेवलेला मोदक पळवला व थेट बिळात धूम ठोकली…
इतक्यात राजू बाहेर आला अन् त्यानं पाहिलं बाप्पासमोरील प्रसादाची वाटी रिकामी झाली होती… आई आई बघ बाप्पानं मोदक खाल्ला वाटतं… ते ऐकून त्याची आईही धावतच आली… अन् तिनं गणपती बाप्पाला लोटांगण घातलं… जय गणेशा… तू आमचा प्रसाद ग्रहण केलास… आमच्यावर अशीच कृपा राहू दे… चिंटूच्या आईनं सर्व ऐकलं अन् ती धावतच बिळात गेली… तिनं चिंटूचा कान धरला व जोरात पिरगाळला… उद्यापासून असा प्रसाद उचलायचा नाही हं… तिनं त्याला दटावलं…
दुसऱ्या दिवशी परत आरतीची वेळ झाली… चिंटूची नुसती गडबड चालली होती… अन् चिंटू पळाला… आज ही त्यानं मोदक पळविला होता… असेच २-३ दिवस गेले… चिंटूला आता तर चोरून मोदक खायची चटकच लागली होती… इकडे त्याच्या आईला काहीच माहिती नव्हतं…
आज अनंत चतुर्दशी… आज गणपती बाप्पा परत जाणार. उद्यापासून आपल्याला मोदक खायला मिळणार नाहीत याचं चिंटूला खूपच वाईट वाटत होतं… आज आपण ४-५ मोदक तरी मिळविले पाहिजेत म्हणजे पुढचे आठ दिवस तरी ते पुरतील असं त्याला वाटलं… त्यानं आईलाही आग्रह केला…. ए आई चल ना ग, उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत. चल आज आपण आरतीला जाऊया…; पण तू मोदक नाही ना चोरून घेणार? आईनं विचारलं… अं हं…….. मुळीच नाही आपण फक्त आरतीला जाऊया…. चिंटूच्या आईनं परत एकदा आपला जामानिमा नीट केला, आरशात पाहिलं व चिंटूबरोबर बिळाच्या बाहेर आली… दोघंजण हळूहळू बैठकीत कॉटच्या खाली जाऊन बसले… अन् आरती सुरू झाली… आज तर गणपती बाप्पा समोर केळी, पंचखाद्य, मोदक, नारळ पेढे, अबब सगळा एवढा मोठ्ठा प्रसाद ठेवला होता… चिंटूची चुळबूळ सुरू झाली… आईनं डोळे मोठे केले व त्याला गप्प बसवलं…; पण आईची नजर चुकवून चिंटू पळालाच… अन् त्यानं मोदकावर झडप घातली… नेमतं त्याच वेळेस राजूनं पाहिलं… आई आई, ते बघ, उंदीर मामानं मोदक पळविला… मार त्याला,असं म्हणून राजूनं हातातील रिकामी वाटी चिंटूच्या अंगावर फेकली… त्याच्या आवाजानं आई धावतच आली… अरे अरे राजू मारू नकोस उंदीर मामाला…. अरे गणपती बाप्पाचं तर वाहन आहे उंदीर मामा…. सगळा प्रसाद एका ताटात घाल अन् ठेव त्या बिळ्याच्या तोंडाशी…. आज खाऊ दे त्यांना पोटभर प्रसाद….
चिंटूनं राजूच्या आईचं बोलणं ऐकलं अन् शेपटी उंचावून उड्या मारायला लागला… चिंटूची आईही कॉटखालून बाहेर आली अन् दोघं मिळून त्या प्रसादावर तुटून पडले… चिंटू मोदकाचे तुकडे आईला आणून देत होता व आई बिळात जाऊन ठेवून येत होती… दोघांचंही तुडुंब पोट भरलं होतं… चिंटू गणपती बाप्पाला नमस्कार कर आज… बाप्पामुळेच तुझ्यावरचं संकट टळलं… व तुला पोटभर मोदक खायला मिळाले… बाप्पाला माफी माग…
चिंटूनं लगेच कान धरले व बाप्पापुढे लोटांगण घातलं… बाप्पा मला क्षमा कर… मी आता कधीसुद्धा चोरी करणार नाही… मला माफ कर… करणार ना? चिंटूनं डोळे किलकिले करून पाहिले… गणपती बाप्पा त्याच्याकडे बघून हसत होते… अन् चिंटूच्या आईनं त्याची शेपटी धरून त्याला उठवलं… चल राजा, बाप्पानं क्षमा केली बघ… चल चल… बाप्पाच्या मिरवणुकीत तुला नाचायचं आहे ना… चल… आणि चिंटू उड्या मारतच राजूच्या मित्रांबरोबर मिरवणुकीत सामील झाला… बॅंडवर कोंबडी पळाली गाणं सुरू होतं आणि चिंटू त्याच चालीवर गाणं म्हणू लागला….
चिंटू पळाला मोदक खायला…. मोदक खायला…….. हो हो हो……. चिंटू पळाला…..